अष्टविनायकापैकी रांजणगांवचा श्री महागणपती हा चौथा गणपती.



  श्री महागणपती


अष्टविनायकातील हे विनायक स्थान पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यात रांजणगांव येथे आहे. श्री महागणपती हे एक जागृत स्थान म्हणुन प्रसिध्द आहे. ह्या स्थानाला फार मोठा पौराणिक इतिहास लाभलेला आहे. हे क्षेत्र श्री शंकरांनी वसविले आहे असेही म्हटले जाते. येथेच श्री शंकरांनी गृत्समद पुत्राचा - त्रिपुरासुराचा वध केला.

फार पुर्वीच्या काळी गृत्समद नावाचे एक थोर विद्वान पंडीत असे ऋषी होवून गेले. ते महान गणेश भक्त म्हणुन प्रचलीत होते. एकदा त्यांच्या ‍िशंकेतुन एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपला पुत्र मानले. मी मोठा झाल्यावर तीन्ही लोकांवर राज्य करेल असे तो मुलगा म्हणाला मग गृत्समदाने 'गणानां त्वां' या गणेश मंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने जंगलात जावून गणेशाची उपासपा केली गणेशाने प्रसन्न होवून प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. श्री शंकराशिवाय तुला कोणीच पराभुत करणार नाही असाही वर दिला. गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. त्याने सर्व देवांना जिंकले. तेव्हा सर्व देव शंकराला शरण गेले.

मग शंकराचे व त्रिपुरासूराचे फार मोठे युध्द झाले. व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरासूराचा नाश केला. त्रिपुरासूरा बरोबरील युध्दात विजय प्राप्त व्हावा म्हणुन भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मुर्तीची स्थापना केली तोच हा रांजणगांवचा श्री महागणपती.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.
 या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा