जय एव्हरेस्ट!

 http://www.maayboli.com/files/u4614/sum2.jpg


नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेले शुभ्र बर्फ... नजरेचा पाळणा करतील अशा अतिखोल दऱ्या... आकाशात मधेच दाटणारे व क्षणात लुप्त होणारे ढगांचे पुंजके... हाडे गोठवून टाकणारी थंडी... वेगात वाहणारे वारे... हे सारे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला मनातील पहाडाएवढी जिद्द. कधी निसर्गाशी हात मिळवत तर कधी पंगा घेत हीच जिद्द एक एक पाऊल पुढे टाकत राहते आणि गुरुवारी सकाळी ठीक सात वाजता महाराष्ट्राचा ठसा हिमालयावर... माऊंट एव्हरेस्टवर उमटतो. महाराष्ट्राचा ध्वज हिमालयावर डौलाने फडकतो तो पुण्याच्या अवघ्या १९ वषीर्य कृष्णा पाटील हिच्या पराक्रमामुळे...
.......
गुरुवारचा दिवस महाराष्ट्रासह अख्ख्या देशासाठी ऐतिहासिक ठरला. कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट सर केले आणि ही यशोगाथा लिहिणारी ती पहिलीच महाराष्ट्रकन्या ठरली. एवढेच नाही, तर गुरुवारी सकाळी पाच ते सात या तीन तासांत तब्बल ११ भारतीयांनी हे शिखर गाठले. या पराक्रमावर कळस चढवला तो गुरुवारीच एव्हरेस्ट सर करणाऱ्या आपा शेरपा या ४९ वषीर्य नेपाळी शेरपाने. या सवोर्च्च शिखराला गवसणी घालण्याची ही त्याची १९वी खेप!
एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार करणारी कृष्णा ही १० जणांच्या टीमची सदस्य होती. तिच्या सोबतीला सहा अमेरिकी, दोन जर्मन व एक डच असे नऊ गिर्यारोहक होते. हे सारे 'नेहरू पर्वतारोहण संस्थे'तफेर् या मोहिमेवर गेले होते. ही मोहीम गुरुवारी सकाळी फत्ते झाल्याचे समजताच पुण्यासह राज्यात सर्वत्र आनंदाचे शिखर उंचावत गेले. तिच्या घरच्या मंडळींवर शुभेच्छांचा वर्षाव दिवसभर सुरू होता.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा