अशी कशी वेडी गं तू?

अशी कशी वेडी गं तू?
कोणाच्या ऋणानुबंधात अडकलीस तू?

कोणाची शपथ वाहीली आहेस?
कोणाचे उपकार फेडते आहेस?

खरं प्रेम तुझं कोणावर आहे?
जे दाखवते,की जे तुझ्या डोळ्यात आहे?

बोल ना गं,आता तरी बोलशील का?
खऱ्या प्रेमाला आता अर्थ देशील का?

किती ठेवशील संयम,किती हा अबोला?
हसरा चेहरा पण डोळ्याचा कोना हा ओला.

जगाला फसवायला काय काय करशील?
जग नाही तू स्वतःच फसशील.

मनातल्या मनात गुदमरत आहेस,
आसवांना आतल्या आत वाळवत आहेस.

पण मला आता रहावेना झालयं,
तुझ्याशिवाय दुसरं काही सुचेना झालयं.

कधीतरी बोलशील म्हणून वाट बघतोय,
प्रत्येक क्षणाला माझा श्वास गुदमरतोय.

तुझी अन् माझी कसली ही परिक्षा?
जन्मभराची नाही पण एका क्षणाची मला अपेक्षा.

त्या अडीच शब्दांसाठी प्रत्येक क्षण मरेन.
त्या एका क्षणात सारं जीवन जगेन.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा