सुविचार.

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! 


प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र

प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा.

लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.


शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !

जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे, आणि माता पिता हे शिक्षक !

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.


अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

झाले गेले विसरुनि जावे... पुढे पुढे चालावे... जीवनगाणे गातच राहावे.

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा