थोडासा थांब

थोडासा थांब बघतर मागे वळून
कुठेपर्यंत आले आहे मी
तुझ्या सोबत तुझ्या नकळत
थोडासा थांब बघतर जरा

हे डोळे फक्त तुझीच वाट बघत आहे
रात्रदिवस थकलेत् रे ते
त्याना एकदा अलगद तुझ्या ओठानी पुसून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ्या नसन्याने तुझ्या असण्याचे
महत्व कळला आहे मला
तुझ असण पुन्हा एकदा देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ काम, तुझ घर, तुझे मित्र, तुझ विश्व
सगळ सगळ मान्य मला
पण इथे कुणीतरी तुझ्यासाठी एक जग उभ केलय
ते बघून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

हा चंद्र सुद्धा हसतो मला
म्हणतो, ज्याला तू आमच्यात शोधत असत्तेस रात्र रात्र
तोही तुझ्यासाठी झुरततोय का असाच
त्या चंद्राला उत्तर देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

आठवण तुलाही येते माझी
पापणी तुझी ही ओलवते अश्रूनी
त्या अश्रूना माझ्या ओंज़ळीत देवून तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ हसण तुझ बोलण
तुझा राग तुझ गप्प राहण
घेऊन गेलास तुझ्याबरोबर तू सर्व
ज़गण्यासाठी तेवढेच आहे रे माझ्याकडे
माझ जगण देऊन तर ज़ा जरा...
थोडासा थांब बघतर जरा

माझ्या ज़वळ थोडा बसतर जरा
माझा सहवास, माझा श्वास, माझी सोबत
अनुभव तर जरा
थोडासा थांब बघतर जरा

प्रेमात म्हणे न सांगता न बोलता
सर्व काही कळत
मग न सांगता न बोलता
मला समजून तर घे जरा
थोडासा थांब बघतर जरा

तुझ्यात स्वत:लाच हरवून
बसले मी कुठेतरी
जरा येऊन मला माझेपन
शोधून तर दे जरा
थोडासा थांब बघतर जरा

माझ्या दिवसात, माझ्या रात्रीत
माझ्या प्रत्येक क्षणात तू आहेस
व्यापून टाकल आहेस तू मला
माझा एक एक क्षण
मला परत देऊन तर जा जरा
थोडासा थांब बघतर जरा

एकदा, फक्त एकदाच माझ्या मनात डोकवून तर जा
स्वता:लाच बघितल्यावर कस वाटत
ते सांगून तर जा जरा...
थोडासा थांब बघतर जरा..

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा