प्रेम या अडीच अक्षरी शब्दाला
केवढा मोठा अर्थ आहे
आयुष्यात प्रेम केल नाही तर
सार जीवनच व्यर्थ आहे
कुनाबद्दल आसक्ति असणं प्रेम होत नाही
कुनाबद्दल जीव्हळा असणं ही प्रेम होत नाही
प्रेमाला एक वेगळ्च अंग आहे
प्रेमामध्ये दोन मनांचा संग आहे
प्रेम म्हणजे एक हृदयातुन
दुसरया हृदयाला जोडनारा दूवा आहे
आणि म्हनुनच तुम्हा आम्हा सर्वाना
सतत प्रेम करणारा कुणीतरी हवा आहे
प्रेम कराव लागत नाही
अंतरात्म्यातुन ते आपोआप उमलत
प्रेम कधीही व्यक्त कराव लागत नाही
केवळ भावनेतूनच ते समजत
प्रेम ही दोन हृदयाला जोडणारी
सर्वात जवळची वाट आहे
आणि म्हनुनच ह्रुदयातुन उगवनारी
ती नयनरम्य पहाट आहे
प्रीती म्हणजे यौवनाच्या प्रेरनेतून
उदभावानारी वासना नसावी
तर मनात भावनेची जोड़ घेउन
हृदयाच्या वेलीवर फुलनारी अमृतवेल असावी
निरपेक्ष प्रेम केल्यानेच
प्रीतीचा खरा अर्थ समजतो
अंतरीच्या ओढीने, प्रेमाच्या गोडीने
प्रेमाचा अर्थ उमगतो
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा