'नासा'त घुमला मराठी आवाज

nasa.jpg
चैताली धोपटकर

नासाने मंगळावर पाठवलेल्या रोबोटसाठी सर्किट डिझाइन तयार करण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. याशिवाय नासाच्या सदस्यांसाठी खास व्याख्यान देण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. या निमित्ताने धीरज जाधव या टॅलेंटेड मराठी तरुणाचा आवाज नासात घुमला आहे.

खरंतर त्याची इच्छा आहे आयपीएस ऑफिसर व्हायची. आयपीएस ऑफिसर होण्यासाठी डिग्री लागते म्हणून तो व्हिजेटीआयमधनं इंजिनीअरिंग करतोय. पण ते झाल्यावरही त्याने खगोल शास्त्रावर पीएचडी करायचं ठरवलं आहे. मूळच्या यवतमाळच्या असलेल्या २१ वर्षीय धीरज जाधव या टॅलेंटेड तरुणाची ही गोष्ट. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाबद्दल असलेल्या वेडातून आपण नासापर्यंत झेप घेऊ शकलो , असं तो सांगतो.

धीरज मूळचा यवतमाळचा. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यानं बारावी सायन्स केलं. सध्या तो व्हि.जे.टी.आयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकतोय. इलेक्ट्रॉनिक्सच्या आवडीपायी धीरज ' एरोमोडेलिंग ' या कम्युनिटीचा सभासद झाला. त्या कम्युनिटीमुळे त्याला इलेक्ट्रॉनिक गोष्टी कशा बनवायच्या , त्याला लागणारे घटक या गोष्टींची माहिती मिळाली. या कम्युनिटीमुळे धीरज आणि त्याच्यासारख्या इतर सभासदांनी त्यांचा एक स्वतंत्र फोरम बनवला. यामध्ये धीरज हा एकमेव मराठी मुलगा आहे आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात लहानही आहे. २००८ मध्ये या फोरमने त्यांचा पहिला आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट यु.ए.वी (अनमेंड एरियल वेहिकल्स) बनवला. नासाच्या ' मार्स मिशन ' चे प्रमुख पीटर फेलिंगर यांनी फोरमचा हा प्रोजेक्ट बघून त्यांना मार्स मिशनच्या रोबोटला लागणारं सर्किट डिझाईन बनवण्यासाठी विचारणा केली. या फोरमने दोन वर्षांच्या मेहनतीनंतर ' इगल कॅड ' ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून रोबोटसाठी लागणारं सर्किट डिझाईन तयार केलं.

२६ नोव्हेंबर २०११ ला हा प्रोजेक्ट त्यांनी नासाकडे सादर केला. या सर्किट डिझाईनची खूप वाहवा झाली. कारण मंगळावर असलेल्या रोबोटला कमांड पाठवण्यासाठी जिथे १३ मिनिटं लागायची , तीच कमांड नासा आता ४५ सेकंदांत पाठवू शकते. एक्स-बँड हे तंत्र वापरल्याने वेळ कमी झाला आणि हे तंत्र शोधण्यात धीरजचा सिंहाचा वाट होता. म्हणून नासाने त्याला या जबरदस्त कामगिरीबद्दल सन्मानितही केलं. हा रोबोट ऑगस्ट २०१२ ला पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. १३ जून रोजी धीरजने नासाला जाऊन तिथल्या सभासदांना ' साऊंडिंग रॅकेट ' या विषयावर व्याख्यानही दिलं. सध्या तो ऑटोमेशन या विषयावर काम करतोय.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा