एक गंध हवा हवासा
निशिगंधाचा जसा रात्रीला
एक गंध हवा हवासा
पहिल्या पावसात जसा मातीला..
एक स्वर हवा हवासा
तुझ्या कंठातून जसा शब्दांना
एक स्वर हवा हवासा
झाडावर सळसळणारा जसा पानांना..
एक स्पर्श हवा हवासा
हळूच तुझ्या हाताचा माझ्या हातांना
एक स्पर्श हवा हवासा
अलगद तुझ्या ओठांचा जसा माझ्या कानांना..
एक स्वप्न हवहवसं
मला पडलेल तुझ्या विचारांत असताना
ज्यात म्हणतेस तू 'तुझिच मी' पावसात चिंब भिजताना
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा