एखाद्या क्राऊडेड रेस्टॉरंटमधे शिरतो

तुझा हात माझ्या हातांमधेच असतो
खाली मान घालून तू
गर्दीमधून चालत
तशीच माझ्यासोबत

एका टेबलापाशी बसतेस
सगळी गर्दी तुझ्याकडेच
अनिमिष नेत्रांनी पाहात असते
मीही फक्त तुझ्याकडेच

तुझ्याकडेच पाहात असतो
तुझ्याशीच बोलत बसतो
आजुबाजूची गर्दी नसते
फक्त आपण दोघेच असतो

अशासाठी कधीतरी
पावसाळ्यात एका दुपारी
सहज सोपं बोलत बोलत
तुडुंब गर्दीत माझ्या सोबत
जेवायला तू येशिल का ?

                   -  सौमित्र

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा