मराठी पाऊल पडते पुढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी पाऊल पडते पुढे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

'नासा'त घुमला मराठी आवाज

nasa.jpg
चैताली धोपटकर

नासाने मंगळावर पाठवलेल्या रोबोटसाठी सर्किट डिझाइन तयार करण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. याशिवाय नासाच्या सदस्यांसाठी खास व्याख्यान देण्यासाठी त्याला आमंत्रित करण्यात आलं होतं. या निमित्ताने धीरज जाधव या टॅलेंटेड मराठी तरुणाचा आवाज नासात घुमला आहे.

खरंतर त्याची इच्छा आहे आयपीएस ऑफिसर व्हायची. आयपीएस ऑफिसर होण्यासाठी डिग्री लागते म्हणून तो व्हिजेटीआयमधनं इंजिनीअरिंग करतोय. पण ते झाल्यावरही त्याने खगोल शास्त्रावर पीएचडी करायचं ठरवलं आहे. मूळच्या यवतमाळच्या असलेल्या २१ वर्षीय धीरज जाधव या टॅलेंटेड तरुणाची ही गोष्ट. इलेक्ट्रॉनिक्स या विषयाबद्दल असलेल्या वेडातून आपण नासापर्यंत झेप घेऊ शकलो , असं तो सांगतो.

धीरज मूळचा यवतमाळचा. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यानं बारावी सायन्स केलं. सध्या तो व्हि.जे.टी.आयमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या चौथ्या वर्षाला शिकतोय. इलेक्ट्रॉनिक्सच्या आवडीपायी धीरज ' एरोमोडेलिंग ' या कम्युनिटीचा सभासद झाला. त्या कम्युनिटीमुळे त्याला इलेक्ट्रॉनिक गोष्टी कशा बनवायच्या , त्याला लागणारे घटक या गोष्टींची माहिती मिळाली. या कम्युनिटीमुळे धीरज आणि त्याच्यासारख्या इतर सभासदांनी त्यांचा एक स्वतंत्र फोरम बनवला. यामध्ये धीरज हा एकमेव मराठी मुलगा आहे आणि त्यांच्यामध्ये सगळ्यात लहानही आहे. २००८ मध्ये या फोरमने त्यांचा पहिला आंतराष्ट्रीय प्रोजेक्ट यु.ए.वी (अनमेंड एरियल वेहिकल्स) बनवला. नासाच्या ' मार्स मिशन ' चे प्रमुख पीटर फेलिंगर यांनी फोरमचा हा प्रोजेक्ट बघून त्यांना मार्स मिशनच्या रोबोटला लागणारं सर्किट डिझाईन बनवण्यासाठी विचारणा केली. या फोरमने दोन वर्षांच्या मेहनतीनंतर ' इगल कॅड ' ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून रोबोटसाठी लागणारं सर्किट डिझाईन तयार केलं.

२६ नोव्हेंबर २०११ ला हा प्रोजेक्ट त्यांनी नासाकडे सादर केला. या सर्किट डिझाईनची खूप वाहवा झाली. कारण मंगळावर असलेल्या रोबोटला कमांड पाठवण्यासाठी जिथे १३ मिनिटं लागायची , तीच कमांड नासा आता ४५ सेकंदांत पाठवू शकते. एक्स-बँड हे तंत्र वापरल्याने वेळ कमी झाला आणि हे तंत्र शोधण्यात धीरजचा सिंहाचा वाट होता. म्हणून नासाने त्याला या जबरदस्त कामगिरीबद्दल सन्मानितही केलं. हा रोबोट ऑगस्ट २०१२ ला पृथ्वीवर आणण्यात येणार आहे. १३ जून रोजी धीरजने नासाला जाऊन तिथल्या सभासदांना ' साऊंडिंग रॅकेट ' या विषयावर व्याख्यानही दिलं. सध्या तो ऑटोमेशन या विषयावर काम करतोय.

अण्णा हजारे



किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे (१५ जून, इ.स. १९३७:भिंगार, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे भारतातील मराठी समाजसेवक आहेत. मूळचे सैन्यात वाहनचालक असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे भारतातील एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत. १९९० साली त्यांना त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल भारत सरकारने पद्मश्री आणि १९९२ साली पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला. अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे अनेक मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत.

बालपण
किसन हजारेंचा जन्म जून १५, इ.स. १९३७ रोजी भारताच्या मुंबई इलाख्यातील भिंगार मधील खोमणे वाड्यात झाला. हे गाव आता महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात आहे.[२] हजारेंचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. १९४५मध्ये आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बाबूरावांनी भिंगारमध्येच बस्तान बसवले पण १९५२ साली ते राळेगण सिद्धी या आपल्या मूळ गावी परतले. किसनला सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यासाठी सुरुवातीस दादरजवळ फुले विकली व नंतर स्वतःचेच दुकान थाटले व आपल्या दोन भावांना राळेगण सिद्धीहून बोलावून घेतले.

लष्करी सेवा
इ.स. १९६२च्या सुमारास चीनने भारतावर आक्रमण केलेले असताना भारतीय सैन्याने धडाक्यात भरती सुरू केली होती. त्यावेळ २५ वर्षांचे असलेले हजारे लष्कराच्या किमान शारीरिक क्षमतेस पात्र नव्हते, पण कोणत्याही परिस्थितीत नवीन जवान भरती करणे आवश्यक असल्याने लष्कराने त्यांना भरती करून घेतले.[४] औरंगाबाद येथे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतल्यावर १९६३मध्ये त्यांना वाहनचालकाचे पद दिले गेले.[५]
त्यानंतर दोन वर्षातच पाकिस्तानने भारतावर चाल केली. त्यावेळी हजारेंचा मुक्काम पंजाबमधील खेमकरण क्षेत्रात होता. नोव्हेंबर १२, इ.स. १९६५ रोज पाकिस्तानी वायुसेनेने भारतीय ठाण्यांवर हल्ले सुरू केले. हजारे त्यावेळी इतर वाहनांसह आपले वाहन चालवीत होते. या हल्ल्यात त्या तांड्यातील ते स्वतः सोडून एकूणएक जवान शहीद झाले. [६][३][७] हे पाहून विषण्ण झालेल्या हजारेंनी जगण्यातील अर्थ शोधण्यास सुरुवात केली. आपल्या प्रवासात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील एका दुकानात त्यांच्या हाती राष्ट्रनिर्मितीसाठी युवा पिढीला आवाहन हे स्वामी विवेकानंद यांनी लिहिलेले पुस्तक पडले.[८] हे वाचताना त्यांना गमले की अनेक संतांनी इतरांच्या सुखासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. आपण आपले उरलेले आयुष्य गरीबांची दुःखे दूर करण्यात घालवावे असे त्यांना वाटू लागले. यानंतर फावल्या वेळात त्यांनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि विनोबा भावे यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली.[९] यानंतर काही वर्षांनी १९७०च्या दशकात त्यांची मृत्यूशी पुन्हा एकदा जवळून गाठ पडली. वाहन चालवीत असताना भीषण अपघातातून ते बचावले.[१०] याक्षणी त्यांना वाटले की आपल्या उरलेल्या आयुष्याचा सदुपयोग करण्यासाठी जणू काही दैवच त्यांना इशारे देत आहे. वयाच्या ३८व्या वर्षी किसन हजारेंनी आपले उरलेले आयुष्य इतरांच्या सेवेसाठी वेचण्याचा संकल्प सोडला.[६] १९७८मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला.
अधिक माहितीसाठी 
http://mr.wikipedia.org/wiki/


मिलिंद तांबे

मटा ऑनलाइन वृत्त। मुंबई





अमेरिकेच्या अत्यंत संवेदनशील वास्तूंच्या रक्षणासाठी विशिष्ट कम्प्युटराइज्ड प्रणाली शोधून काढणा - या मिलिंद तांबे या मुंबईकर तरुणाचा अमेरिकेत नुकताच सत्कार केला. अमेरिकेच्या संसदीय व्यवस्थेचे मुख्यालय असलेल्या कॅपिटॉल हिल्स येथे हा सोहळा झाला.

अमेरिकन सरकारचे अनुदान घेणा-या ख्रिस्तोफर कोलंबस फेलोशिप फाऊंडेशनने तांबे यांचा सत्कार केला आणि त्यांना पंचवीस हजार डॉलर्सचा पुरस्कार दिला.

अतिरेकी लक्ष्य करण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि हाती असलेले मनुष्यबळ यांची सांगड घालणारा प्रोग्रॅम तांबे यांनी कम्प्युटरच्या सहाय्याने तयार केला. या प्रणालीमुळे अतिरेक्यांना नेमके कोणत्या ठिकाणी कधी आणि केव्हा किती संरक्षण असेल याचा अंदाज करणे अशक्य बनते.

रोज ठराविक वेळी संरक्षण व्यवस्थेच्या प्रमुखाला, कम्प्युटरद्वारे आखणी केलेला प्रोग्रॅम मिळतो. त्यानुसार संरक्षण व्यवस्था आखली जाते. ही व्यवस्था निर्माण करण्यासाठी तांबे यांनी गेम थिअरीचा देखिल उपयोग केला आहे. तांबे यांच्या प्रोग्रॅमचा वापर अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि त्याचा फायदाही दिसून आला आहे.

मिलिंद तांबे या तरुणाचे प्राथमिक शिक्षण नागपूर येथे झाले. नंतर तो मुंबईच्या विल्सन हायस्कुल आणि ठाणे येथील सरस्वती हायस्कुलमध्ये शिकला. पुढे त्याने ठाण्याच्या बांदोडकर कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. बारावीला मेरिट लिस्टमध्ये आलेल्या मिलिंदने बिट्स पिलाणी येथून कम्प्युटर सायन्समधून एमएससी केल्यानंतर अमरिकेतल्या पिटसबर्ग येथील कार्नेजी मेलॉन विद्यापीठातून आटिर्फिशियल इंटिलिजक्समध्ये डॉक्टरेट मिळवली. सध्या मिलिंद तांबे साऊथ कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रोफेसर आहेत. त्यांच्या हाताखाली पीएचडी केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तांबे यांचा आदर्श गुरू (मेंटॉर) म्हणून सत्कार केला आहे.

तांबे यांचे वडील शशीकांत तांबे हे राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव म्हणून निवृत्त झाले. रस्ते आणि पूल हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. राज्यातील रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून त्यांच्या समितीने महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. मिलिंद यांची आई उषा तांबे या साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा आहेत.

मराठमोळ्या तेजस्विनीचा विश्वविक्रमी नेम

          
जर्मनीतील म्युनिक येथील जागतिक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोनमध्ये अचूक नेम साधत भारताची नेमबाज तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक व विश्वविक्रमाला गवसणी घालण्याची दुहेरी कामगिरी नोंदवली. रशियाच्या मरिना बोबकोवाच्या १२ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी साधण्याची किमयाही तिने साधली. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. हा विश्वविक्रम साध्य केल्यानंतर तेजस्विनीच्या कोल्हापूरमध्ये आनंदाला भरते आले आहे.

म्युनिक येथे सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पधेर्त तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रोनमध्ये ५९७ गुणांची कमाई केली. पोलंडच्या इवा जोना नोवाकोवास्का हिनेही तेवढ्याच गुणांची कमाई केली होती. मात्र, अखेरच्या फेरीत तेजस्विनीने ४१ गुण मिळवत बाजी मारली. इवाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले; तर कझाकस्तानच्या ओल्गा डॉवगनने ५९६ गुणांसह ब्राँझ पदक पटकावले. गगन नारंग, सुमा शिरूर, रंजनसिंग सोढी, आशर नोरिया यांच्यानंतर विश्वविक्रम नोंदवणारी तेजस्विनी ही भारताची पाचवी नेमबाज ठरली आहे.

इरादा सवोर्त्तम कामगिरीचा

राष्ट्रकुल स्पधेर्त एअर रायफलमध्ये सुर्वपदक पटकावणाऱ्या २९ वषीर्य तेजस्विनीने विश्वविक्रमी कामगिरीनंतर आनंद व्यक्त केला. 'ज्या पद्धतीने आमचा सराव सुरू होता त्यानुसार मला सवोर्त्तम कामगिरीची अपेक्षा होती. पदक किवा विश्वविक्रमाचा मी विचारही केला नव्हता. दोन्ही साध्य झाल्यामुळे होत असलेला आनंद आता नेमक्या शब्दांत व्यक्त करणेही कठीण झाले आहे' असे ती म्हणाली.

***************

पदक किवा विश्वविक्रमाचा मी विचारही केला नव्हता. हे दोन्ही साध्य झाल्याने होत असलेला आनंद मला नेमक्या शब्दांत व्यक्त करणे कठीण झाले आहे....

-तेजस्विनी सावंत

***************


संकेतस्थळ :  महाराष्ट्र टाईम्स

पवारांनी स्वीकारली आयसीसीची सूत्रे

                                 http://ajsamaj.com/Images/News/TT15.jpg

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सातवे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी आज सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदी पोहोचलेले ते दुसरे भारतीय आहेत. सिंगापूरमध्ये आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत पवार यांनी पदभार स्वीकारला.

मावळते आयसीसी अध्यक्ष डेविड मॉर्गन यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ आज संपला. त्यांच्या जागी शरद पवार यांची नेमणूक करण्याचा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाचे नियमन करणारी आयसीसी ही सर्वोच्च संस्था आहे. यापूर्वी १९९७ साली जगमोहन दालमिया यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्यानंतर आता यापदी पोहोचलेले पवार हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

केंद्रीय कृषिमंत्री असलेले शरद पवार हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचा राजीनामा देऊन गेल्या दोन वर्षांपासून ते आयसीसीचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत होते. आयसीसीच्या परंपरेनुसार उपाध्यक्षांनाच नंतर अध्यक्ष केले जाते. २०११ साली क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय उपखंडात पार पडणार असून, शरद पवार यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण इव्हेंट असणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर २०१२ साली आयसीसी अध्यक्षपद काबीज करण्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हार्वर्ड यांचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. आशियाई तसेच आफ्रिकन देशांनी हार्वर्ड यांच्या उमेदवारीला विरोध केला. हार्वर्ड यांनी क्रिकेट प्रशासक म्हणून यापूर्वी काम केले नसल्याने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यास आशियाई व आफ्रिकन देशांनी नकार दिला.

जर्मनीतील अश्वारोहण स्पर्धेत पुण्याचा कपिलेश भाटे अजिंक्य

जर्मनीमध्ये डॉर्टमन्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या अडथळ्यांच्या अश्वारोहण स्पधेर्मध्ये एमआयटीच्या कपिलेश भाटेने अजिंक्यपद मिळवले आहे. २० वर्षांच्या युरोपियन स्पर्धकांचे वर्चस्व मोडून काढत सुमारे २७ वर्षांनंतर हा बहुमान भारताला मिळवून दिला आहे.

कपिलेश हा या स्पधेर्तील सर्वात तरुण स्पर्धक होता. अश्वारोहण कलेचे प्रशिक्षण त्याने जर्मनीतल्या वारंडॉर्फ येथे प्रशिक्षक फिलिप शोबर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. २०१० मध्ये होणाऱ्या अशियाई क्रीडा स्पधेर्मध्ये सहभागी होऊन चमकदार कामगिरी करण्याची कपिलेशची महत्त्वाकांक्षा आहे. या स्पधेर्साठी 'लंडन ऑलिम्पिक्स' या घोड्यावर तो सराव करतो आहे. अश्वारोहणाच्या क्रीडाप्रकारामध्ये देशातील आणि राज्यातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावे, तसेच हा खेळ महागडा असल्याने राज्य सरकारने आणि कापोर्रेट क्षेत्राने खेळाडूंना आथिर्क मदत द्यावी, असे आवाहन कपिलेशने केले आहे.

कपिलेश सध्या एमआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील अजित भाटे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी लहानपणापासून कपिलेशला या खेळासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी कपिलेशसाठी जर्मनीमध्ये तीन घोडेही खरेदी केले आहेत.

जय एव्हरेस्ट!

 http://www.maayboli.com/files/u4614/sum2.jpg


नजर पोहोचेल तिथपर्यंत पसरलेले शुभ्र बर्फ... नजरेचा पाळणा करतील अशा अतिखोल दऱ्या... आकाशात मधेच दाटणारे व क्षणात लुप्त होणारे ढगांचे पुंजके... हाडे गोठवून टाकणारी थंडी... वेगात वाहणारे वारे... हे सारे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला मनातील पहाडाएवढी जिद्द. कधी निसर्गाशी हात मिळवत तर कधी पंगा घेत हीच जिद्द एक एक पाऊल पुढे टाकत राहते आणि गुरुवारी सकाळी ठीक सात वाजता महाराष्ट्राचा ठसा हिमालयावर... माऊंट एव्हरेस्टवर उमटतो. महाराष्ट्राचा ध्वज हिमालयावर डौलाने फडकतो तो पुण्याच्या अवघ्या १९ वषीर्य कृष्णा पाटील हिच्या पराक्रमामुळे...
.......
गुरुवारचा दिवस महाराष्ट्रासह अख्ख्या देशासाठी ऐतिहासिक ठरला. कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट सर केले आणि ही यशोगाथा लिहिणारी ती पहिलीच महाराष्ट्रकन्या ठरली. एवढेच नाही, तर गुरुवारी सकाळी पाच ते सात या तीन तासांत तब्बल ११ भारतीयांनी हे शिखर गाठले. या पराक्रमावर कळस चढवला तो गुरुवारीच एव्हरेस्ट सर करणाऱ्या आपा शेरपा या ४९ वषीर्य नेपाळी शेरपाने. या सवोर्च्च शिखराला गवसणी घालण्याची ही त्याची १९वी खेप!
एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न साकार करणारी कृष्णा ही १० जणांच्या टीमची सदस्य होती. तिच्या सोबतीला सहा अमेरिकी, दोन जर्मन व एक डच असे नऊ गिर्यारोहक होते. हे सारे 'नेहरू पर्वतारोहण संस्थे'तफेर् या मोहिमेवर गेले होते. ही मोहीम गुरुवारी सकाळी फत्ते झाल्याचे समजताच पुण्यासह राज्यात सर्वत्र आनंदाचे शिखर उंचावत गेले. तिच्या घरच्या मंडळींवर शुभेच्छांचा वर्षाव दिवसभर सुरू होता.

मराठी कर्तृत्वाला इंग्रजी पंख

स्वाभिमान, पराक्रम आणि ध्येयनिष्ठेच्या जोरावर मराठी माणसाचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. या इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे किल्ले आजही महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात उभे आहेत. मराठ्यांच्या यशाचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांवर मराठीत मोठ्या प्रमाणात लिखाण झालंय. हा गौरवशाली इतिहास भावी पिढीलाही कळावा आणि किल्ल्यांची कीर्ती परदेशी पर्यटकांपर्यंत पोहचावी, यासाठी प्रवीण भोसले या इतिहास संशोधकाने किल्ल्यांवर इंग्रजीत पुस्तकं लिहिली आहेत.

सांगलीच्या प्रवीण भोसले यांनी १७ वर्षांत मोटारसायकलवरून दोन लाख किलोमीटर प्रवास करत मराठ्यांच्या कतृर्त्वाचे साक्षीदार असलेल्या २०० किल्ल्यांची भ्रमंती केलीय. प्रत्येक किल्ल्याचे बारकावे आणि वैशिष्ट्यं दाखवणारे ३८ हजार फोटो त्यांच्या संग्रही आहेत. त्यापैकी १६०० फोटोंचं भव्य प्रदर्शन भोसले यांनी ३८ ठिकाणी भरवलं आहे. अनेक दिग्गज इतिहासतज्ज्ञांनी त्यांच्या या कामाचा गौरव केला आहे. युद्घात धारातिथीर् पडलेल्या १२५ योद्ध्यांच्या समाधीस्थळांची सखोल माहिती देणारं 'मराठ्यांची धारातिथेर्' हे पुस्तक भोसले त्यांनी लिहिलंय. दूरवस्थेतल्या या समाधीस्थळांच्या जीणोर्द्धाराचं कामही भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलं आहे.

गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास मराठी भाषिकांच्या कक्षा ओलांडून साता समुदापार जावा, यासाठी किल्ल्यांची पुस्तकं इंग्रजीत लिहिण्याचा ध्यास भोसले यांनी घेतला. त्यातूनच आता रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, विशालगड, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, विजयदुर्ग, कुलाबा, देवगिरी, जंजिरा आणि शिवनेरी अशा १४ किल्ल्यांची माहिती इंग्रजीत उपलब्ध झाली आहे.

किल्ल्यांवर इंग्रजीत अत्यंत त्रोटक लिखाण आणि काही ठिकाणी फक्त फोटो उपलब्ध आहेत. हॉटेल आणि लॉजच्या जाहिरात करण्यासाठी टुुरिस्ट गाइडमधेे किल्ल्यांची माहिती घुसडण्याचा प्रकार आपल्याकडे चालतो. परंतु, मी लिहिलेली पुस्तकं या साऱ्यापासून चार हात लांब असल्याचं भोसले अभिमानाने सांगतात. या पुस्तकांमधेे किल्ल्यांचं लोकेशन, तिथे जायचं कसं, राहायची व्यवस्था कुठे आहे, किल्ल्यांवर काय पहायचं, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे याबाबतची सखोल माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकांत किल्ल्यांवरची अनेक छायाचित्रं आहेत. त्यामुळे पुस्तक हातात पडल्यानंतर या किल्ल्यांना भेट देण्याचा मोह होतोच.

नवी पिढी इंग्रजीतून शिक्षण घेत आहेत. मराठीतली किल्ल्यांवरची पुस्तकं या मुलांकडून वाचली जातील ही अपेक्षा ठेवणं चुकीची आहे. त्यामुळे सोप्या इंग्रजीतून ही पुस्तकं लिहिल्याचं भोसले यांनी सांगितलं. तसंच काही वर्षांत किल्ल्यांकडे देशी आणि परदेशी पर्यटकांचा ओढा वाढतोय. प्रतापगडावर वर्षभरात आठ लाख पर्यटक आले होते. अजंठा आणि वेरुळच्या लेण्यांमुळे देवगिरी किल्ल्यावर तसंच डेक्कन ओडिसीमुळेही सिंधुदुर्ग आणि पन्हाळ्यावर अनेक परदेशी पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यांना किल्ल्यांबाबतची माहिती इंग्रजीत दिली तर त्यांची आवड वाढून किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे हे किल्ले परदेशी टुरिस्टच्या मॅपवर येतील, अशी आशा भोसले यांना वाटतेय.

- संदीप शिंदे, ठाणे

'टेकओव्हर'च्या आकाशात मराठी उद्योजकाचीही भरारी!

http://www.glodynetechnoserve.com/images/ur_awa2.jpg
बड्या भारतीय कंपन्या विदेशामध्ये विस्तार करताना युरोप-अमेरिकेतील कंपन्या ताब्यात घेत आहेत. या विदेशविस्तारामध्ये लहान व मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्याही पुढे सरसावत आहेत. एका मराठी उद्योजकानेही 'टेकओव्हर'च्या या आकाशात भरारी घेतली असून 'आयटी'च्या ऑपरेशन अँड मेन्टेनन्स क्षेत्रात प्रभुत्व असलेल्या 'ग्लोडाइन' या आनंद सरनाईक यांच्या कंपनीने अमेरिकेतील दोन कंपन्या नुकत्याच ताब्यात घेतल्या आहेत.

इंजिनीअरिंगमधली पदवी आणि जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीए केलेल्या सरनाईक यांनी १९९० मध्ये 'एचसीएल-एचपी' या कंपनीतून आपल्या करिअरला सुरुवात केली. आयटी क्षेत्रातील संधींचा आवाका लक्षात आल्यावर त्यांनी १९९७ मध्ये 'ग्लोडाइन'चा पाया रचला. जगभरातील कंपन्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करतात, ती केल्यानंतर यंत्रणा चालवण्यासाठी आणि तिची देखभाल करण्यासाठी वेगळ्या कंपन्यांची, यंत्रणेची गरज लागेल हे ओळखून 'ग्लोडाइन'ने या क्षेत्रात यशस्वी उडी घेतली. आजच्या घडीला मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली अशा भारतातील बहुतेक प्रमुख शहरातील कंपन्यांना सेवा पुरवताना ग्लोडाइनने विदेशातही शिरकाव केला आहे.

सध्या या कंपनीला ७५ टक्के काम भारतात, तर २५ टक्के काम विदेशातून मिळते. परंतु २०१० मध्ये ७५ टक्के काम विदेशातील असेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तयारी करताना 'ग्लोडाइन'ने अमेरिकेतील 'फ्रंट ऑफिस टेक्नॉलॉजीज' ही कंपनी ३३.४० लाख डॉलरना तर 'लिंक ग्रुप इंटरनॅशनल' ही कंपनी ४७.५० लाख डॉलरना ताब्यात घेतली आहे. या अॅक्विझिशन्समुळे अमेरिकन एक्स्प्रेस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, ऑग्लिव्ही अँड मॅथर वर्ल्डवाइड, बार्टल बॉगल हेगार्टी, सॉथबीज, अल्केमी अशा अनेक ग्राहकांची भर पडली असून, अमेरिकेमध्ये वाढीला चालना मिळाली आहे. वेगवान वाढ साधण्यासाठी आणखी विस्तार करण्यात येत असून, विलिनीकरणासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत, असे सरनाईकांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

सध्या ऑपरेशन अँड मेन्टेनन्स क्षेत्राचे मार्केट सुमारे ५४० अब्ज डॉलरचे असून, या क्षेत्रातील सुमारे ५५ टक्के हिस्सा काबीज करण्याची भारताची क्षमता असल्याचे सरनाईक म्हणाले. 'ग्लोडाइन'ची उलाढाल ३०० कोटी रुपयांची असून, कंपनीमध्ये ६४० कर्मचारी आहेत. २०१० पर्यंत कर्मचारीसंख्या अडीच हजारांपर्यंत वाढवण्याचे टार्गेट आहे.

योगेश मेहेंदळे, मुंबई

गोष्ट 'मराठी एनआरआय मिलेनिअर'ची!

                                      http://www.prahaar.in/thumbnail.php?file=datar_918920116.jpg&size=article_medium
अवघ्या पाव शतकांत दुबईत, मसाल्यांचा राजा बनलेले धनंजय दातार यांचे पुढचे स्वप्न आहे कंपनीचा सुवर्णमहोत्सव स्वत:च्या मालकीच्या विमानात करण्याचे.

आज ते दुबई, अबु धाबी आणि शारजामध्ये दहा सुपरमार्केट्स अल अदिल या कंपनीच्या नावाने चालवत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या एका छोट्या दुकानाचा हा विस्तार करताना ते स्पाइस किंग बनले आहेत. कारण चितळयांच्या बाकरवडीपासून वऱ्हाडी ठेचा आणि वारणाचं श्रीखंड ते नमकीनपर्यंत पदार्थ त्यांच्याकडे असतात. सर्व प्रकारचे मसाले आणि गव्हाच्या पीठापासून ते भाजणीपर्यंत हेही ते विकतात. या सुपरमार्केटला लागून त्यांची पीठे, भाजणी करण्याची गिरणी त्यांनी टाकली आहे. त्यामुळे ग्राहकाला ताजी भाजणी, नुकतेच दळलेले पीठ मिळते.

सोबतीला मुंज, लग्न, सत्यनारायणाची पुजा यांचे साहित्यही देणारे दातांराचे सुपरमार्केटे तुफान लोकप्रिय झाले आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. केवळ मराठी पदार्थच नव्हे तर पंजाब, राजस्थान, उत्तर भारत अशा अशा अनेक राज्यांतील चवदार पदार्थ तेथे मिळत असल्यामुळे या प्रदेशांत दातार आणि त्यांची कंपनी यांचा भारतीय प्रेमाने उल्लेख करतात.

अर्थात हे यश सहज मिळालेले नाही. अनेकदा सकाळी सहा ते रात्री बारा ते कामात असतात. घरच्या अडचणींचा मग विचार करायला वेळही नसतो. आपण विकतो तो माल दर्जामध्ये सर्वोच्च दर्जाचा असायला हवा या आग्रहामुळे सतत पुरवठादारांशी संपर्क ठेवायचा, मालात कसर राहणार नाही याची काळजी घ्यायची. सतत मुंबई दुबई अशी पायाला भिंगरी लागलेली.

अकोल्यातील करंजेलाड या गावातून निघालेले दातारांचे वडील हे दूरदृष्टीचे होते. ज्या काळात दुबईचा नावलौकिक व्हायचा होता, तेव्हा, म्हणजे १९७५ साली महादेव दातार यांनी दुबईचे भविष्य जाणले. आणि यातच आपला भविष्यकाळ उज्वल आहे हेही त्यांना कळून चुकले. तेथे एका दुकानात नोकरी करताना, आपण एक जण इतरांनी नोकरीला ठेवायचे ही जिद्द बाळगली.

त्यामुळेच त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या मुलाला बोलावून घेतले. भारतीयांची आणि भारतीय उपखंडातील लोक नशीब अजमावण्यासाठी या वालुकायम प्रदेशात तेव्हा यायला सुरूवात झाली होती. घरापासून दूर असलेल्यांना, घरचे पदार्थ द्यायचे हा निर्णय दातारांनी घेतला आणि बघता बघता त्यांची वार्षिक उलाढाल सव्वादोनशे कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. यासाठी स्थापलेल्या कंपनीचे नावही त्यांनी अल आदिल म्हणजे भला माणूस असे ठेवले. दातार हे भारतीयांसाठी भला, चांगला माणूस ठरले आहेत.

सध्या जगभरात मंदीची लाट आहे. पण मी मंदीची संधी साधणार असे ते आत्मविश्वासाने सांगतात. माझ्या सहकाऱ्यांचा पगार तर मी कमी करणार नाही, कोणालाही कामावरून काढणार नाही तर नेहमीप्रमाणे त्यांना पगारवाढही दिली आहे असेही ते तितक्याच ठामपणाने सांगतात.

याच बोलण्याया ओघात दुबई आणि मुंबईत व्यवसाय करण्यातील फरकही ते सांगतात. कर आकारणीत सुटसुटीतपणा हे दुबईचे वैशिष्ट्य. विक्रीकर, व्हॅट असे कोणतेही कर तेथे आकारले जात नाहीत. सरसकट पाच टक्के कर भरा आणि मोकळे व्हा असा दुबईच्या सरकारचा सरळ व्यवहार आहे. त्यामुळे करआकारणीची गणिते मांडत बसा, त्यासाठी वेगळे कर्मचारी नेमा असा त्रास नसतो. दुबईच्या बंदरात मालाचा कंटेनर दोन तासांत मोकळा होतो. मुंबईत त्याला वीस दिवसही लागू शकतात असे ते सांगतात.

आज दातार २१० कर्मचारी ठेवून आहेत. यापैकी १६० मराठी आहेत हे सांगताना ते मराठी माणसाने जगभरात नोकरी, व्यवसायात निर्माण होत असलेल्या संधी साधायला हव्यात असा सल्ला देतात. मराठी माणसाकडेही पैसे असतात, पण त्याला त्याचे प्रदर्शन करायला आवडत नाही असे दातार सांगतात.

दातारांच्या बोलण्यात सतत उल्लेख येतो तो पत्नी वंदनाचा. मुळच्या सातारा जिल्ह्यातील खंडोबाची माळ येथील वंदना देशपांडेशी लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षातच आपला व्यवसाय चाळीस टक्क्यांनी वाढला हे ते कौतुकाने सांगतात आणि आपल्या कठीण प्रवासात आवश्यकता होती तेव्हा घरची जबाबदारी पार पाडली आणि आता व्यवसायाची आथिर्क बाजू सांभाळत असल्यामुळे आपण इतर बाबींत लक्ष घालू शकतो असे ते सांगतात.

सध्या दातार, पुढल्या पावशतकाचा प्रवास आखत आहेत, पण त्याची रूपरेषा ते सांगत नाहीत. पण यशाचा मंत्र मात्र तोच असेल हे ते स्पष्ट करतात. छोट्यातल्या छोट्या ग्राहकाचा मान राखा, ग्राहक संतापला तरी आपण शांत रहायचे, ग्राहकाला माल कधी मिळेल याची दिलेली वेळ पाळणे आणि मुख्य म्हणजे आलेल्या संपतीची गुर्मी येऊ द्यायची नाही.


सुहास फडके

सिटीग्रुपचा मराठमोळा बॉस

जगभरातील सर्वात मोठी फायनान्स सेवा पुरवणा-या सिटीग्रुपच्या सीईओपदी एनआरआय विक्रम पंडित यांची मंगळवारी निवड झाली आहे. मूळ भारतीय असलेल्या एखाद्या व्यक्तीने हे पद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शौकत अझीज यांची दावेदारी मोडत पंडित यांनी हा बहुमान पटकावला आहे.
जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये व्यवसायाचे जाळे पसरलेला सिटीग्रुप बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य मानला जातो. सिटी बँकेला गेल्या काही वर्षात गुंतवणूक क्षेत्रात झालेल्या तोट्यानंतर बँकेचे सीईओ चार्ल्स प्रिन्स यांनी राजीनामा दिला होता. गेल्या १७ वर्षात बँकेला झालेल्या नुकसानांपैंकी हे सर्वात मोठे नुकसान असल्याचे बोलले जाते. त्यामुळे या महत्त्वाच्या पदावर कोणाची निवड होणार, याकडे जगाचे डोळे लागले होते.
मूळचे नागपूरकर असलेले विक्रम पंडित (वय ५०) यांनी वयाच्या १६ व्या वर्षी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. भारतीय अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरदेखील याच विद्यापीठात शिकले होते. सिटीबँकेला झालेल्या नुकसानीतून सावरण्याचे मोठी जबाबदारी विक्रम पंडित यांच्यावर असेल. सध्या सिटीग्रुपचे इन्वेस्टमेंट बँकिंग हेड म्हणून ते जबाबदारी सांभाळत होते. मॉर्गन स्टॅनले इन्वेस्टमेंट बँकर म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

'पुणे'कर झाला मास्टरकार्डचा सीईओ

मास्टरकार्ड या जगविख्यात कंपनीच्या सीईओपदी एका ‘पुणे’कराची नेमणूक झाल्याने महाराष्ट्रीय माणसाची छाती अभिमानाने भरून आली आहे. पुण्याजवळील खडकी येथे जन्मलेले आणि भारतातच शिकलेले अजय बंगा आता मास्टरकार्डचे सीईओ बनले आहेत. येत्या १ जुलैपासून ते पदभार सांभाळणार आहेत.

अजय बंगा हे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे माजी अध्यक्ष एम. एस. बंगा यांचे बंधू आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये सिटीग्रुपमधून बाहेर पडून त्यांनी मास्टरकार्डचे अध्यक्ष आणि सीओओ म्हणून पदभार स्वीकारला होता. सीईओपदी नियुक्ती करण्याच्या अटीवरच ते सिटीग्रुपमधून बाहेर पडले होते. विद्यमान सीईओ रॉबर्ट सेलंडर यांच्या जागी आता अजय बंगा यांची नेमणूक करण्यात आली आहे. सीईओ आणि अध्यक्ष असा दुहेरी पदभार ते सांभाळणार आहेत.

शीख समाजाचे अजय बंगा यांची सीईओपदी नेमणूक करण्याची घोषणा कंपनीने केली, तेव्हा योगायोगाने भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग देखील अमेरिका दौ-यावर आलेले आहेत. अमेरिकेच्या भरभराटीमध्ये शीख समाजाचे मोठे योगदान असल्याचे मानले जाते. म्हणूनच गेल्यावर्षी व्हाइट हाऊसमध्ये गुरूनानक देव जयंती साजरी करण्यात आली होती.

खडकी येथे अजय बंगा यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सैंन्यात होते आणि त्यांची नेहमीच बदली होत असे. त्यामुळे सिकंदराबाद, जालंदर, दिल्ली, हैदराबाद आणि शिमला येथे बंगा यांनी आपले शिक्षण घेतले. दिल्लीच्या स्टिफन्स कॉलेजमधून त्यांनी इकोनॉमिक्स हॉनर्समध्ये बी.ए केले आणि अहमदाबादच्या आयआयएम कॉलेजमधुन एमबीए पुर्ण केले. बंगा यांचे भारतातील अनेक ठिकाणी शिक्षण झाले आहे.

१९९६ साली बंगा यांनी आपल्या करीअरला सुरवात केली. २००० साली त्यानी सीटी फायनान्शियलमध्ये नोकरी स्विकारली, २००२ साली त्यांनी उत्तर अमेरिकेतील एका बँकेत नोकरी केली आणि २००५ साली त्यांनी सीटीग्रुपमध्ये प्रवेश केला. २००८ साली बँकांच्या वेगवेगळ्या कामांसाठी ते हाँगकाँगला गेले.

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा