तुझ्यावाचून मला करमत नाही..
अन माझ्यावाचून मन तुझ रमतच नाही..
किती हा आपल्यात अंतराचा दुरावा
पण ऐकमेका लागलेली ओढ काही कमी होत नाही..
आता तुच सांग हे असलं कसलं प्रेम ... ?
दिवस मोठा अन रात्र एकली भासते..
सकाळीची किरण निस्तेज अन संध्याकाळ निर्जिव वाटते..
आठवणीच्या एका झूळकेने मग उगाच ..
मन अलवार डोलून आनंदात नाचते...
काय हे.. असलं असतं का प्रेम?
तहान-भूक मुकं होऊन जाते..
तुझ्याच सुंदर चेहर्यावरचे ते भाव
डोळ्यात सतत चमकून जाते..
अन मग कानांना तुझ्याच अबोल्याचे बोल ऐकू येते..
किती सोपे पण आडेवेढे घेतलेले असलं असतं का प्रेम.. ?
तुझ्या भेटीची चाहूल अन
चुकलेल्या दिशेला अचुक पाऊल ..
तुझ्याकडे मग धावत सुटावेसे वाटते...
क्षितीजाचे कठड्यावरून एका पावलावर चालत रहावेसे वाटते..
एवढं सारं प्रेम फक्त तिच्यासाठी .. बापरे असलं कसलं हे प्रेम?
कधी न झालेल्या चुका स्वत:वर ओढवायच्या..
रुसली सखी की मग मुद्दामूनच आंधळ्या प्रेमाखातर..
माझंच चुकलं माझचं चुकलं म्हणून..
तिच्यामागे घोटळ्त रहायचं....
असलं कसलं प्रेम जिथे जिंकण्यासाठि हारत रहायच?
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा