बा तू हवा व्हता

बा तू हवा व्हता
अपंग, दारुडा,
आजारी, वेडा,
काजग, रिकामातेकादा
कसा बी असला
तरी बी बा तू हवा व्हता

तुझ्या जान्यान
आपल वैभव बी गेल
जस माझ्या मायच
कुकू तू नेल
ती झाली विधवा
आम्ही झालो पोरके
सहनुभुतिच्या नजरांचा आता
घटका-घटका दावा व्हता
बा तू हवा व्हता

काम लै करू लागली
फोटोपाशी रडू लागली
कुणी म्हणे पोराना सोड
या घराशी नात तोड़
लागिन करू दुसर
उभा आयुष्य पसर
गीधाडाच्या नजरा तिच्यावर
पर तिच्या आसवात
आता लावा व्हता
बा तू हवा व्हता

भीती हाय दार हाय
फकस्त छप्पर न्हाई
तिच्या संसाराची गाडी
एकाच चाकावर जाई
कधी ती हानतुरनात रडे
नव्या जिन्दगिशी सकाळी पुन्हा लढे
बिन बापाची लेकर
हा शाबूत तिच्या जीवा व्हता
बा तू हवा व्हता

आज ठीक-ठाक हाय
माझा बाप माझी मायच हाय
मी देखल तिला झुरताना
क्षणों क्षणी मरताना
पाखरांच्या छाप्परासाठी
वेदनेशी लढताना
नियतीशी ती जिंकली
तरीबी तीच हारली
आज ती जाताना बी
तू गेल्या दिसाचा
तिच्या डोळ्यात परतावा व्हता
बा तू हवा व्हता
बा तू हवा व्हता

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा