श्री गिरीजात्मज
पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर पश्चिम तीरावर हे स्थान वसलेले आहे. हे स्थान डोंगरात कोरून काढले असल्यामुळे ह्या स्थानाला 'लेण्याद्री' असे म्हणतात व तेथिल गणेशाला गिरीजात्मज असे नांव आहे.
पार्वतीच्या मनात अशी ईच्छा होती की, गजानन आपला पुत्र व्हावा म्हणुन तीने लेण्याद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून मुर्तीची पुजा अर्चा केली. तेव्हा ती मुर्ती सचेतन होवून पार्वती पुढे प्रकट झाली. याच प्रदेशात गौतम ऋषींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गजाननाचा 'मयुरेश्वर' अवतार झाला. भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले जातात.
जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्या आहेत.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा