मला मैत्रिण हवीय...!
जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून,
जिला मनातील विचारांची घालमेल सांगुन,
मी माझे दुःख हलके करू शकेन,
अशी मैत्रिण मला हवीय...!
जिच्या खांद्यावर डोके ठेउन
मी शांतपणे झोपी गेल्यावर
तिला विंचू चावला तरी माझी झोप मोडेल,
या भिती ने जी हलणार नाही
अशी मैत्रिण मला हवीय...!
जिला माझी सारी सोनेरी स्वप्ने सांगता येतील
आणि ती सांगता-सांगता हातून घडलेल्या
चुकांची काबुली जिच्यापशी देता येईल,
अशी मैत्रिण मला हवीय...!
या गजबजलेल्या दुनियेत कोणाच्या मनात काय आहे?
हे ऐकून घेण्यास कोणालाच वेळ नाही,
पण त्याच गजबजलेल्या दुनियेच्या गलक्यातुन
"बोल मी आहे ना...!
असे म्हणणारी मैत्रिण हवीय...!
असे म्हणणारी मैत्रिण हवीय...!
माझ्या प्रत्येक ध्येय प्राप्तिसाठी लागणार
आत्मविश्वास माझ्यामधे निर्माण करणारी
मैत्रिण मला हवीय...!
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा