जर्मनीमध्ये डॉर्टमन्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या अडथळ्यांच्या अश्वारोहण स्पधेर्मध्ये एमआयटीच्या कपिलेश भाटेने अजिंक्यपद मिळवले आहे. २० वर्षांच्या युरोपियन स्पर्धकांचे वर्चस्व मोडून काढत सुमारे २७ वर्षांनंतर हा बहुमान भारताला मिळवून दिला आहे.
कपिलेश हा या स्पधेर्तील सर्वात तरुण स्पर्धक होता. अश्वारोहण कलेचे प्रशिक्षण त्याने जर्मनीतल्या वारंडॉर्फ येथे प्रशिक्षक फिलिप शोबर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. २०१० मध्ये होणाऱ्या अशियाई क्रीडा स्पधेर्मध्ये सहभागी होऊन चमकदार कामगिरी करण्याची कपिलेशची महत्त्वाकांक्षा आहे. या स्पधेर्साठी 'लंडन ऑलिम्पिक्स' या घोड्यावर तो सराव करतो आहे. अश्वारोहणाच्या क्रीडाप्रकारामध्ये देशातील आणि राज्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावे, तसेच हा खेळ महागडा असल्याने राज्य सरकारने आणि कापोर्रेट क्षेत्राने खेळाडूंना आथिर्क मदत द्यावी, असे आवाहन कपिलेशने केले आहे.
कपिलेश सध्या एमआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील अजित भाटे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी लहानपणापासून कपिलेशला या खेळासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी कपिलेशसाठी जर्मनीमध्ये तीन घोडेही खरेदी केले आहेत.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा