मराठी लेखन सोप्या आणि सहज पद्धतीने marathi typing software free download


आपल्याला मराठी लेखनाची खूप आवड असते पण आपल्याला मराठी लेखन कसे करायचे हेच माहिती नसते. काही जणांना हे माहिती असते मराठी फोन्ट इंस्टॉल करावा लागतो पण फोन्ट इंस्टॉल केल्यानंतर मराठी  कसे लिहायचे? अक्षरांना काना ,मात्रा वेलांटी अनुस्वार कसे द्यायचे असे प्रश्‍न पडतात मला हि मराठीची आवड असल्यामुळे वरील सर्व प्रश्‍न पडले व त्यांची उत्तरे मी गुगल काकांच्या मदतीने शोधली आपल्यासमोर या लेखात मांडत आहे. त्यासाठी आपल्याला दोन छोटी सॉफ्टवेअर इंस्टॉल करावी लागतील ती कशी करायची ते खालील प्रमाणे

 १.आयकॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर       .गुगलचे आय एम् ई सॉफ्टवेअर
     
                        
(सॉफ्टवेअर  डाउनलोड करण्यासाठी आयकॉनवर क्लिक करा)
.इंटरनेट

दोन्ही सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यावर प्रथम आयकॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर इंस्टॉल कसे करायचे ते पाहू
आयकॉन वर डबलक्लिक केल्यावर खाली दर्शवल्या प्रमाणे विंडोज ऑपन होईल इंस्टॉल कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट वर क्लिक करा.

यानंतर आपल्याला रीस्टार्ट करण्यासाठी विचारेल तेव्हा रीस्टार्ट करा.
झाले आयकॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर इंस्टॉल आपले
(सुचना:विंडोज७ मध्ये आयकॉम्प्लेक्स सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्याची गरज नाही.) 
************************************************************
गुगलचे आय एम् ई सॉफ्टवेअर कसे इंस्टॉल करायचे ते पाहू...
सॉफ्टवेअरच्या आयकॉन वर डबलक्लिक केल्यावर खाली दर्शवल्या प्रमाणे विंडोज ऑपन होईल
(यावेळेस इंटरनेट चालू असणे गरजेचे)
नेटवरून गुगलचे मराठी इनपुट डाउनलोड होतअसतानाची विंडो खाली दर्शवल्या प्रमाणे.


डाउनलोड होत असताना खाली दर्शवल्या प्रमाणे  विंडो ओपण होईल त्यानंतर डिटेल्सवर क्लीक करा.

नंतर एडवांस् वर क्लिक करा व खाली दाखवल्या प्रमाणे चेकमार्क करा. 

खाली दर्शवल्या प्रमाणे विंडो ओपन झालिकी समजा मराठी इनपुट सॉफ्टवेअर इंस्टॉल.
क्लोज वर क्लिक करून आता कॉम्पुटर रिस्टार्ट करा.
************************************************************
रिस्टार्ट झाल्यानंतर खालील स्टेप्स प्रमाणे जा.
स्टार्ट \ कंट्रोल पेनल \ रिजनल एन्ड लेग्वेज \ लेग्वेज \ डिटेल्स \ एडव्हान्स व पहा 
खाली दर्शवल्याप्रमाणे चेक मार्क आहेत का आणि नसतील तर करा.

तुमच्या टास्कबारवर EN  आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा.
(EN  आयकॉन दिसत नसेल तर टास्कबार्स वर राईट क्लिक करून टूलबारस लेग्वेज बारवर चेक करा.)

नंतर वर्ड,एक्सेल किवा नेट ब्रावजर ओपन करा.
त्या नंतर टास्कबार वरील EN क्लीक करा खाली दाखवल्या प्रमाणे दोन पर्याय दिसतील MA वर क्लिक करा.
 
 
डेस्कटॉपवर खालील प्रमाणे आयकॉन दिसेल.
   

 F12  हे शॉर्टकट बटण आहे एकाच वेळेला इंग्लिश मराठी भाष्या निवडण्यासाठी
मराठी लिखाणासाठी ने वर ठेवा इंग्लीश साठी Aवर ठेवा वर्ड मध्ये लिहिताना खाली दाखवल्या प्रमाणे दिसेल


लिहीत असताना नावाच्या पर्यायी शब्द दिसतील त्यातून ही माउस ने क्लिक करून निवडू शकता पाचच्या पुढचे पर्यायी शब्द पाहण्यासाठी आकाशी रंगाच्या डाव्याबाजूच्या एरो वर क्लिक करा व पहिले शब्द पुन्हा पाहण्यासाठी उजव्या एरो वर. अजून आपल्या मदतीसाठी किबोर्ड पण आहे कोणती अक्षर त्यासाठी नेच्या बाजूला असणाऱ्या किबोर्ड आयकोन वर क्लिक करा.बंद करायचा असेल तर परत त्याच आयकोन वर क्लिक करा.

(सुचना:विंडोज७ मध्ये वर दाखवल्या प्रमाणे वापरता येईल.) 


कल्पना,लेखन,मांडणी : किशोर रामचंद्र कदम.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा