अष्टविनायकांपैकी ओझरचा श्री विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती.


श्री विघ्नेश्वर



पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायण गांवापासुन पाच साडे पाच मैलावरील ओझर या गांवात अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे फार मानाचे स्थान आहे. हेस्थान अत्यंत रमणीय असे आहे.
विघ्नासूराच्या कथेचा या स्थानाशी संबध आहे. प्राचीन काळी या विघ्नासूराने पृथ्वी व देव लोकांवरील सर्वच वैदिक सत्कर्माचा नाश करण्यास सुरूवात केली. देवांवर सर्वात मोठे संकट निर्माण झाले. तेव्हा सर्व देवांनी गणेशाची आराधना करण्यास सुरूवात केली. देवांच्या आराधनाने श्री गणेश प्रसन्न झाले.
श्री गणेशाने पराशर ऋषींचा पुत्र होवून विघ्नासूराशी प्रचंड युध्द केले . गणेशाच्या प्रचंड शक्ती मुळे विघ्नासूर जेरीस आला. तेव्हा गजाननाने त्याला आज्ञा केली की,"ज्या ठिकाणी माझे भजन-पुजन-किर्तन चालु असेल तेथे तु जाता कामा नये" त्यावर विघ्नासूराने गजाननाजवळ वर मागीतला, " तुमच्या नावामागे माझे नांव असावे.'विघ्नहर' किंवा 'विघ्नेश्वर' असे नांव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे." त्यावर श्री गजाननाने असे सांगीतले की, "मी तुला माझ्या गणांच्या समुदायात समाविष्ठ करून घेतले आहे."
अशा प्रकारे विघ्नासूराचा पराभव केला म्हणुन गजाननास 'विघ्नेश्वर' किंवा 'विघ्नहर' असे नांव या स्थानाला प्राप्त झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले जातात.
येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा