श्री गणेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्री गणेश लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गौरीपूजन

卐 गौरीपूजन 卐

गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते.

यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांचे राज्य होते. दानव देवांना फार त्रास देत असत. सर्व देवांच्या स्त्रियांना ह्यामुळे आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण तीन दिवस साजरा केला जातो. आपले सौभाग्य अखंड रहावे हा त्यामागचा हेतु असतो.

गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचांगात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात.

कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. एखादी सवाष्ण किंवा मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी अथवा विहीरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. तेथून खडे वाजत गाजत घरी आणतात. गौरी आणताना ज्या सवाष्णीने ताम्हणात खडे घेतले असतील तिने मुक्याने चालावे असा रिवाज आहे. खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या किंवा मुलीच्या हातात ताम्हण असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद कुंकू लावून मग तिला घरात घेतात. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून खडे ठेवतात. उभ्या गौरींची खास पातळे व दागिने असतात. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. दोन सवार्ष्णीं गौरी घरी आणतात. गौरी आणावयाच्या दिवशी पुढील दारापासून मागील व दारापासून ज्या ठिकाणी गौरी बसवायच्या तिथपर्यंत गौरीची पावले काढतात. गौरी आणतेवेळी 'गौरी कशाच्या पाऊली आली प्र सोन्या-मोत्याच्या पाऊली आली 'असे म्हणत गौरी आणतात. एकीने पुढील दारापासून तर दुसरीने मागील दारापासून गौरी आणाव्यात अशी पद्धत आहे. उंबरठावरती धान्य भरून माप ठेवतात. दोन्ही सवार्ष्णींनी उंबरठाच्या एका बाजूला उभे राहून गौरी मापाला चिकटवून माप लवंडून व नंतर त्यांना गणपती, जिवती, दुभत्याचे कपाट, कोठीची खोली, दागिन्यांची पेटी दाखवतात. नंतर गौरी जागेवर बसवतात.

गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ऒटी ठेवतात. खोब-याची वाटी, फळे, कुंकवाचे करंडे ठेवतात. काही बायका गौरींपुढे लाडू, करंज्या, चकल्या इ. ताजे पदार्थ करून ठेवतात. गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा,गेजवस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. त्याच दिवशी पाच स्त्रियांना हळद-कुंकू, साखर देतात. दुस-या दिवशी पुरणाचे दिवे करून आरती करतात. गौरी जेवल्यावर गौरीपुढे दोन गोविंद विडे ठेवतात. साधारणपणे पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी हे मुख्य पदार्थ व इतर कोणतेही पदार्थ केले जातात. दुस-या दिवशी मुख्यत… पुरणपोळी करतात. तळण, खीर व बाकीचा स्वयंपाक इतर सणाप्रमाणे करतात.
तिस-या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य हे प्रमुख पदार्थ करतात.
तिस-या दिवशी संध्याकाळी चार वाजल्यानंतर केव्हाही गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.

अष्टविनायकांपैकी पालीचा श्री बल्लाळेश्वर हा आठवा गणपती.

श्री बल्लाळेश्वर

रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात अष्टविनायकातील पाली चा "श्री बल्लाळेश्वर " हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे.फार पुर्वी सिंध नावाच्या देशात पाली नावाचे एक गांव होते त्यागावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता तो आपल्या मित्रासोबत गावाबाहेर खेळत असे. दगडाचे देव करायचे. फुले पाने तोडून त्या देवांची पुजा करायची असे ते खेळत असे. एक दिवस बल्लाळ आपल्या मित्रांसोबत जंगलात खेळायला गेला होता त्याला तेथे एक छानसा गुळगुळीत दगड सापडला त्याने त्या दगडाला गणपती असे नाव दिले . व त्याची पुजा करु लागला. बराच वेळ हा खेळ असाच चालु राहिला त्यामुळे ती मुले घरी परतली नाही. गावातल्या लोकांनी बराच वेळ शोध घेतल्यावर ती मुले बल्लाळ सोबत जंगलात आढळली. तेव्हा गावकर्‍यांनी चिडून त्याच्या वडीलांकडे बल्लाळाची तक्रार केली त्यावर कल्याण रागानेच जंगलाकडे गेला. जंगलातले दृष्य पाहून कल्याण जास्तच संतापला कारण सर्व मुले गणपतीच्या खेळातदेवासमोर नाचत होती व बल्लाळ ध्यान लावून बसला होता. मुलांनी तयार केले ले मंदिर त्याने उध्वस्त केले. ते पाहताच मुलांनी तेथुन पळ काढला. पण बल्लाळ मात्र ध्यानात गढुन गेला होता. ते पाहून कल्याणने तेथिल झाडाची फांदी घेवून बल्लाळच्या अंगावर चार पाच घाव केले. ऐवढे करुनही त्याचे ध्यान तुटले नाही. ते पाहून कल्याण अधिक चिडला व त्याने बल्लाळाला झाडाला बांधले. पण बल्लाळ मात्र गणेशाचा जप करत होता. बल्लाळाला बांधून कल्याण घरी निघून गेला तरी त्याचा जप चालुच होता. थोडयावेळाने त्याचे डोळे उघडले. तेव्हा त्याला दिसले गणपतीचे मंदिर मोडले आहे. तो म्हणाला ज्याने तुझी अवस्था केली आहे तो आंधळा, मुका व बहिरा होईल. त्याच्या शरीरातुन दुर्गंधी बाहेर पडेल. ते बोलुन पुन्हा तो श्री गणेशाची पुजा करायला लागला. त्याच्या भक्तीला प्रसन्न होवून गणेशाने बल्लाळला भेटण्याचे ठरविले. एका गरीब ब्राम्हणाचे रुप घेवून श्री गणेश त्या जंगलाकडे निघाले. बल्लाळाला ज्या झाडाला बांधले होते त्या झाडाजवळ गेले व त्याने बल्लाळाकडे पहाताच त्याचे बंधन सुटले व त्याच्या जखमा चांगल्या झाल्या. तेव्हा श्री गणेश म्हणाले तुला काही मागायचे असेल तर मागुन घे. हे एकुण बल्लाळ म्हणाला मला वर देणा असेल तर ऐवढाच द्या की आपल्या ठिकाणी भक्ती कायम राहावी. व आपण या क्षेत्री कायम रहिवास करुन भक्ताची सर्व संकटे दुर करवीत तेव्हा गणेश म्हणाले तु फार चांगला वर मागीतलास तर तुझ्या मांगण्याप्रमाणे मी वास करेल. शिवाय या ठिकाणी माझे स्थान बल्लाळविनायक म्हणून प्रसिध्द होईल.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला येथे प्रमुख उत्सव होतो.

 या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

अष्टविनायकांपैकी महडचा श्री वरदविनायक हा सातवा गणपती.

श्री वरदविनायक

अष्टविनायकातील श्री वरद विनायक हे गणेश स्थान कुलाबा जिल्हयातील खालापूर तालुक्यात महड या गावी आहे. मन:शांतीसाठी अनेक ऋषीमुनीनी हया स्थानी वास्तव्य केले होते.हया देवस्थानाच्या संबधी पौराणीक कथा अशी आहे की, फार प्राचीन काळी भीम नावाचा राजा होवून गेला त्याला रुक्मागंद नावाचा पुत्र होता. तो एकदा शिकारी साठी वनात गेला असतांना विश्रांतीसाठी वाचवनवी ऋषीच्या आश्रमात थांबला. रक्मागंदच्या तारुण्यावर भाळून ऋषीची पत्नी मुकुंदा त्याच्यावर अनुरक्त झाली. तिने रुक्मागंदाला आपल्या मनातला हेतू सांगितला. पण रुक्मागंदाने त्या गोष्टीला नकार दिला. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने रुक्मागंदला 'तु कुष्ठ रोगी होशील ' असा शाप दिला त्यावर रुक्मागंदाने गजाननाची उपासना केली . त्याच्या रोगावर उपाय म्हणून नारदांनी कदंब नगरातील कदंब तीर्थस्नान करावयास सांगितले. नारदांच्या आदेशानुसार रुक्मागंदाने स्नान केल्यामुळे तोरोग मुक्त झाला. रुक्मागंद निघून गेल्यावर कामवासनेने व्याकुळ झालेली मुकुंदेची अवस्थापाहून रुक्मागंदाचे रुप घेवून इंद्राने मुकुंदेची इच्छा पुर्ण केली. त्याच्या पासून मुकुंदेला पुत्र प्राप्ती झाली. त्याच पुत्राचे नांव गृत्समद ऋषी.

गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहीती झाली होती. तु ऋषी पुत्र नाही म्हणून त्याचा पदोपदी अपमान होवू लागला. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले. व तिला शाप दिला व मुकुंदेनेही त्याला शाप दिला की, तिन्ही लोकाला भयभीत करणारा राक्षस तुझ्या पोटी जन्माला येईल म्हणून पापमुक्तीसाठी गृत्सगंद पुष्पक वनात तप करु लागला. तपश्चर्या केल्यावर त्याला श्री गणेशाने प्रसन्न होवून वर मागण्यास सांगीतले. तेव्हा तो म्हणाला देवा तु सिध्दीदायी आहेस तेव्हा तु हया क्षेत्री कायमचे वास्तव्य कर. गणेशांनी ते मान्य करताच गृत्समदाने वरदविनायक या नावाने गजाननाच्या मुर्तीची स्थापना केली. तेच आजचे महड क्षेत्र होय.
भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी हे दोन प्रमुख उत्सव आहेत

 हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.

अष्टविनायकापैकी लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा सहावा गणपती.

श्री गिरीजात्मज

पुण्याच्या उत्तरेस कुकडी नदीच्या उत्तर पश्चिम तीरावर हे स्थान वसलेले आहे. हे स्थान डोंगरात कोरून काढले असल्यामुळे ह्या स्थानाला 'लेण्याद्री' असे म्हणतात व तेथिल गणेशाला गिरीजात्मज असे नांव आहे.
पार्वतीच्या मनात अशी ईच्छा होती की, गजानन आपला पुत्र व्हावा म्हणुन तीने लेण्याद्री पर्वताच्या गुहेत बारा वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्येने गजानन प्रसन्न झाले. भाद्रपद चतुर्थीला पार्वतीने गजाननाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करून मुर्तीची पुजा अर्चा केली. तेव्हा ती मुर्ती सचेतन होवून पार्वती पुढे प्रकट झाली. याच प्रदेशात गौतम ऋषींनी गणेशाची मुंज केली. याच प्रदेशात गजाननाचा 'मयुरेश्वर' अवतार झाला. भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले जातात.

जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

अष्टविनायकांपैकी ओझरचा श्री विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती.

श्री विघ्नेश्वर

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नारायण गांवापासुन पाच साडे पाच मैलावरील ओझर या गांवात अष्टविनायकातील श्री विघ्नेश्वर हे फार मानाचे स्थान आहे. हेस्थान अत्यंत रमणीय असे आहे.
विघ्नासूराच्या कथेचा या स्थानाशी संबध आहे. प्राचीन काळी या विघ्नासूराने पृथ्वी व देव लोकांवरील सर्वच वैदिक सत्कर्माचा नाश करण्यास सुरूवात केली. देवांवर सर्वात मोठे संकट निर्माण झाले. तेव्हा सर्व देवांनी गणेशाची आराधना करण्यास सुरूवात केली. देवांच्या आराधनाने श्री गणेश प्रसन्न झाले.
श्री गणेशाने पराशर ऋषींचा पुत्र होवून विघ्नासूराशी प्रचंड युध्द केले . गणेशाच्या प्रचंड शक्ती मुळे विघ्नासूर जेरीस आला. तेव्हा गजाननाने त्याला आज्ञा केली की,"ज्या ठिकाणी माझे भजन-पुजन-किर्तन चालु असेल तेथे तु जाता कामा नये" त्यावर विघ्नासूराने गजाननाजवळ वर मागीतला, " तुमच्या नावामागे माझे नांव असावे.'विघ्नहर' किंवा 'विघ्नेश्वर' असे नांव धारण करून या क्षेत्री वास्तव्य करावे." त्यावर श्री गजाननाने असे सांगीतले की, "मी तुला माझ्या गणांच्या समुदायात समाविष्ठ करून घेतले आहे."
अशा प्रकारे विघ्नासूराचा पराभव केला म्हणुन गजाननास 'विघ्नेश्वर' किंवा 'विघ्नहर' असे नांव या स्थानाला प्राप्त झाले.
भाद्रपद शुध्द चतुर्थी व माघ शुध्द चतुर्थी असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले जातात.
येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

अष्टविनायकापैकी रांजणगांवचा श्री महागणपती हा चौथा गणपती.

  श्री महागणपती

अष्टविनायकातील हे विनायक स्थान पुणे जिल्हयातील शिरुर तालुक्यात रांजणगांव येथे आहे. श्री महागणपती हे एक जागृत स्थान म्हणुन प्रसिध्द आहे. ह्या स्थानाला फार मोठा पौराणिक इतिहास लाभलेला आहे. हे क्षेत्र श्री शंकरांनी वसविले आहे असेही म्हटले जाते. येथेच श्री शंकरांनी गृत्समद पुत्राचा - त्रिपुरासुराचा वध केला.

फार पुर्वीच्या काळी गृत्समद नावाचे एक थोर विद्वान पंडीत असे ऋषी होवून गेले. ते महान गणेश भक्त म्हणुन प्रचलीत होते. एकदा त्यांच्या ‍िशंकेतुन एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. गृत्समदाने त्याला आपला पुत्र मानले. मी मोठा झाल्यावर तीन्ही लोकांवर राज्य करेल असे तो मुलगा म्हणाला मग गृत्समदाने 'गणानां त्वां' या गणेश मंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने जंगलात जावून गणेशाची उपासपा केली गणेशाने प्रसन्न होवून प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. श्री शंकराशिवाय तुला कोणीच पराभुत करणार नाही असाही वर दिला. गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत झाला. त्याने सर्व देवांना जिंकले. तेव्हा सर्व देव शंकराला शरण गेले.

मग शंकराचे व त्रिपुरासूराचे फार मोठे युध्द झाले. व शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरासूराचा नाश केला. त्रिपुरासूरा बरोबरील युध्दात विजय प्राप्त व्हावा म्हणुन भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मुर्तीची स्थापना केली तोच हा रांजणगांवचा श्री महागणपती.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो.
 या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

अष्टविनायकांनपैकी सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा तिसरा गणपती.

श्री सिध्दीविनायक

महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक या गांवी सिध्दीविनायक हे क्षेत्र फार जागृत स्थान मानले जाते.भिमा नदीच्या काठावर सिध्दटेक हे गांव बसलेले आहे. सिध्दीविनायक हे नांव गणेशाला कसे पडले या संबधी एक प्राचीन पौराणिक कथा अशी आहे की, अती प्राचीन काळी श्री गणेशाच्या कृपेने ब्रम्हदेवाला सृष्टीची निर्मीती करण्याची प्रेरण लाभली व ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण्‍ा करण्यास प्रारंभ केला. ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करण्यात मग्न होवून गेले असतांना श्री विष्णु क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असतांना त्यांच्या कानातुन दोन राक्षस जन्मास आले. त्यांची नांवे मधु व कैटभ असे होते. त्यांनी ब्रम्हदेवास त्रास देवून त्यांचे सृष्टी निर्माणचे कार्य बंद पाडले. त्याने सारी सृष्टी भयभीत झाली. मग ब्रम्हदेवाने प्रार्थना करुन विष्णुदेवाला जागे केले. श्री विष्णु जागे होताच ब्रम्हदेवाने त्यांना मधु आणि कैटभ याची माहिती दिली. भगवान विष्णुव मधु-कैटभ यांचे घनघोर युध्द सुरु झाले. पण विष्णुंना त्या राक्षसांचा पराभव करता आला नाही. म्हणुन ते शंकराकडे गेले. श्री शंकरांनी श्री विष्णुंना सांगीतले की युध्दास प्रारंभ करण्यापुर्वी श्री गणेशाचे पुजन केले नाही त्यामुळे तुला अपयश आले. तेव्हा श्री शंकराने श्री विष्णुंना एकाक्षरी व षडाक्षरी असे दोन मंत्र सांगुन त्यांना गणेशाची उपासना करण्यास सांगीतले.

तेव्हा विष्णु एका पवित्र टेकड्यावर आले तेथे त्यांनी "श्री गणेशाय नम:" या षडाक्षरी मंत्राने श्री गजाननाची आराधना केली व तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न झाले. व विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व त्यांनी मधु-कैटभ ह्या दोन राक्षसांना ठार केले. ज्या ठिकाणी विष्णुंना सिध्दी प्राप्त झाली व श्री गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी विष्णुंनी मंदिर बांधले व त्या ठिकाणी गंडकी शीलेची मुर्ती स्थापना केली. म्हणुन या ठिकाणाला सिध्दटेक व गणेश मुर्तीला सिध्दीविनायक असे म्हणतात. असे हे क्षेत्र अतिशय पवित्र मानले जाते.

भाद्रपद शुध्द प्रतिपदा ते पंचमी व माघ शुध्द प्रतिपदा ते पंचमी हे दोन मोठे उत्सव साजरे केले जातात.
हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती.

श्री चिंतामणी
 
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात अष्टविनायकातील महत्वाचे स्थान मानले जाते. हे क्षेत्र अति प्राचीन व जागृत देवस्थान समजले जाते. यास्थानाची पुराणात अशी आख्यायिका सांगीतली जाते की,
एकदा ब्रम्हदेवाच्या मनात चंचलता निर्माण झाली. आपल्या मनातील चंचलता कमी व्हावी यासाठी ब्रम्हदेवाने श्रीगणेशाची चिंतन व आराधना केली. त्यामुळे ब्रम्हदेवाच्या मनातील चंचलता नाहीशी झाली. व ब्रम्हदेवाच्या मनाला शांतता लाभली. त्याठिकाणी ब्रम्हदेवाने श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यागणेश मुर्तीला मनाची चिंता दुर करणारा "चिंतामणी" असे नांव दिले.

आणखी एक कथा अशी सांगीतली जाते की, अहल्येचा अपहार केल्याबद्दल इंद्रला शाप दिला. इंद्र भयभीत झाला व त्याने गौतम ऋषींची क्षमा मागीतली व उ:शाप देण्याची विनंती केली. व गौतम ऋषींच्या आज्ञेने इंद्राने तपश्चर्या केल्यामुळे तो शाप मुक्त झाला. ज्याठिकाणी बसून इंद्राने तपश्चर्या केली त्यास्थानावर इंद्राने गणेशाची स्थापना केली व त्या गणेश मुर्तीस 'चिंतामणी' असे नांव दिले. अशा अनेक कथा पुराणात लिहिल्या गेल्या आहेत.

येथे अनुष्ठान करणार्‍या व्यक्तीला मन:शांती व मनाला स्थिरता प्राप्त होते.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला श्री चिंतामणींचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते.  थेऊरचा विस्तार हा माधवराव  पेशवे यांनी केला.  माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले.  यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)

अष्टविनायकांपैकी मोरगावचा श्री मोरेश्वर हा पहिला गणपती.

श्री मोरेश्वर

महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील मोरगांव हे अष्टविनायकात गणेशोपासनेच्या संप्रदायाचे प्रमुख आद्यपीठ मानले जाते. या क्षेत्राचे मुळनांव "भुस्वानंदभुवन" असे होते. गावात पुर्वी खुप मोर होते म्हणुन याला मोरग्राम किंवा मोरगांव असे नांव पडले आहे.

हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते आणि येथे व्यक्त केलेली ईच्छा पुर्ण होते अशी सार्वत्रिक भावना आहे. हे गणेश स्थान प्रसिध्द झाले ते महान गणेश भक्त "मोरया गोसावी" हयांच्याशी संबधीत असल्या कारणानेच....
श्रेष्ठ गणेश भक्त मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान. मोरया गोसावी हे मोरेश्वराचे अनन्य भक्त होते. येथिल "ब्रम्हकमंडल"तीर्थात त्यानां एक गणेश मुर्ती सापडली या मुर्तीची त्यांनी चिंचवडला स्थापना केली. व तेथे भव्य मंदिर बांधले. मोरया गांसावी दर शुध्द चतुर्थीला मोरगांवला यात्रेला जात असत. आजही माघी शुध्द चतुर्थी व भाद्रपद शुध्द चतुर्थी या दिवशी चिंचवडहून मोरगांवला गणेश देवांची पालखी जाते.

या मुर्ती संबधी एक आख्यायिका अशीही सांगीतली जाते की, सद्या जी मुर्ती आहे ती मुळ मुर्ती नसून मुळ मुर्ती मृत्तिका, लोह व रत्न याच्या अणुपासून बनविलेली असून ती सद्याच्या मुर्तीच्या मागे अदृष्य आहे. तीची स्थापना ब्रम्हदेवाने केली होती सिंधुसुराने तीचा विध्वसं केला त्यानतर ब्रम्हदेवाने दोन वेळा या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पुढे काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमीत्त येथे आले असता मुळ मुर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून तीला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त केले.

श्रींची मुर्ती चतुर्भुज व त्रिनेत्र असून वरच्या दोन हातात पाश व अंकुश धारण केले आहे. खालच्या दोन हातापैकी एक उजव्या गुडघ्यावर ठेवलेला असून डाव्या हातात मोदक धारण केलेला आहे. असे श्रींच्या मुर्तीचे वर्णन मुद्गल पुराणत केले गेलेले आहे.

भाद्रपद शुध्द चतुर्थी वमाघ शुध्द चतुर्थी (गणेश जयंती) असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले
या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

卐 आरती संग्रह 卐

卐 श्री गणेशाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती 卐

सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी 'ॐ' व 'अ...' असे दोन शब्द ब्रह्मेषाचा कंठ भेदून बाहेर आले. प्रथमत: ॐ असा ध्वनी झाला. या ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन. गणपती हा दशदिशांचा स्वामी आहे. त्याच्या परवानगीशिवाय इतर देवतादेखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करतो, ती देवता तिथे येऊ शकते.

यालाच महागणपतीपूजन असे म्हटले जाते. म्हणूनच कोणतेही मंगलकार्य अथवा अन्य कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपतीपूजन केले जाते. जगदुत्पत्ती होण्याआधी निर्गुण व कूटस्थ स्वरूपात असलेल्या महततत्त्वास महागणपती असे म्हणतात. ऋद्धी-सिद्धी या गणपतीच्या दोन शक्तीसहित असलेल्या गणपतीस तंत्रशास्त्रात महागणपती असे संबोधले जाते. विशिष्ट सिद्धी अथवा निखळ मोक्ष प्राप्तीसाठी उजवीकडे सोंड असलेल्या महागणपतीची पार्थिव मूर्ती घेण्याची प्रथा आहे.

पार्वतीने अंग मळापासून/मृत्तिकेपासून तयार केलेला गणेश हा देखील महागणपतीचा अवतार होय. सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला समजत असलो तरी शिव व गणेश. या दोन्ही देवता पूर्वी एकरूपच होत्या असेही मानले जाते. भालचंद्र, नागभूषणे व तृतीय नेत्र ही भगवान शंकराची तिन्ही वैशिष्ट्ये गणेशमूर्तीतही आढळतात. महादेवाप्रमाणे गणेशाच्या कमरेभोवती नागबंध आहे.

अनलासुराला भक्षण केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी शंकराप्रमाणे गणेशानेही शिरी चंद्र धारण केल्याची कथा आहे. 'गजवदनम चिंत्यं, तीक्ष्ण दंष्ट्रं त्रिनेत्रम' या श्‍लोकात गणपतीला त्रिनेत्रधारी म्हटले आहे. गणपती तंत्रानुसार भगवान शंकराने वाजवलेल्या डमरूच्या गंभीर आवाजातून गणेशाने वेदविद्या ग्रहण केली. शंकराचे तांडवनृत्य पाहून गणपती नृत्यकला शिकला व पार्वतीच्या नुपूर झंकाराद्वारे तो संगीत शिकला. आपल्या शरीरात असलेल्या षट्‌चक्रातील आरंभीच्या मूलाधार चक्रात गणपती नित्य वास करीत असतो, असे गणपती अथर्वशीर्षातील "त्वंमूलाधारस्थिेतोसि नित्यं' या श्‍लोकात म्हटले आहे. म्हणून गणेशाला मूलाधारचक्राची देवता समजले जाते. मूलाधारचक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहेत व गणपतीचा रंगही लाल आहे.

गणपतीचे वास्तव्य असलेले आरंभीचे मूलाधारचक्र जागृत झाल्यावर आध्यात्मिक उन्नतीस जसा प्रारंभ होतो, तसाच कोणत्याही कामांचा आरंभही गणपतीपूजनाने केला जातो. विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत व नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधींच्या आरंभी गणेशपूजन असते. कोणत्याही लेखन कार्यास सुरवात करताना प्रारंभी श्रीगणेशायनम: असे लिहिण्याची पद्धत आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती हा बुद्धिदाता असल्याने 'श्री गणेशायनम:' असे गणेशाचे प्रथम स्मरण करून मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो. 'महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली. भूतबाधा, करणी यासारखे वाईट शक्तीचे त्रास गणपतीच्या नामजपाने दूर होऊ शकतात.

मनुष्याच्या शरीरातील निरनिराळी कार्ये करवून घेणाऱ्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ति असे म्हटले जाते. गणपतीचा नामजप हा ही प्राणशक्ती वाढवणारा आहे. गणपती हा आपल्या हाकेला लवकर 'ओ' देणारा आहे. तो लवकर प्रसन्न होतो, असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे आपण बोलतो ती नादभाषा गणपती समजू शकतो. अन्य देवता बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात. गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे. सर्वसाधारणपणे जनमानसात असा समज आहे की, सोंडेचे टोक उजवीकडे असणारी मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेची मूर्ती, व सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची मूर्ती, परंतु हा समज चुकीचा आहे. सोंडेचे टोक कोणत्या बाजूने वळलेले आहे, त्यावरून कोणत्या सोंडेचा गणपती हे ठरवायचे असते. उदा. सोंडेचे पहिले वळण (स्वतःच्या) डाव्या बाजूला असलेला गणपती डाव्या सोंडेचा गणपती आहे व सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या उजव्या बाजूने असलेला गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे.

एखाद्या गणेशमूर्तीच्या सोंडेचे पहिले वळण उजवीकडे असून सोंडेचे तोंड /टोक डाव्या बाजूला वळले असले तरी ती मूर्ती उजव्या सोंडेची समजावी. उजव्या सोंडेचा गणपती पूजेत ठेवू नये असा सार्वजनिक समज आहे. काही ठिकाणी हा समज एवढा अतिरेकी आहे की, अशा गणपतीचे पूजन करणे संकटास निमंत्रण देणारे, अथवा अकल्याणकारी समजले जाते. या समाजाचे निराकरण करण्यासाठी त्यामागची शास्त्रीय, आध्यात्मिक बाजू तपासून पाहणे हितकारक ठरते. उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती. दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू. दक्षिण दिशा ही यमलोकांकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्यनाडीची आहे. यमलोकांच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो, तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो. या दोन्ही दृष्टींनी उजव्या सोंडेचा गणपती जागृत समजला जातो. दक्षिणेला असलेल्या यमलोकांत पापपुण्याची छाननी होते. म्हणून ती बाजू नकोशी वाटते.

जिवंतपणे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास (अथवा झोपताना दक्षिणेकडे पाय केल्यास) मृत्यूनंतर पापपुण्याची जशी छाननी होते, तशी व्हायला लागते. दक्षिणाभिमुखी मूर्तीची म्हणजेच उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे सांभाळून करणे आवश्‍यक असल्यास ती मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यावी लागते. डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती. वाम म्हणजे डावी बाजू उलट दिशा डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे. ती शीतलता देते. तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक, आनंददायी आहे. म्हणून वाममुखी गणपती पूजेत असावा असे सांगितले जाते. गणपतीचा वर्ण लाल आहे. गणेशपूजेत लाल वस्त्र, लाल फूल व रक्तचंदन वापरतात.

त्यांच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची पवित्रके मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात, व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते. ह कळणे थोडेसे कठीण असल्याने गणपतीला लाल वस्त्र, लाल फूल आवडते, असे थोडक्‍यात सांगून विषय संपवला जातो. गणेशपूजनात दुर्वांना विशेषस्थान आहे. दूर असलेल्या गणेश पवित्रकांना जवळ आणतात त्या दूर्वा होत. पवित्रक म्हणजे सूक्ष्मातिसूक्ष्म चैतन्यकण. दूर्वा एकत्रित बांधून वाहिल्याने त्याचा सुगंध बराच काळ टिकतो. त्या जास्त वेळ ताज्या राहाव्या म्हणून पाण्यात भिजवून मग वाहतात. या दोन्हीमुळे गणपतीची पवित्रके बराच काळ मूर्तीत राहतात.

गणपतीला बहुधा विषम संख्येने (म्हणजे 3, 5, 7, 21) दूर्वा वाहतात. विषम संख्येमुळे भक्ती जास्त प्रमाणात मूर्तीत येते. गणपतीची मूर्ती दूर्वांची मढवून टाकली म्हणजे मूर्तीच्या बाजूला दुर्वांचा वास पसरायला लागतो. गणपतीच्या आकारात संप्रेषित होतो. म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकारात या आकाराकडे येणे सोपे जाते. यालाच मूर्तीचे समाकारिकत्व ग्रहण केले असे म्हणतात. आलेली पवित्रके निघून न जाण्यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. हा गंध असेपर्यंत पवित्रके जास्त प्रमाणात राहातात. तशी ती राहावी म्हणून दिवसातून तीन वेळा दूर्वा बदलतात. गणेशलहरी ज्या दिवशी पृथ्वीवर प्रथम आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला तो दिवस होता माघ शु.चतुर्थी, गणपतीची स्पंदने व पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात. या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात.

अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात. अंगार म्हणजे मंगळ ग्रह किंवा भूमी. गणपतीचे पृथ्वीप्रमाणे मंगळवारही आधिपत्य आहे. गणपतीचा व मंगळाचा रंगही एकच आहे. अंगारकीला गणेशस्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात, तसेच मंगळाकडून येणारी गणेशस्पंदनेही पृथ्वीवर येतात. यामुळे चंद्राकडून येणाऱ्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात. चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. साधकाला तर मनोलय करायचा असतो. चंद्रदर्शनाने मनाची चंचलता वाढते. अंगारकीला चंद्राकडील लहरी अधिक प्रमाणात नष्ट होत असल्याने अंगारिका विनायकी व अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी व संकष्टी यांच्याइतके असते.

- श्री. शरद देसाई, ढवळी - फोंडा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा