महाविद्यालायात येतो आम्ही
देऊन परीक्षा दहावीची
अकराविनंतर परत येते
अग्निपरीक्षा बारावीची
बराविनंतर एफ़ व्हाय
आणि एफ़ व्हाय नंतर एस व्हाय
एस व्हाय नंतर फायनल
परिक्षेविना नाही उपाय
चार क्षणांचे दिवस सुनहरे
साबणासारखे जाती निसटुनी
स्पर्धा परीक्षा महोत्सवांमध्ये
दिवस सारे जाती उलटुनी
कधी सिनेमा कधी पिकनिक
दंगा मस्ती मारामारी
कट्ट्या वरती कधी रंगते
पोरांची महाचर्चा भारी
कैन्टीन चा वड़ापाव
तर कधी मित्रांची जंगी पार्टी
चौपाटीला फिरणे घूमणे
बैंडस्टैंडला तर कधी स्वारी
कुठे चालते रडारड
तर कुठे पिकतो हशा
कुठे रंगतो प्रणय तर
कुठे A.T.K.T. वाल्यांची दशा
लायब्ररीही फुलून जाते
स्कॉलर लोकांच्या गर्दीने
सभागृह ही दणाणुन जाते
नाटकान्च्या दर्दिने
दिवस असे हे कॉलेजचे
जातील कसे विस्मरणी
रोमांच आणतिल क्षणोक्षणी
ते शेवटच्या ही क्षणी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा