चार पावल माझी झालीस....

चार पावल आपण
सोबत चालत जावू
तुझे अणि माज़े सूर
कुठवर जुळतात पाहू......

आर्थात जमत असेल तर चल
मी आग्रह ही करणार नाही
आज तरी तुला यावेच लागेल
असा हट ही धरणार नाही

पण मनातल्या मनात कुढ़न्यापेक्षा
व्यक्त करण बर असत
कारण इथून तिथून ऐकलेल
सारच काही खर नसत

कुणी कोणाला का आवाडाव
हे सांगता येत नाही
चार चौघना विचारून
कोणी ह्रदय देत नाही

तसच कहिस माझा झाल
त्याच धुंदीत propose केल
जवळ अशी कधी नव्हतिसच
Propose ने आणखी दूर नेल

जे झाल ते वाईट झाल
पण झाल ते बरच झाल
खर सांगन गुन्हा असतो
एव्हढ मात्र लक्षात आल

जावू दे
झाल गेल विसरून जा
मागे न वळता चालत रहा
मला विसर अस मी म्हननार नाही ...
पण तू तो प्रयत्न करुन पहा

थांब.......
इथून पुढे मला एकटयालाच जायचय
पण धन्यवाद तू इथवर आलीस
सार आयुष्य नसल तरी
चार पावल माझी झालीस....

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा