उनाड कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
उनाड कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

या कवितेत किती मुलींची नावे आहेत सांगा पाहू ?

या कवितेत किती
मुलींची नावे आहेत सांगा पाहू ?
नक्की कमेंट करा
कवितेला मी माध्यम बनवून
एकच अर्चना माझी जाणून
कोणासमोर आणू दर्शना
प्रकट करतोय माझी भावना.
प्रेरणा कुठे दिसत नाही
स्वप्नासाठी जगतोय मीच माझी प्रतिमा पाहून
जगी स्नेहाची ओळख देतोय
रेशमाचे जुने नाते
अभिलाषा मनात आणते
आठवून ती निवेदिता
प्रचिती रसिका येते प्रीतिने मज फूल द्यावे
तृप्तीने नयनात झुलावे
कोमल सरोज सुन्दर असुनही
प्रजक्ताला जवळ घ्यावे
कल्पना कल्पिता मानसी
चांदण्यात कृतिका हसली संगीताशी इतकं नातं जुळलं
की सीमा सोडावी लागली
विणाने वेडं केलं
मैफिलीत शोभा आली
मग मेघाने घोळ घातला
आणि रुचा निघून गेली श्रद्धा आलो घेउन
ओढ़ लागली भक्तीची
मनात माझ्या पूजा ठेवून
वाट पाहिली आरतीची
अमृताचा शोध घेतांना
संजीवनी जीवनी आली समृद्धीच्या नादात
शांती विसरावी लागली
आधी विद्या मग किर्ती
निशानंतर उषा जाशी
आधी माया मग मोहिनी
छायानंतर ज्योति जशी..

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
गोरी गोरी नसली तरी चालेल सावळी दे
श्रीमंत नसली तरी चालेल गरीब दे
जी माझ्या मनाला समजेल
जी माझ्या हृदयाला जपेल ...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
गेले कित्येक वर्षे मी मित्रांच्या गर्लफ्रेंडला बघत आलो
गेले कित्येक दिवस नुसते स्वप्नेच बघत बसलो
पण देवा आता तरी ऐक न माझे
कुठे तरी सेटिंग लाऊन दे
पण देवा आता तरी ऐक न माझे
माझ्या हातात तिचा हात येऊ दे...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
जी जीवनात माझ्या सुख आणेल
माझी स्वप्ने पूर्ण करायला मदत करेल
जी दुखत माझ्या सहभागी असेल
अश्रू पुसायला प्रथम तिचा हात असेल...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
जी मी काळा का गोरा बघणार नाही
नको त्या अपेक्षा करणार नाही
जी मी श्रीमंत का गरीब पाहणार नाही
नको त्या कारणावरून भांडणार नाही...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
जी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवेल
काटेरी रस्त्यावर चालताना हात सोडणार नाही
जी विश्वासघात करणार नाही
प्रेमामध्ये कधी स्वार्थ बघणार नाही...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
आता तरी माझी हवा होऊ दे
आपल्याकडे पण आहे चिकणी पोरगी
आता तरी शायनिंग मारू दे
आपल्याकडे पण आहे पार्टी
एक एक बेअर होऊन जाऊ दे...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
वाट बघून बघून म्हातारा होईल रे मी
काही तरी जुळवून दे
स्वप्ने बघून बघून वेडा होईल रे मी
काही तरी मिळवून दे...

या वर्षी तरी देवा मला एक गर्लफ्रेंड दे
ह्या वर्षाकडून खूप केल्या आहेत अपेक्षा ...
करू नको उपेक्षा
ह्या देवाकडून खूप आहेत आशा ...
करू नको निराशा.

बाळुचे अफ़ेअर...

एकदा ठरवल बाळुने करुया एक अफ़ेअर
बायको, समाज, सगळ्यांची सोडुन देउ केअर

अफ़ेअर वगैरे करायला बाळुला कधी मिळालच नव्हत
विरहात व्याकुळ व्हायला त्याला कधी जमलच नव्हत

आयुष्याच गाडं त्याच्या छान मार्गाला लागलं होतं
संसाराच गणित एक आणि एक तीन झालं होतं

रोज रोजच्या कटकटींना बाळुचं मन विटलं
साला रोज आपलं जेवणामधे भात आणि पिठलं

म्हणुनच ठरवल बाळुने सरळ एक अफ़ेअर करायचं
शांत एकसुरी आयुष्य थोडं ढवळुन काढायचं

लगेच शोधली बाळुने ऑफ़िसातली फ़टाकडी
शॉपींग सिनेमा भेळ,चौपाटीवर पाणीपुरी

मस्त मस्त स्वप्ने बघत बाळु झोपु लागला
कसा कोण जाणे बाळुच्या बाळीला संशय आला

एक दिवस सहज बाळु लवकर घरी आला
घरामधला सीन बघुन चक्कर येउन पडला

शेजारचा जोशा बसला होता टेचात
फ़िरवत होता हात बाळीच्या केसात

बघताच त्यांना तसे बाळुचे पित्त खवळले
पुढे जाउन जोशाचे मुस्काट त्याने फोडले

रणचंडीसारखी भेसुर हसत बाळी जोरात ओरडली
भात आणि पिठल खाउन माझीही जीभ कंटाळली

ऐकुन तिचे तसले शब्द बाळु भानावर आला
अफ़ेअर वगैरे करायचा विचार त्याने तिथेच गुंडाळला

तेव्हापासुन बाळु रोज सरळ घरी येतो
गुपचुप घरात रोज वरण भात पिठलं खातो

तुमीच सांगा आम्ही प्रेम कराव का नाय?

अहो करावच म्हणता तर जागा कुठ हाय ?
हजारो लाखो बहाने बनउन
पोरगी भेटायला येते
नाकाला तोंडाला स्कार्प बांधून
आपल्या गाडिवर बसते
पाठी माघुन मूल ओरडतात ये आर ...चाललाय काय ?
तुम्हीच सांगा प्रेम आम्ही कराव का नाय?

कस बस झाड नसलेल्या गार्डेन मधे
आम्ही सुखरूप पोहचतो
दगडाचा सहारा घेत
एकांतात जाऊंन बसतो
थोड्या गप्पा रंगतात तोच
फेरीवाला भैया बोलतो
साब ...कोल्ड्रिंक्स दू क्या चाय ? ....
अहो तुम्हीच सांगा .प्रेम कराव का नाय?

पुन्हा प्रेमाच्या गप्पा
जोरात चालु होतात
न कळत आपले हाथ
त्या पोरीच्या केसात जातात ...
तेवढ्यात कोणाचा तरी आवाज येतो
१ रुपया दोना भाय .....
तुम्हीच सांगा प्रेम आम्ही कराव का नाय?

पुन्हा आम्ही जागा चेंज करतो
दूर जाऊंन खुप गप्पा मारतो ...
तेवढ्यात मुलीच्या घरून फोन येतो
काय ग बाई मंदिरात गर्दी हाय का काय ?
तुम्हीच सांगा प्रेम आम्ही कराव का नाय?

ती मुलगी टेंशन मधे येते
लगेच निघायची तयारी करते
नाराज मनाने आपला
निरोप घेते ....बोलते
सॉरी डिअर पुन्हा भेटू
करते गुड बाय
तुम्हीच सांगा आम्ही प्रेम कराव का नाय?

मुले .........असतातच असे ....

-
मुले .........असतातच असे ....
एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करणारे,
ती आपली होऊ शकत नाही हे माहीत असून फ़क्त तिच्यावरच प्रेम करणारे...
-
मुले .........असतातच असे ....
तिचे सर्व हट्ट पुरवणारे,
फक्त तिला सुखात पाहण्यासाठी सतत निस्वार्थी प्रयत्नात असणारे...
-
मुले .........असतातच असे ....
स्वतः खोडी काढणारे,
पण ती रागावली आहे हे पाहून तिला पुन्हा आनंदाश्रूंत भिजवणारे...
-
खरच काही मुले .........असतातच असे ....
माझ्या सारखे...
हरवलेल्या गर्दित देखील स्वताला विसरून त्यात आपले प्रेम शोधणारे...

♥ मुली ♥

मुली असतात फुलासारख्या ♥
♥ मुली लहान मुलासारख्या ♥
♥ त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे ♥
♥ त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे ♥
♥ मुली म्हणजे relations ♥
♥ मुली म्हणजे emotions ♥
♥ छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्‍या ♥
♥ शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्‍या ♥
♥ मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला ♥
♥ मुली म्हणजे मोर श्रावणातल्या ♥
♥ मुली म्हणजे ठसून सौंदर्य ♥
♥ मुली म्हणजे त्याग औंदर्य ♥
♥ मुली असतात softcorner ♥
♥ मुली असतात melting point ♥
♥ घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point ♥
♥ त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू ♥
♥ पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू ♥
♥ मुली वाटतात हव्याहव्याश्या ♥
♥ मुली वाटतात आपल्याशा ♥
♥ आमच मन समजून घेणार्‍या ♥
♥ दुखात आम्हाला आधार देणार्‍या ♥
♥ कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला ♥
♥ काही नाव नसत पण तरही ते जपायच असत

महाविद्यालायात येतो आम्ही

महाविद्यालायात येतो आम्ही
देऊन परीक्षा दहावीची
अकराविनंतर परत येते
अग्निपरीक्षा बारावीची

बराविनंतर एफ़ व्हाय
आणि एफ़ व्हाय नंतर एस व्हाय
एस व्हाय नंतर फायनल
परिक्षेविना नाही उपाय

चार क्षणांचे दिवस सुनहरे
साबणासारखे जाती निसटुनी
स्पर्धा परीक्षा महोत्सवांमध्ये
दिवस सारे जाती उलटुनी

कधी सिनेमा कधी पिकनिक
दंगा मस्ती मारामारी
कट्ट्या वरती कधी रंगते
पोरांची महाचर्चा भारी

कैन्टीन चा वड़ापाव
तर कधी मित्रांची जंगी पार्टी
चौपाटीला फिरणे घूमणे
बैंडस्टैंडला तर कधी स्वारी

कुठे चालते रडारड
तर कुठे पिकतो हशा
कुठे रंगतो प्रणय तर
कुठे A.T.K.T. वाल्यांची दशा

लायब्ररीही फुलून जाते
स्कॉलर लोकांच्या गर्दीने
सभागृह ही दणाणुन जाते
नाटकान्च्या दर्दिने

दिवस असे हे कॉलेजचे
जातील कसे विस्मरणी
रोमांच आणतिल क्षणोक्षणी
ते शेवटच्या ही क्षणी

कॉलेजला जाताना

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..

त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
“प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली.”

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
“थांब गाडी लावुन येतो!” म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली

शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली “सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली.

आजकालच्या ह्या मुली

 आजकालच्या ह्या मुली
फ़ार पुढे गेल्यात
सलवार कमीज विसरुन
आता जीन्सवर आल्या
बाहेर जान्यासाठी ह्या
तासनं तास नटतात
घरच्यांना थाप मारुन
बाहेर पोरांना भेटतात
गाडिवर बसुन ह्या
होऊ पाहतात स्मार्ट
हज़ार कीक मारुनसुध्द्या
यांची गाडी नाही होत स्टार्ट
सलवार कुडता यांचा
आता इतिहासात जमा झाला
टाईट टाईट जीन्सने
शहरात धुमाकुळ केला
यांच्या ड्राइविंग पायी
ट्राफ़ीक पोलिस हैरान होतात
कारन ह्या दाखवुन हाथ उजवीकडे
गाडी डावीकाडे नेतात
पुरुषांचे प्रत्येक शौक
यांनी त्वरीत आत्मसात केले
बिअर बार मध्ये जाऊन
सर्व ग्लास रिकामे केले
सिगरेट ओढायला सुध्दा
ह्या पुढेमागे पहात नाही
अती मध्यपानाने मग
कपड्यावर ध्यान राहत नाही
म्हनुनच जिकडे तिकडे नारा आहे
“ladies first ladies first”
Not in salawar
but only in mini skirt

तुम्ही पण कमाल करता यार!

तुम्ही पण कमाल करता यार!
प्रेमाच्या गोष्टी करता यार?
प्रेम on-line खुलते आजकाल
ह्रिदयामधे जपता यार?
scrap,sms हे प्रेमाचे बोल
डोळ्यांची भाशा बोलता यार?
प्रत्येक Forum वर एक मैत्रीण.
एकाच अबोली साठी झुरता यार
messages आणि chat सोडून
बाहेर भटकायच म्हणता यार?
Blogs वाचायचे मिळतिल ते
तुम्ही पुस्तके वचता यार?
Community मधे रमायचे आता
चौकात गप्पा मरता यार?
धावयचे सोडून जगासोबत
स्वप्नां मधे रमता यार?
ह्रिदयात जागा मागता यार?
अरे!कोणत्या जगात जगता यार?

टपरी

सन्ध्याकाळची वेळ, सगळे जमायचो,
काँलेज सुटलेकी इकडेच यायचो,
वरती छत नाही, फ़टक्या भीन्ति, दोन चार तुटक्या बाकडी,
अश्या तुटक्या फ़ुटक्या विसाव्याच्या जागेला अम्ही ‘टपरी’ म्हणायचो.
पास, नापास तर कधि अभ्यासाला न्याय,
शेरो शयरी टवाळक्या तर कधी प्रेमचे अध्याय,
ह्या सगळ्या गोष्टिऩ्वर एकच उपाय,
सिगारेट का धुआ और उधार की चाय.
मुव्हि, नाटक, पिकनिकचे तर प्ल्यान बनवीले डिस्कोथेकचे,
कधि बर्थडे बम्प्चे तर अस्वाद घेतले कधि केकचे,
इथेच पराक्रम केलेत आम्ही पोरगी पटविण्याचे,
तर भान्डणात नकाशेही बदलीविलेत अनेकान्चे.
उन्हाळे, पावसळे,हिवाळे गेले,
आणी टपरी प्रेम आमचे वाढतच गेले,
पण एक दिवस टपरी सोडावी लागेल,
या विचाराने मन रडू लागले.
वेळ बदलला काळ बदलला, मीत्रान्चा आता साथ सुटला,
मनात इथली फ़क्त आठवण आहे,
आम्ही नसलो तरी काय झाले,
टपरी अजुणही तशीच सदाबहार आहे.

आमची कंपनी

आमच्या Software कंपनीची
बातच काही और आहे
येथे दिवसाचाही दिवस
आनी रात्रीचाही दिवस आहे
सकाळी सकाळी येथे
कामाचा श्रीगणेशा होतो
जरा उशीर झाल्यावर मात्र
मुंबईसारखा एक बोम्बस्फ़ोट होतो
बोनसचा वादा नेहमी येथे
क्षनात विसरला जातो
वाढदिवस सर्वांचा मात्र
आठवनीने साजरा होतो
दर दोन महिन्यांनी येथे
नव्या जागेच्या स्वप्नाची असते खिरापत
सोडुन कुनी गेल्यावर मात्र
होते Increment चे वाटप..
चहा Cofee च्या नावाने येथे
ज्युस झुरळाचा पाजला जातो
टी-मशिन स्वच्छ करनारा मात्र
वर्षातुन एकदाच बोलावला जातो
बाथरूम मध्ये झोपन्याची
येथे मजाच काही और आहे
बाथरूम कम मोबईल रूम
येथे नेहमीच एंगेज आहे
बाथरूम मध्ये जाण्यासाठी येथे
नशीब जोरावर असावं लागतं
दरवाजा Lock झाल्यावर मात्र
गाडीच्या चाबीनेच उघडावं लागतं
लंच नंतर येथे चहाचा
वेध सुरु होतो
चहावाला वेळेवर मात्र
रोज देवासारखा येतो
प्रत्येक जन येथला
रात्री उशीराच घरी जातो
बायको पोरं झोपल्यावर
एकटाच जेवन घेतो
बायका मुलांना यांचे
दर्शन कधी होत नाही
मुले विचारतात आईला
पप्पा नेहमी घरी कसे दिसत नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
दिलखुलास शिवी कानी पडतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…
आज इथे उद्या तिथे…कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन………………..
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही….

Miss Call

खुप विचार केला, पण
Answer काही सापडेना |
तुझ्या कडुन येणा-या
Miss Call च गुपित काही उघडेना ||
काम तुझं असुन ही,
Miss Call मला करतेस |
माझा फोन जो वर येइना,
Call वर Call करतेस ||

म्हणुनच मला Question पडलाय,
तु नेहमीच Miss Call का करतेस? |
Monthly मिळणा-या Talk Time च
Actually तु काय करतेस? ||
असं ही मला समजलंय,
तु सर्वांनाच Miss Call मारतेस |
कीतीही Urgent असलं तरी ही,
पैशाची बचत करतेस ||

असं ही नाही की,
तु खुप Poor आहेस
आणि Economically संकटात आहेस ||
म्हणुनच कधीतरी
Call ही करत जा ||
एवढे रुपये देऊन Mobile विकत घेतला,
त्याचा पुरेपुर Benefit घेत जा ||
Eagerly मैत्रीसाठी, प्रेमापोटी मी ही,
तुझ्या Miss Call ला Reply देतो |

Now आता असं होणार नाही,
Just एवढंच तुला सांगतो ||
तु समजदार आहेस,
या पुढे Call करशील |
Talk Time कडे न बघता,
माणुसकीला जपशील ||

'कोल्हापूर'ची शान

रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला महाद्वारच्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'गोकुळ' कितीही स्वस्त झालं तरी 'कट्यावरच' गर्दी असेल,
आणि तांबड्या पांढ-या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

'थेम्स' च्या काठी बसलो तरी 'रंकाळ्याचीच' आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल ॥

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या गुळाची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही ॥

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी कोल्हापुरीच हवी असेल ॥

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कुस्तीचा' मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'कोल्हापूर'ची शान नाही ॥

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा

मित्राणो प्रेम करू नका प्रयत्न करा
कारण प्रेमात हो किंवा नाही असते
प्रयत्नात ही नाहीतर ती असते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मागणी घालू नका प्रपोज़ मारा
कारण मागणी नंतर एकतर पती श्रीराम नाहीतर राम राम
प्रोप्से मधे लवरशिप मिळाली तर ठीक
नाहीतर फ्रेंडशिपतर असतेच असते
फ्रेंडशिप मधे काही दिवसानी का होईना पोरगी फसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

मित्राणो मूलीना सीरियस घेऊ नका टाइम पास करा
सिरियस व्हाल तर हमखास मराल
टाइम पास कराल तर राहाल ऑल टाइम सुखी
भेटली तर पा रो नाहीतर चंद्र मुखी
शेवटी पा रो आणि चंद्र मुखी कोणीच कायमची नसते
ती मिळाली तर ठीक नाहीतर तिची मैत्रीण सुंदर दिसते

एकच कांन मंत्र पाळा मित्राणो
जय देवी जय देवी जय बायको
तू सांगेल ते ते मी आयको
जग म्हणेल काय बायकोचा चमचा आहे
सांगा जगाला तो प्रश्‍न आमचा आहे
शेवटी बायकोच आपल्याला आयुष्य भर सोसते
मित्राणो बायको फक्त आपलीच बायको चांगली असते

प्रेम करायला अजुन जमलेच नाही

आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही!!!!!!!!!
कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दिवस " व्हालेंटाइन डे " नंतरचा

दिवस " व्हालेंटाइन डे " नंतरचा
ती नाही म्हणाली म्हणून
त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला
पण त्याचा हा निर्णय
त्याच्या अंगावर चांगलाच बेतला
घरात कोणी नसताना त्याने
गळफास लावण्याचा प्रयत्न केला
मरण राहिल बाजूला
आणि तो फ्यान सकट खाली आला
आणि काय सांगू ?
घरातले यायच्या अगोदर त्याने
पटापट सगले आवरून घेतले
दुःख राहिले बाजूला कारण.....
मानेच्या दुखान्यनेच त्याला सावरून घेतले
दुखारया मानेला आता तो
पट्टा लावून बसतो
आणि कशी जिरली आपली
म्हणून गालातल्या गालात हसतो....

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

" इश्य..... " म्हणून मन खाली घालतच नाहीत.....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

" नवीन ड्रेस का ? " विचारले तर ह्यांना येतो संशय!!
" नाही रे, जुनाच आहे " म्हणून बदलतात विषय.
नकट्या नाकावर लटका राग दिसतंच नाही,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

मी घाऱ्या डोळांचे कौतिक करावे,
मग तिनेही गालात खुदकन हसावे...
कसलेच काय........ आज काळ गालांना
खळ्या त्या कशा पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

उद्या घोड्यावर बसून येईल एखादा उमदा तरुण,
" होशील का माझी राणी" विचारील हातात हात घेऊन....
गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत,

पोर लग्नाची झाली म्हणून घरी आई- बाप काळजीत,
" माझा नवरा मी केव्हाच शोधलाय " - त्या सांगतात ऐटीत...
घरून होकारासाठी थांबतच नाहीत......
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत......

नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी

नेहमी प्रमाणेच कामावर जाण्यासाठी, सकाळी धावपळ माझी सुरु होती |
जाणा-या रस्त्यावर दोन, गाढवांची जोडी उभी होती ||
मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
जोक्स बघ, जोक्स बघ , असं आपसात बोलु लागले ||
मी म्हणालो, काय रे बाबांनो... कालचा लाफ्टर चॅलेंजर शो बघितला का? |
आणि कालचा जोक तुम्हाला आता समजला का? ||
( तेवढ्यात एक गाढव मला म्हणाले...)
उगाच वेळ घालवण्याची आम्हांला सवय नाय |
माणुसच एक जोक आहे, मग शो बघण्याची गरजच काय? ||
कारण हल्लीची माणसं फक्त दिसायलाच माणुस दिसतात |
वरुन किर्तन, आतुन तमाशा, अशा प्रकारे वागतात ||
सुखाच्या मागे धावता धावता विवेक पडतो यांचा गहाण |
पाण्यात राहुनही माशाची भागत नाही जशी तहान ||
पैशाच्या मागे धावता धावता दमछाक होते यांची खुप |
वाटी वाटीने ओतले तरीही कमीच पडते यांना तुप ||
बायका आणि पोरांसाठी, चाले म्हणे हा खेळ |
ज्या देवाने घडवले यांना, त्या देवासाठी नसतो यांना वेळ ||
माण्सांच वागणं सरड्यासारखं, नेहमीच बदलत राहतं |
माणसांपेक्षा आज इमानदार गाढव, असं उदाहरण द्यावं लागतं ||
आम्ही गाढव, आम्ही गाढव आता अभिमानाने हे सांगतो |
म्हणुन तर माणुस दिसताच, खुप जोरजोरात हसतो ||
त्यांनी म्हटलं, मला पटलं, मी तिथुन निघुन जाणच बरं समजलं!
आता तरी विचार करा, आणि माणसासारखा व्यवहार करा!

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा