अष्टविनायकांनपैकी सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा तिसरा गणपती.


श्री सिध्दीविनायक


महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक या गांवी सिध्दीविनायक हे क्षेत्र फार जागृत स्थान मानले जाते.भिमा नदीच्या काठावर सिध्दटेक हे गांव बसलेले आहे. सिध्दीविनायक हे नांव गणेशाला कसे पडले या संबधी एक प्राचीन पौराणिक कथा अशी आहे की, अती प्राचीन काळी श्री गणेशाच्या कृपेने ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मीती करण्याची प्रेरण लाभली व ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण्‍ा करण्यास प्रारंभ केला. ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करण्यात मग्न होवून गेले असतांना श्री विष्णु क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असतांना त्यांच्या कानातुन दोन राक्षस जन्मास आले. त्यांची नांवे मधु व कैटभ असे होते. त्यांनी ब्रम्हदेवास त्रास देवून त्यांचे सृष्टी निर्माणचे कार्य बंद पाडले. त्याने सारी सृष्टी भयभीत झाली. मग ब्रम्हदेवाने प्रार्थना करुन विष्णुदेवाला जागे केले. श्री विष्णु जागे होताच ब्रम्हदेवाने त्यांना मधु आणि कैटभ याची माहिती दिली. भगवान विष्णुव मधु-कैटभ यांचे घनघोर युध्द सुरु झाले. पण विष्णुंना त्या राक्षसांचा पराभव करता आला नाही. म्हणुन ते शंकराकडे गेले. श्री शंकरांनी श्री विष्णुंना सांगीतले की युध्दास प्रारंभ करण्यापुर्वी श्री गणेशाचे पुजन केले नाही त्यामुळे तुला अपयश आले. तेव्हा श्री शंकराने श्री विष्णुंना एकाक्षरी व षडाक्षरी असे दोन मंत्र सांगुन त्यांना गणेशाची उपासना करण्यास सांगीतले.

तेव्हा विष्णु एका पवित्र टेकड्यावर आले तेथे त्यांनी "श्री गणेशाय नम:" या षडाक्षरी मंत्राने श्री गजाननाची आराधना केली व तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न झाले. व विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व त्यांनी मधु-कैटभ ह्या दोन राक्षसांना ठार केले. ज्या ठिकाणी विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व श्री गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी विष्णुंनी मंदिर बांधले व त्या ठिकाणी गंडकी शीलेची मुर्ती स्थापना केली. म्हणुन या ठिकाणाला सिध्दटेक व गणेश मुर्तीला सिध्दीविनायक असे म्हणतात. असे हे क्षेत्र अतिशय पवित्र मानले जाते.

भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी हे दोन मोठे उत्सव साजरे केले जातात.
हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा