अहो करावच म्हणता तर जागा कुठ हाय ?
हजारो लाखो बहाने बनउन
पोरगी भेटायला येते
नाकाला तोंडाला स्कार्प बांधून
आपल्या गाडिवर बसते
पाठी माघुन मूल ओरडतात ये आर ...चाललाय काय ?
तुम्हीच सांगा प्रेम आम्ही कराव का नाय?
कस बस झाड नसलेल्या गार्डेन मधे
आम्ही सुखरूप पोहचतो
दगडाचा सहारा घेत
एकांतात जाऊंन बसतो
थोड्या गप्पा रंगतात तोच
फेरीवाला भैया बोलतो
साब ...कोल्ड्रिंक्स दू क्या चाय ? ....
अहो तुम्हीच सांगा .प्रेम कराव का नाय?
पुन्हा प्रेमाच्या गप्पा
जोरात चालु होतात
न कळत आपले हाथ
त्या पोरीच्या केसात जातात ...
तेवढ्यात कोणाचा तरी आवाज येतो
१ रुपया दोना भाय .....
तुम्हीच सांगा प्रेम आम्ही कराव का नाय?
पुन्हा आम्ही जागा चेंज करतो
दूर जाऊंन खुप गप्पा मारतो ...
तेवढ्यात मुलीच्या घरून फोन येतो
काय ग बाई मंदिरात गर्दी हाय का काय ?
तुम्हीच सांगा प्रेम आम्ही कराव का नाय?
ती मुलगी टेंशन मधे येते
लगेच निघायची तयारी करते
नाराज मनाने आपला
निरोप घेते ....बोलते
सॉरी डिअर पुन्हा भेटू
करते गुड बाय
तुम्हीच सांगा आम्ही प्रेम कराव का नाय?
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा