पोरीमुळी लाजतच नाहीत...

" इश्य..... "म्हणून मन खाली घालतच नाहीत.....
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

" नवीन ड्रेस का? " विचारले तर ह्यांना येतो संशय!!
" नाही रे,जुनाच आहे "म्हणून बदलतात विषय.
नकट्या नाकावर लटका राग दिसतंच नाही,
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

मीघाऱ्या डोळांचे कौतिक करावे,
मग तिनेहीगालात खुदकन हसावे...
कसलेच काय........ आज काल गालांना खळ्या त्या कशापडतच नाहीत....
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

उद्या घोड्यावर बसून येईल एखादा उमदा तरुण,
" होशील का माझी राणी"विचारील हातात हात घेऊन....
गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

पोर लग्नाची झाली म्हणून घरी आई- बाप काळजीत,
" माझा नवरा मी केव्हाच शोधलाय " -त्या सांगतात ऐटीत...
घरून होकारासाठी थांबतच नाहीत......
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत........

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा