मैत्री असावी फ़ुलासारखी
नाजुक, सुंदर, गोजिरी;
मात्र नसावी कोमेजून जाणारी!
मैत्री असावी इंद्रधनुसारखी,
सप्तरंग उधळणारी;
पण नसावी भासमान, नष्ट होणारी!
मैत्री असावी हिऱ्यासारखी,
अनमोल अन कठीण;
मात्र नसावी श्रीमंती रुबाब दाखवणारी!
मैत्री असावी रेशमासारखी...
दोन मनांना हळुवार जोडणारी;
पण प्रयत्न करुनही न तुटणारी!
मैत्री असावी पाण्यासारखी
शुद्ध, निर्मळ,तृप्त करणारी;
मात्र नसावी वाहून जाणारी!
मैत्री असावी चंदनासारखी
अलौकिक सुगंध देणारी;
मात्र नसावी झिजून जाणारी!
मैत्री असावी आईस्क्रिमसारखी गोड,
मौज उधळणारी;
मात्र नसावी वितळून जाणारी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा