तुझ्याच नावाचा जप करायचो,

तुझ्याच नावाचा जप करायचो,
तुझ्याच नावाचा जप करायचो
तुला एकदा पाहण्यासाठी
पहाटेच स्टोपला येऊन बसायचो..!१!

पुस्तकात तुझ्याच नावाच्या
धडे अन कविता दिसायच्या..,
गृहपाठ करायला घेतला तर
वह्या तुझ्याच नावाने भरायच्या.!२!

तू पहिल्या बाकावर
मी शेवटच्या रांगेत बसायचो,
कुणाचे लक्ष नाही कळताच
नझर तुझ्याकडे वळवायचो !३!

तू जायची घरी चालत
मग मीही मागे-मागे यायचो,
कुणाला वाटू नये म्हणून
सायकल मुद्दामून पंक्चर करायचो!४!

दहावीची परीक्षा संपली
अन तू गावी गेलीस,
रिझल्ट घ्यायला देखील
नंतर परत नाही आलीस!५!

सगळ्या युक्त्या फोल ठरल्या
पण, तुझा मागमूस लागेना,
काय, कुठ, कस, शोधू..
विचार करायचं मन सोडेना!६!

आजही स्वप्नात तू
निळा फ्रॉक व वेणी घालून येतेस,
अन माझी वाट बघ...मी येईन..
अस म्हणून गायब होतेस...!७!

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा