मैत्रीत...

माणसाने प्रेमात असावेच असे काही नाही,
पण प्रेमाहूनही जास्त, जणू "मैत्री"त असे काही.

प्रत्येकाला एक प्रेयसी असावीच असे काही नाही,
पण प्रेयसीहून समजूतदार, एक मैत्रीण अशी काही.

रस्त्यावरून चालताना जिने हात धरावाच असे काही नाही,
पण सोबत चालताना कधी साथ न सोडावी अशी काही.

जिने मनातले सर्व काही सांगावेच असे काही नाही,
पण माझ्या मनातले नकळत जाणून घ्यावे अशी काही.

खोडसाळपणा केल्यास हळूच हसावेच असे काही नाही,
पण कानाखाली वाजवायला लाजणार नाही अशी काही.

जिला कॉफी साठी विचारताच हो म्हणावीच असे काही नाही,
पण घरी नेऊन सर्वांसमोर कॉफी पाजावी अशी काही.

तिला गिफ्ट देता तिने स्वीकारावेच असे काही नाही,
पण वाढदिवशी न दिल्यास हक्काने मागणारी अशी काही.

मला भेटण्यासाठी घरी थाप द्यावीच असे काही नाही,
पण घरी उशीर झाल्यास माझ्यासोबतच होती सांगणारी अशी काही.

जगात प्रेमाचंच नाते सारे काही असते असे काही नाही,
तर प्रेमाहूनही अधिक जपता येणारे, जसे मैत्रीचे नाते असे काही..

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा