श्री वरदविनायक
अष्टविनायकातील श्री वरद विनायक हे गणेश स्थान कुलाबा जिल्हयातील खालापूर तालुक्यात महड या गावी आहे. मन:शांतीसाठी अनेक ऋषीमुनीनी हया स्थानी वास्तव्य केले होते.हया देवस्थानाच्या संबधी पौराणीक कथा अशी आहे की, फार प्राचीन काळी भीम नावाचा राजा होवून गेला त्याला रुक्मागंद नावाचा पुत्र होता. तो एकदा शिकारी साठी वनात गेला असतांना विश्रांतीसाठी वाचवनवी ऋषीच्या आश्रमात थांबला. रक्मागंदच्या तारुण्यावर भाळून ऋषीची पत्नी मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली. तिने रुक्मागंदाला आपल्या मनातला हेतू सांगितला. पण रुक्मागंदाने त्या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने रुक्मागंदला 'तु कुष्ठ रोगी होशील ' असा शाप दिला त्यावर रुक्मागंदाने गजाननाची उपासना केली . त्याच्या रोगावर उपाय म्हणून नारदांनी कदंब नगरातील कदंब तीर्थस्नान करावयास सांगितले. नारदांच्या आदेशानुसार रुक्मागंदाने स्नान केल्यामुळे तोरोग मुक्त झाला. रुक्मागंद निघून गेल्यावर कामवासनेने व्याकुळ झालेली मुकुंदेची अवस्थापाहून रुक्मागंदाचे रुप घेवून इंद्राने मुकुंदेची इच्छा पुर्ण केली. त्याच्या पासून मुकुंदेला पुत्र प्राप्ती झाली. त्याच पुत्राचे नांव गृत्समद ऋषी.
गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीती झाली होती. तु ऋषी पुत्र नाही म्हणून त्याचा पदोपदी अपमान होवू लागला. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले. व तिला शाप दिला व मुकुंदेनेही त्याला शाप दिला की, तिन्ही लोकाला भयभीत करणारा राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणून पापमुक्तीसाठी गृत्सगंद पुष्पक वनात तप करु लागला. तपश्चर्या केल्यावर त्याला श्री गणेशाने प्रसन्न होवून वर मागण्यास सांगीतले. तेव्हा तो म्हणाला देवा तु सिध्दीदायी आहेस तेव्हा तु हया क्षेत्री कायमचे वास्तव्य कर. गणेशांनी ते मान्य करताच गृत्समदाने वरदविनायक या नावाने गजाननाच्या मुर्तीची स्थापना केली. तेच आजचे महड क्षेत्र होय.
भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी हे दोन प्रमुख उत्सव आहेत
हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.
या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.
रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा