वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका रागात किवा लाडात कशा बोलतील..

१.पायलटची बायको ... " गेलास उडत..."
२.मंत्र्याची बायको ... " पुरे झाली तुमची आश्वासनं."
३.शिक्षकाची बायको ... " मला नका शिकवू..."
४.पेंटरची बायको ... " थोबाड रंगवीन."
५.धोब्याची बायको ... " चांगली धुलाई करीन."
६.सुताराची बायको ... " ठोकुन सरळ करीन."
७.तेल विक्रेत्याची बायको ... " गेलात तेल लावत."
८.न्हाव्याची बायको ... " केसाने गळा कापला कि हो माझा."
९.डेंटिसची बायको ... "दात तोडुन हातात देइन."
१०.शिंप्याची बायको ... "मल शिवलंस तर याद राख."
११.अभिनेत्याची बायको ... " कशाला नाटक करता?"
१२.किराणा दूकाणदाराची बायको ... " नुसत्या पुड्या सोडु नका "
१३.रेल्वे ड्रायव्हरची बायको...."आली का गाडी रुळावर/लायनीवर ?"
१४.संगणक अभियंत्याची बायको..... " तुला डिलीट करून टाकीन"
१५.सोणाराची बायको...... "शांत बसा नाहितर कान टोचिन."
१६.भंगारवाल्याची बायको "माझ्या नशिबात हे भंगार आलय"
१७.लाईटमनची बायको "माहित आहे तुम्ही किती दिवे लावतात ते"
१८.नगर पलिकेतल्या प्लम्बरची बायको "आज साहेबांनी तुम्हाला पाणी पाजलेले दिसतेय"..
१९.शेतकरी नवरा आसलेली बायको "तूमचे तर सर्व दाने भूश्यात गेलेत".


0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा