
जर्मनीतील म्युनिक येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये अचूक नेम साधत भारताची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक व विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची दुहेरी कामगिरी नोंदवली. रशियाच्या मरिना बोबकोवाच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची किमयाही तिने साधली. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. हा विश्वविक्रम साध्य केल्यानंतर तेजस्विनीच्या कोल्हापूरमध्ये आनंदाला भरते आले आहे.
म्युनिक येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पधेर्त तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये ५९७ गुणांची कमाई केली. पोलंडच्या इवा जोना नोवाकोवास्का हिनेही तेवढ्याच गुणांची कमाई केली होती. मात्र, अखेरच्या फेरीत तेजस्विनीने ४१ गुण मिळवत बाजी मारली. इवाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले; तर कझाकस्तानच्या ओल्गा डॉवगनने ५९६ गुणांसह ब्राँझ पदक पटकावले. गगन नारंग, सुमा शिरूर, रंजनसिंग सोढी, आशर नोरिया यांच्यानंतर विश्वविक्रम नोंदवणारी तेजस्विनी ही भारताची पाचवी नेमबाज ठरली आहे.
इरादा सवोर्त्तम कामगिरीचा
राष्ट्रकुल स्पधेर्त एअर रायफलमध्ये सुर्वपदक पटकावणाऱ्या २९ वषीर्य तेजस्विनीने विश्वविक्रमी कामगिरीनंतर आनंद व्यक्त केला. 'ज्या पद्धतीने आमचा सराव सुरू होता त्यानुसार मला सवोर्त्तम कामगिरीची अपेक्षा होती. पदक किवा विश्वविक्रमाचा मी विचारही केला नव्हता. दोन्ही साध्य झाल्यामुळे होत असलेला आनंद आता नेमक्या शब्दांत व्यक्त करणेही कठीण झाले आहे' असे ती म्हणाली.
***************
पदक किवा विश्वविक्रमाचा मी विचारही केला नव्हता. हे दोन्ही साध्य झाल्याने होत असलेला आनंद मला नेमक्या शब्दांत व्यक्त करणे कठीण झाले आहे....
-तेजस्विनी सावंत
***************
संकेतस्थळ : महाराष्ट्र टाईम्स
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा