मैत्री तुझी माझी
असावी फुलासारखी
शेवटपर्यंत सुगंध देणारी ,
तशीच ती फुलपाखरासारखी
मनसोक्त गंध लूटणारी ....!!
मैत्री तुझी माझी
असावी पाखरासारखी
सतत मुखी राहणारी,
मुखी राहूणही
खुप काही बोलणारी ....!!
मैत्री तुझी माझी
असावी धुक्यासारखी
क्षणापूरतीच गारवा देणारी ,rama
तशीच ती दवासारखी
अंगावर थंड पांगरूण जाणारी ....!!
मैत्री तुझी माझी
असावी सावलीसारखी
सतत विसावा देणारी ,
तशीच ती मनाला
शांत करून जाणारी ..!!
मैत्री तुझी माझी
अशीच असावी
सुखा दु:खात साथ देणारी
सुखात तुझी आसवे आसवीत
तर दु:खात माझे अश्रू आसवेत ....!!
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा