३३)कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र
-----नी गळ्यात बांधले मंगळ्सूत्र
३४)ईवले ईवले हरीण, त्याचे ईवले ईवले पाय,
****** राव आले नाहीत अजुन,
पिउन पडले की काय.......
३५)चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लग्नच झाले नाही तर नाव कसे घेऊ
३६)एक होती चिऊ एक होती काऊ
गणपत रावांच नाव घेते , डोक नका खाऊ
३७)अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
३८)चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे
घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे
३९)बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या
गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फ़ळ्या
४०)लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन गणपतरावांच्या घशात अडकला घास
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा