सांग साद मला तु देशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा