आज मात्र विस्कटलेला..........
तो दिसला रस्त्याच्या पलिकडे
धुंदीत चाललेला, बहुतेक तिच्या स्वप्नात
कदाचित प्यायलेला शर्ट फाटलेला
काधिकालचा त्याचा सुरेख भांग आज मात्र विस्कटलेला..........
नंतर तीही दिसली रस्त्याच्या अलीकडे
हसून बोलली
चुकून बोलून गेलो "तो दिसला होता"
तिच्या डोळ्यातला पाउस मग लिपस्टिकवरून ओघलला
तिच्या गाण्यातला सुरेल राग आज मात्र विस्कटलेला............
तो माझा मित्र होता ती ही मैत्रिण होती
त्यच्या जीवाची मात्र ती एक वीण होती
पूर्वी दोघे एकमेकांसोबत होते सुखी होते
त्यांच्या आयुष्याचा तलम कपडा आज मात्र विस्कटलेला.......
नियतीचा घाला त्याच्या नोकरीवर आला
आई वडिलान्पुधे तिचाही नाइलाज झाला
पडला दोन्हीकड़े अश्रूंचा सडा
पण गेला कायमचा एक तडा
त्यांच दोघांच एक सुन्दर चित्र बनत होत
त्याचा तो सुन्दर रंग आज मात्र विस्कटलेला......
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा