सकाळचं कोलेज दुपारचं क्यान्टिन
तुझ्यासोबतची संध्याकाळ,
अन रत्रिची ती स्वप्नं,
दुसया दिवशी सर्व काही फ़क्त एक आठवण असते,
पण हि तर आठवणींची अनमोल ठेवच असते॥
कधिच्या विराण दुपारी
सर्व विसरुन खदखदुन हसयला लावते,
तर कधी घाईघाईत थांबऊन
ढाय मोकळुन रडायला लावते
ती ही एक आठवण असते,
हि तर तिच्या अस्तित्वाचि जाणिव असते॥
भाविष्यातले विखरलेले रस्ते
भुतकाळात एकत्र आणते,
भिरकावलेल्या मनांची
एकाजागी भेट घडवते,
ती ही एक आठवण असते,
हि तर मनींची सत्य कल्पनाच असते॥
कळाच्याही हिशोबात काही चुक नसते,
सरल्या आयुष्यातलं आपल्या सोबत काहिच नसते,
मात्र त्यालाही नेता आली नाही,
अशी एक ठेव आपल्याकडे कायम असते,
ती ही एक आठवण असते,
हि तर खरी आठवणींची शक्ति असते॥
पण आजची संध्याकाळ काही सरतच नाही,
तुझ्या भेतिची आस काही सुटतच नाही,
आठवणींची ही ठेव काळाला परत कराविशी वाटते,
त्याबदल्यात कलचं आयुष्य परत मागावसं वाटतंय,
अन तुझ्यासोबत कायमचं रहवसं वटतंय
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा