तु जिंकावं म्हणून

तु जिंकावं म्हणून मला नेहमी हरावं लागत होतं
कधी मी जिंकावं म्हणून तुला एकदा तरी हरताना पाहायच होतं

तुझ्या वाटेवर शिणलेल्या त्या डोळ्यांना
माझ्या आठवणींनी तुझ्या डोळ्यात पाणी पाहायच होतं

तुला नुसतं त्या हिरव्या शालूत पाहायच नव्हत
तर तुझ्या हातावर काढलेल्या मेहंदीत माझं नाव शोधायचं होतं

तुझ्या हातात भरलेला हिरव्या चुडया सोबत
तुझ्या कपाळी माझ्या नावचं कुंकू मढलेल पाहायच होतं

चार चौघात तुला माझी म्हणून मिरवायचं नव्हत
तर महाबळेश्वरच्या त्या गुलबी थंडीत हि फिरवायचं होतं

सगळच जर एकतर्फी असतं तर काहीच वाटलं नसतं
पण तेव्हा तुला माझ्या जीवाशी खेळताना काहीच कसं वाटत नव्हत
काहीच कसं वाटत नव्हत  .......................

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा