जराशी गम्मत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जराशी गम्मत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

काही मजेशीर व्याख्या

तुम्हाला कोणती आवडली ते सांगा

अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका

मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो

शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो

सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा

वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे

लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा

फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका

पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)

ग्यालरी- वरच्या मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा

लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन

छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ

कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन

परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक 'हातयंत्र'

परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ

दाढी - 'कुरुपपणा' लपवण्याचे' रुबाबदार' साधन

थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात

काटकसर - कंजूषपणाचे एक 'गोंडस' नाव

नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला

घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी

मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू

ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग

विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी

विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी

श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड

श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी

IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम

IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री

बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा

स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन

चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर

लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा..

मुली कशा पटवाव्या…

मराठी मुलं किंवा मुली तसे जरा फास्टच असतात प्रेमात पडण्याच्या बाबतीत. तशीही प्रत्येकाचीच इच्छा असते  एकदा तरी प्रेमात पडावं. युजवली जवळपास ९० ट्क्के मुलं ही ’तुझं आहे तुज पाशी, परी तु जागा चुकलाशी’ या उक्ती प्रमाणे आपलं ’प्रेम’ कुठे आहे ते ओळखू शकत नाहीत,ते वेळेवर न ओळखल्या मुळे त्या प्रेमाचं कुठे तरी लग्नं ठरतं आणि मग हात चोळत बसावं लागतं.
प्रेम कोणावर करावं हा तर सगळ्यात मोठा कधीही न सुटणारा प्रश्न. सगळ्यात सोपं म्हणजे बालपणीची मैत्रीण.. ही म्हणजे अगदी सेफ असते. पण होतं काय, की ज्या मुलीला ( मुलींच्या बाबतीत मुलाला) लहान पणी शेंबुड पुसतांना आणि चड्डीची नाडी लोंबतांना पाहिलं असतं, मोठा झाल्यावर त्याची / किंवा तिची ती नाक पुसणारी प्रतिमा काही विसरली जात नाही, त्या मुळे सुरवंटाचं फुलपाखरु झालंय हीच गोष्ट दुर्लक्षिली जाते.. ही गोष्ट बहुतेक ९९ ट्क्के लोकांच्या   बाबतीत खरी असते, अगदी एक टक्का लोकंच या सुरवंटाचं फुलपाखरात झालेलं रुपांतर ओळखू शकतात, आणि खरं सांगतो, तेच लोकं खरे शहाणे असतात.
प्रत्येकच मुलगा कॉलेज मधे गेला, की हिंदी सिनेमातल्या हिरो प्रमाणे एखादी सुंदर मुलगी आपल्या प्रेमात पडणार असं त्याला वाटू लागतं. कधी बरोबर ट्रेक ला गेलो, किंवा कधी एकत्र सिनेमाला गेलो की स्वर्गाला हात पोहोचल्या सारखे वाटतात.
जाउ दे.. वर जे लिहिलंय ते माझे विचार आहेत.. पण …बाळ सामंतांची एक कथा वाचली होती.. की मुली कशा पटवाव्या म्हणून.  हा लेख म्हणजे प्रेम करणाऱ्यासाठी एक रेडी रेकनर होऊ शकतो , असं वाटलं म्हणून थोडक्यात इथे त्यातलेच मुद्दे घेउन लिहितोय.  आरडी मधे जशी कंडेन्स्ड कादंबरी असते तसं.
मागच्या वर्षी अवाज ने ५० वर्षं पुर्ण झाल्याबद्दल एक सिलेक्टिव्ह लेख असलेला अंक काढला होता . त्या मधे दरवर्षीचा उत्कृष्ट लेख  त्यात इन्क्लुड केला होता. त्या अंकामध्ये हा लेख वाचण्यात आला.१९६५ सालच्या आवाज मधे आली होतं हे छापून.मुळ लेख आहे १९६५ चा तेंव्हा कालानुरूप थोडे बदल केले आहेत लिहितांना.
आता यात दिलेल्या कलुप्त्या या फार जुन्या काळच्या आहेत.. तरी पण आजही त्या पर्फेक्ट ऍप्लिकेबल आहेत.यातल्या बऱ्याचशा युक्त्या या मराठी कथा कादंबऱ्यांमध्ये वापरलेल्या आहेत, त्या मुळे कदाचित तुम्हाला असंही वाटेल की हे काय… हे तर सगळं माहितीये आम्हाला….

१) बसमधे आपल्या शेजारी बसलेली आणि नेमकं तिकिट काढण्यासाठी तिच्याकडे सुटे पैसे नसणं, आणी तो खविस कंडक्टर सुटे पैसे द्या नाहितर खाली उतरा असं म्हणणार, तेवढ्यात तुम्ही जवळचे सुटे पैसे काढून देता आणि……पुढे तुमच्यावर अवलंबून कुठपर्यंत केस नेता ते.

२)ट्रेनमधे भरपूर मराठी वाचनीय साहित्य घेउन चला, नशिबाने समोर एखादी सुंदरी असली, तर ती नक्कीच तुम्हाला अहो, ते पुस्तक जरा देता का वाचायला म्हणून पुस्तक मागेल, आणि मग ओळख  …. वगैरे….

३) खूप लोकप्रिय सिनेमाची तिन तिकिटे काढावी. सिनेमा हाऊस फुल्ल जाणार आहे याची खात्री करुनच हे काम करा. सिनेमा सुरु व्हायची वेळ झाली की बाहेर कोणाची तरी वाट पहातोय असा आव आणा, आणि सारखं घड्य़ाळाकडे बघत रहा. हाउस फुल्ल चा बोर्ड लागला की दोन सुंदर तरुणी , ज्यांच्याकडे तिकिटं नाहीत अशांना हेरून त्यांना तिकिटं आहे त्याच किमतीत ऑफर करा.. आणि सांगा की आमचा मित्र यायचा होता पण आला नाही म्हणून….
आता इथे दोन तिकिटंएक्स्ट्रॉ कशाला??? तर याचं कारण म्हणजे  मुली एकट्या कधीच सिनेमाला जात नाही्त, एक तर बॉय फ्रेंड तरी असतो,  किंवा एखादी मैत्रीण तरी असतेच.तुम्ही मैत्रिणी बरोबर आलेल्या मुलीचा शोध घ्यायचाय हे ध्यानात ठेवा.. जर एकही मुलगी भेटली नाही , तर तीच तिकिटे.. मी ब्लॅक मधे घेतली आहेत असं म्हणून चढ्या किमतीत कुणाही माणसाला विकून टाका.

४)टॅक्सी साठी उभे आहात, आणि बऱ्याच वेळानंतर टॅक्सी आली की टॅक्सि हायर करुन तिला लिफ्ट ऑफर करा..

५)मुंबईला मरिन लाइन्स वर फिरत असतांना एकदम जोरात पाउस येतो, आणि नेमकी तुमच्या समोर एक सुंदर ललना तयार होऊन कुठे तरी जात असते, जवळपास कुठेच आडोसा नाही, तेंव्हा प्रवास करतांना नेहेमी मोठ्ठी छत्री घेउन चला  काय सांगावं कधी उपयोगी पडेल ते??…..

६) एखादी आपल्या घराच्या आसपास रहाणारी सुंदरी हेरुन ठेवा. तिची रोजची प्रवास करण्याची गाडी हेरुन ठेवा, आणि तुम्ही पण शक्यतो त्याच गाडीने प्रवास करा. एकदा तुम्ही स्टेशनवर उतरलात की शेअर रिक्शा वगैरे साठी ऑफर करु शकता. तिच्या येण्याच्या वेळाचे पण पालन करा. म्हणजे पुढे जमण्याची शक्यता जास्त असेल.

७)मुलींमधले धार्मिक प्रवृत्ती फार वाढीस लागलेली आहे , त्यामुळे सिध्दिविनायक, साईबाबा इत्यादी चलतीच्या देवांच्या मंदिरात जाणं सुरु करा. चेहेऱ्यावर शक्य तेवढे बावळट भाव ठेऊन हातात, फुलांची परडी घेउन रांगेत अशा तर्हेने उभं रहा, की तिच्या नजरेस तुम्ही पडाल.एकदा तिचा विश्वास बसला की तुम्ही इतरांसारखे नाही, तेंव्हा हळूच ओळख वाढवायला हरकत नाही. अरे वा…. तुम्ही पण येता का सिध्दी विनायकाला?? जागृत देवस्थान बरं कां.. असं म्हणत मंदिराच्या कळसालाच बघून हात जोडा आणि पुढे तुमच्याच हातात आहे सगळं….

८)गणपती विसर्जन ,दहीहंडी अशा इव्हेंट्स कधीच चुकवू नका.अशा प्रसंगी मुलींना बाहेर फिरायला खूप आवडतं.

९) टिपीकल मराठमोळ्या मुली या नाटकालाच भेटतातच, इथे पण तशीच दोन तिकिटं एक्स्टॉची आयडिया उपयोगी पडु शकते.

१०)दुचाकी वर लिफ्ट द्या. शक्य होईल तेंव्हा मी तिकडेच जातोय, चला तुम्हाला सोडून देतो, असं म्हणून लिफ्ट द्यावी. हल्ली चेहेरा ओढणीने  झाकून प्रवास करण्याची पद्धत आहे, म्हणजे कोणी ओळखेल याची भिती नसते.
मुलींचे प्रकार  किती तरी   असतात . प्रत्येक प्रकारच्या मुलींशी मैत्री करण्याचे हातखंडे पण वेगवेगळे असतात.

१)स्कॉलर मुली, ज्या केवळ वाचन, अभ्यास यामधेच इंटरेस्ट घेतात त्या.तुम्ही पण शुन्य नंबराचा चष्मा लावून अभ्यासु आहात असा आव आणला, आणि तिला मला ते मेकॅनिक्स फारच जड जातंय हो, किंवा मला सी प्लस जरा समजत नाही, कारण माझं १२वीला व्होकेशनल नव्हतं म्हणून.. वगैरे म्हणावं आणि मदत मागावी.

२)वांड्गमय प्रेमी , अशा मुलींना पुलं , वपु, अशा लेखकांच्या फॅन असतात.यांना गटवायच असेल, तर तुमचं पण त्या विषयातलं ज्ञान भरपूर असायला हवं, जर तुम्हाला पण अशा लेखकांच्या किमान काही पुस्तकांची नावं माहिती असतील तर या प्रकारातल्या मुलींशी गप्पा मारता येतात, आणि तद्नंतर प्रेम पण करता येउ शकतं.
तुम्हाला त्या लेखकांची काही पुस्तकं तरी वाचावीच लागतील, म्हणजे कधीही डिस्कशनचा मुद्दा निघाला की तुम्हाला पण थोडं बोलता येईल त्या विषयावर. आता या मुलींना कसं ….?? तर अगदी सोप्पं आहे,तुम्ही उपरोक्त लेखकाचं एखादं पुस्तक स्वखर्चाने विकत घ्या, आणि नंतर त्याच्या पहिल्या पानावर.. स्नेही.. श्री.. तुमचं नांव.. यांना सप्रेम भेट असं लिहुन खाली त्या लेखकाची सही करा.. ते पुस्तक तिला भेट द्या.. आणि सांगा की हे लेखक माझे चांगले परिचित आहेत.त्यांनी स्वतः भेट दिलेलं हे पुस्तक तिला भेट द्याल, तर तिचा तुमच्यावरचा विश्वास, अन प्रेम नक्कीच सुयोग्य दिशेने वाढू लागेल… . आणि नंतर…….नंतर काय ते सगळं कांही तुमच्याच हातात आहे.

३) कलावंत:- या प्रकारातली जर तुम्हाला आवडणारी मुलगी असेल तर तुम्हाला, कलाकार, नेपथ्यकार, वगैरे प्रकारात प्राविण्य मिळवावे लागेल.एखादा लहानसा रोल पण त्या नाटकातला पदरी पाडुन घेता आला तर ते पण करावं , म्हणजे तालमीच्या वेळेस ऑफिशिअली तिथे जाता येईल.
जर हे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्हाला एखाद्या नाट्य मंडळाचा सभासद होऊन तिथे तालीमीच्या वेळेस जाणं येणं सुरु ठेवावं लागेल. रात्री उशीर झाला ( तालिमीला) की मी सोडतो ना घरी.. माझ्या बाईक वर … असं म्हणून लिफ्ट देणं.. वगैरे वगैरे.. बरेच प्रकार आहेत. सुज्ञास जास्त सांगणे न लगे..

४)खेळाडु:- तुम्ही शंभर पाऊंड वजनाचे किंवा लेंग्याची नाडी न सांभाळता येणारे असाल तर कठिण आहे. ट्रेकिंग , वगैरे प्रकारात इंटरेस्ट असणं आवश्यक आहे . ट्रेक ला गेल्यावर आपण कचरा वगैरे कसा आपल्या बॅगेत भरुन खाली आणतो, आणि मग ड्स्ट बिन मधे फेकतो आणी निसर्ग वाचवण्यास हात भार लावतो हे रंगवून सांगा. आणि लिंगाणा सर केला होता ना…. तेंव्हा अशी सुरुवात करा…. म्हणजे ह्या प्रकारच्या मुली लवकर मैत्री करतील.

५)चित्रपट प्रेमी:- अशा प्रकारच्या मुलींची अजिबात कमतरता नसते. विद्वान ब्राह्मणा प्रमाणे, कुठल्या चित्रपटात कोणी काम केलं कोणाचं संगीत आहे, हिरोच्या लहान भावाचं नाव, किंवा होरोइनच्या बहिणीचा वाढदिवस वगैरे माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. चित्रपटातल्या हिरो , हिरोइन्स ची नावं अगदी संध्येतल्या चोविस नावाप्रमाणे पाठ असायला हवित.
केंव्हाही कधीही सिनेमा पहाण्याची तयारी आणि एक्स्ट्रा तिकिट यांचा खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. एखादा खूप गाजलेला सिनेमा जेंव्हा रिलिझ होतो तेंव्हा दोन तिकिटं रांगेत उभं राहुन ऍडव्हान्स बुक करुन ठेवावी.. आणि तिला पण चलतेस का म्हणून विचारलं, तर ती १०१ टक्के हो म्हणणार याची खात्री देतो मी. अशा तर्हेने ओळख वाढवा…!

६)वर्गभगिनी:- हिच्या कडे वर्गातल्या बऱ्याच बांधवांचं लक्षं असतं. तेंव्हा तुमचा नंबर इथे लागण जरा कठिणच , पण काही झालं तरीही प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे.. असंही  होऊ शकतं म्हणून प्रयत्न सोडु नये.

७)शेजारीण: – शेजाऱ्यावर प्रम करा हा येशु चा संदेश आहे हे खरं, पण शेजारच्य सुमीची आई पण डोळ्यात तेल घालुन तिच्यावर नजर ठेऊन आहे हे विसरू नका.तसेच इतर शेजारी पण तुमच्यावर नव्हे तर तिच्यावर कायम नजर ठेउन असतात, तेंव्हा तुमची प्रत्येक स्टेप ही कमित कमी दहा लोकं पहाणार आहेत हे लक्षात घेउनच स्टेप्स घ्या.तुम्ही काळजी पूर्वक पणे या प्रश्नाचा ध्यास घेतलात तर हा प्रश्न सुटू शकतो अगदी चुटकी सरशी…

८)कचेरीतली सहकारी:-यावर काही लिहायची गरज आहे असं वाटत नाही.आपण सगळे जाणकार आहातच ,काय?? बरोबर नां?

९) मित्र भगिनी:- हे फारच अवघड  नातं असतं.जर तुम्हाला सुंदर बहीण असेल , तर इतर मुलं तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला सिनेमाचे पास, नाटकाचे पास, वगैरे देतील, तुमच्या घरी येण्यासाठी काहीही करायला तयार असतील. हा प्रकार जरा डेंजरसच असतो. तेंव्हा सांभाळुन..
ओळख कशी वाढवावी??   आजकालच्या तरुणांना याची काहीच गरज नसावी.तरी पण, एकदा ओळख झाली की मग.. थापा मारणे सुरु करणे अतिशय आवश्यक आहे. माझं तुझ्यावर प्राणा पलिकडे प्रेम आहे, लाडके, तु माझी झाली नाहिस तर जीव देईन, चल आपण पळून जाउन लग्न करु, इत्यादी प्रकारचे डायलॉग्ज वेळोवेळी ्बोलत रहाणं प्रेम बहरण्यासाठी अतिशय आवश्यक आहे
भेटण्याच्या जागा? चला प्रेम तर जमलं.. आता भेटायला जागा कुठल्या? या मधे ्खूप जागा असु शकतात. पण ज्या सर्व मान्य जागा आहेत, त्या म्हणजे बागा, आर्ट गॅलरीज, चाळीतली गॅलरी, बस स्टॉप , र्लोकलचा प्लॅटफॉर्म, चाळीचा जीना, बॉक्स.. ( हल्ली हा नसतो, पण पुर्वी बॉक्स हा पण एक क्लास होता सिनेमा चा जिथे केवळ दोघांची बसण्याची सोय असायची) समुद्राचा किनारा, आरे कॉलनी चा छोटा काश्मिर अशा अनेक जागा जाणकार लोकं सांगु शकतील.
मी स्वतःचा अनुभव सांगतो, नागपुरमधला असा एकही बगिचा नाही की जिथुन आम्हाला हाकललेलं नाही.. !!! असो!!! वरचा लेख  तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा आहे.
तर मंडळी आता कामाला लागा लवकर.. !!!

मला पडलेले २० प्रश्न ?

१. माणुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?
२. अनुभवी डॉक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस " कसे करतात?
३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्या पासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?
४. बरीच "कामे जुळवणा-याला " - ब्रोकर का म्हणतात?
५. "फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?
६. बांधकाम पुर्ण झालेल्या इमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?
७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?
८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?
९. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?... .
१०. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?
११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?...... ..
१२. जर आपला जन्म इतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर इतर लोक कशासाठी जन्मलेत?
१३. "पार्टी" संपल्यानंतर एखादी तरी मुलगी रडताना का दिसते ?
१४. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते ?
१५. २१ ला ट्वेंटी वन , ३१ ला थर्टी वन मग, ११ ला वन्टी वन का नाही ?
१६.  क्यू भाई क्या चल  रहा है ? या प्रश्नाचे खरे उत्तर काय आहे ?
१७. H. R. ला मराठीत काय म्हणतात ?
१८. HARD DISK ला मराठी शब्द आहे का ?
१९. लहान बाळाला घेऊन मोठी माणसे बोबडी का बोलतात ?
२०. क्रीम बिस्कीट मध्ये क्रीम असते  पण टायगर बिस्कीट मध्ये टायगर का नसतो ?

पोरीमुळी लाजतच नाहीत...

" इश्य..... "म्हणून मन खाली घालतच नाहीत.....
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

" नवीन ड्रेस का? " विचारले तर ह्यांना येतो संशय!!
" नाही रे,जुनाच आहे "म्हणून बदलतात विषय.
नकट्या नाकावर लटका राग दिसतंच नाही,
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

मीघाऱ्या डोळांचे कौतिक करावे,
मग तिनेहीगालात खुदकन हसावे...
कसलेच काय........ आज काल गालांना खळ्या त्या कशापडतच नाहीत....
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

उद्या घोड्यावर बसून येईल एखादा उमदा तरुण,
" होशील का माझी राणी"विचारील हातात हात घेऊन....
गोड गोड स्वप्ने यांना आता पडतच नाहीत....
हल्लीच्या पोरीमुळी लाजतच नाहीत,

पोर लग्नाची झाली म्हणून घरी आई- बाप काळजीत,
" माझा नवरा मी केव्हाच शोधलाय " -त्या सांगतात ऐटीत...
घरून होकारासाठी थांबतच नाहीत......
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत........

ती आली online की

ती आली online की
माझा पीसी Hang होतो
मनात कससंच होवून
सारंच Zing Zang होतं

कितीही Alt+Ctrl+Delete केले
तरी Task manager येत नाही
हैराण होतो Refresh करून
Restart चं नावच घेत नाही

Hard disk चा वेग वाढतो
कसले कसले आवाज काढतो
writer सारखा eject होतो
Pen drive पण reject होतो

काय सांगू तुम्हाला
सारी system fail होते
Virus घुसतो अचानक
त्याची आपली रेलचेल होते

काय म्हणता तुम्ही,
मी online येणे बंद करायचं....?
अहो मग मी.....
तिच्या शिवाय कसं जगायचं....??

अहो Hang च होतोय ना
काय फरक पडतो.....?
तिच्यामुळेच तर माझ्या
PC चा ह्रदय धडधडतो ... :-)

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कीतीही सुदर मुलगी दीसली तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत असतांना
आपले वीचार मांडण्याचि संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच
तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही !!!!!!

दारु पिताना मी कधीच रिस्क घेत नाही

मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा बायको स्वयंपाक करत असते,
शेल्फमधील भांड्यांचा आवाज बाहेर येत असतो,
मी चोरपावलाने घरात येतो,
माझ्या काळ्या कपाटातून बाटली काढतो,
शिवाजीमहाराज फोटोतून बघत असतात,
या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||१||

वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो,
ग्लास धुवून पुन्हा फळीवर ठेवतो,
अर्थात बाटलीही काळ्या कपाटात ठेवतो,
शिवाजीमहाराज मंद हसत असतात,
स्वयंपाकघरात डोकावून बघतो,
बायको कणीकच मळत असते,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||२||

मी : जाधवांच्या मुलीच्या लग्नाचं जमलं का गं?
ती : छे! दानत असेल तर मिळेल ना चांगलं स्थळ!

मी परत बाहेर येतो, काळ्या कपाटाच्या दाराचा आवाज होतो,
बाटली मात्र मी हळूच काढतो,
वापरात नसलेल्या मोरीतल्या फळीवरुन मी ग्लास काढतो,
पटकन एक पेग भरुन आस्वाद घेतो, बाटली धुवून मोरीत ठेवतो,
काळा ग्लास पण कपाटात ठेवतो,
तरी या कानाचा त्या कानाला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||३||

मी : अर्थात जाधवांच्या मुलीचं अजून काही लग्नाचं वय झालं नाही..
ती : नाही काऽऽय! अठ्ठावीस वर्षांची घोडी झालीये म्हणे..
मी : (आठवून जीभ चावतो) अच्छा अच्छा ...

मी पुन्हा काळ्या कपाटातून कणीक काढतो,
मात्र कपाटाची जागा आपोआप बदललेली असते,
फळीवरुन बाटली काढून पटकन मोरीत एक पेग मारतो,
शिवाजी महाराज मोठ्ठ्याने हसतात,
फळी कणकेवर ठेवून, शिवाजीचा फोटो धुवून मी काळ्या कपाटात ठेवतो,
बायको गॅसवर मोरीच ठेवत असते,
या बाटलीचा त्या बाटलीला पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||४||

मी : (चिडून) जाधवांना घोडा म्हणतेस? पुन्हा बोललीस तर जीभच कापून टाकीन!
ती : उगीच कटकट करु नका... बाहेर जाऊन गप पडा...

मी कणकेमधून बाटली काढतो, काळ्या कपाटात जाऊन एक पेग मळतो,
मोरी धुवून फळीवर ठेवतो,
बायको माझ्याकडे बघून हसत असते,
शिवाजीमहाराजांचा स्वयंपाक चालूच असतो,
पण ह्या जाधवांचा त्या जाधवाना पत्ता लागत नाही,
कारण मी कधीच रिस्क घेत नाही .... ||५||

मी: (हसत हसत) जाधवांनी घोडीशी लग्न ठरवलं आहे म्हणे!
ती: (ओरडून) तोंडावर पाणी मारा!!

मी परत स्वयंपाकघरात जातो, हळूच फळीवर बसतो,
गॅसही फळीवरच असतो..
बाहेरच्या खोलीतून बाटल्यांचा आवाज येतो,
मी डोकावून बघतो ... बायको मोरीत दारूचा आस्वाद घेत असते,
ह्या घोडीचा त्या घोडीला पत्ता लागत नाही,
अर्थात शिवाजी महाराज कधीच रिस्क घेत नाहीत..
जाधवांचा स्वयंपाक होईपर्यंत्...मी फोटोतून बायकोकडे बघून हसत असतो...
कारण मी कधीच रिस्क घेत नाही...||६||

सकाळी साखरझोपेत...

सकाळी साखरझोपेत असतानाच मला हलकसं कळालं होतं
आमच्या शेजारी म्हणे कुणी नवं बिऱ्हाड रहायला आलं होतं
" जराशी मदत कराल ?" म्हणत काकूंनी आईला विनवलं होतं
त्यांच्या पदराआडून एक चाफ़ेकळी फ़ुल हळूच डोकावलं होतं
कुणीतरी खेळायला मिळणार म्हणून मन कोण आनंदलं होतं

घर लावता लावता कधी दोघांची गट्टी जमली कळालंच नव्हतं
लुटूपुटूचाच संसार , पोळी करपली असं मी तिला चिडवलं होतं
चिडून मग तिनं गोबरे गाल अन आपलं नपरं नाकं फ़ुगवलं होतं
गंम्मत केली तुझी , असं समजावता तीनं नाकी नऊ आणलं होतं
पत्यात मागच्या आरश्यात पाहून तिला मी हवं ते पान टाकलं होतं
" कस्स हरवलं ", तिची टूणकन ऊडी पाहून मन हर्षानं दाटलं होतं

गप्पाटप्पा , स्नेहभोजन , सहली हे आता नेहमीचंच झालं होतं
मी मुळात खोडकर , सागरकिनारी तिचं वाळूचं घर मोडलं होतं
व्रात्य कार्ट म्हणून बाबांनी काय बेदम बडव बडव बडवलं होतं
खबरदार , पुन्हा तिच्या वाटेला जाशील तर असं दटावलं होतं
तिनं " फ़ार दुखतय का रे ? म्हणून गुडघ्याला मलम लावलं होतं
माझी जोरात किंकाळी , त्या टपोऱ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं

पण एकदा का कोण जाणे थोरामोठ्यांच काहीतरी बिनसलं होतं
तिच्या बाबांनी आमचा शेजार कायमचा सोडायचं असं ठरवलं होतं
हातातून हात सोडवताना आईनं तिला अस्स जोरात खेचलं होतं
तिला जाताना पहावणार नाही , मी स्वतःला दारामागे लपवलं होतं
मला सोडून जाताना , ते चिमण - पाखरू काय मुसमुसून रडलं होतं


कालौघात ते निष्पाप बालविश्व केव्हाच अलगद पुसलं गेलं होतं
अधुन मधुन तिची आठवण , मी एक सविस्तर पत्रही पाठवलं होतं
पत्ते बदललेले , इच्छीत स्थळ सापडलं नाही म्हणून परत आलं होतं
पोटापाण्याच्या धावपळीत , धुक्यात ते निर्व्याज मैत्र कुठेतरी हरवलं होतं
प्रत्येक वळणावर , वेडं मन मग त्या निरागस बालमैत्रीणीला शोधत होतं …

हापूस आंबा

हापूस आंब्याची लज्जत न्यारी
एकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१
पायरी आंबा गोडच गोड
खावी त्याची निदान एक तरी फोड......२
नावाने जरी आंबा लंगडा
तरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३
कच्च्या आंब्याचा नखराच भारी
लोणचे त्याचे घरोघरी....४
दशेरी आंब्याला नाही तोड़
रस त्याचा भारीच गोड.......५
बेगमपल्लिने केली सर्वांवर ताण
गरीबाच्या घरी त्याचाच मान.......६
चवीला पाणचट आंबा तोतापुरी
एकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७
वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मान
त्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८
संपला आंब्याचा मोसम जरी
नीलम दिसतो घरोघरी......९
आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मान
चांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०
आंब्याच्या फळाला राजाचा मान
सगळी फळे करती त्यालाच सलाम....११
आंब्याच्या आहेत हजारो जाती
कोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....१२
संपले आमचे आंब्याचे गाणे
पण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........१३

मिस कॉल

थांबव ग राणी
तुझ मिस कॉल देण,
मोबाइल च बिल झालय
आता ग जीव घेण,

मिस कॉल देण्याची
तुला हौस ग न्यारी,
बिल मात्र पडतय
माझ्या ग पदरी....

अलार्मच्या आधीही
येतो तुझा मिस कॉल,
माझ्याही आधी होते
माझ्या मोबाइलची सकाळ,

कॉल करायला राणी
तुला कधी जमतच नाही,
चुकून केलाच कधी तर
५ मिनिटापेक्षा जास्त बोलायच नाही,

मी कॉल केल्यावर मात्र
तुला तासनतास बोलावस वाटत,
तुझ बोलन वाढलेल पाहून
काळीज माझ फाटत (धडधडत)

तुझ हे मिस कॉल देण
आता रोजचच झालय,
माझाही तुला कॉल कारण
मग साहजिकच झालय,

पण ....
मी ही आता ठरवलय
तुला कॉल नाही करायच,
आलाच तुझा मिसकॉल
तर तुलाच परत मिसकॉल द्यायच,

तुझा कॉल येईपर्यंत
तुला मिस कॉल देत रहायच,
आणि तू कॉल केल्यानंतर
मुद्दामहुन जास्त वेळ बोलायच,

तुलाही कळू दे आता
कॉल करण्याच दु:ख,
मलाही मिळू दे मग
थोडस मिस कॉल देण्याच सुख

मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....

मुलींच्या मागे भरकटलेली मुलं....
माझ्या मनात कधीकधी विचार येतात
आज काल ची मुलं,
मुलींच्या मागे लागून
स्वताचा वेळ वाया का घालवतात???

Chance मिळाला तर प्रतेक मुलीला
पटवायचा प्रयातना करतात,
जर नवीन नाही पटली तर
जुन्या GirlFriend वर भागवतात.

Hi-Hello करून ओळख होताच
Date वर यायची विचारणा करतात,
स्वाताच्या किंवा वडलांनी कमावलेल्या
पैशांची मात्र वाट लावतात.

जराशी ओळख होताच मागे लागून
तिचा Cell Number मिळवायचा प्रयातना करतात,
तिच्या बरोबर् Dating वर जाऊन
स्वतः बरोबर् तिचा ही वेळ वाया घालवतात.

आकाशातले चंद्र-तारे तोडून आनन्या पर्यंत
नको त्या फुशार्क्या मारतात,
तिने "लग्नं कधी करतोस" विचारताच
तिच्या पासून लांब पळू लागतात.

एक GirlFriend पटवून
हे कधी शांत बसलेच नाहीत,
म्हणून तर अभ्यास करायचा सोडून
ह्यानी मुल्लीच जास्त पटवलेल्या असतात.

पड पड धडपड करून एखादी
नोकरी काशीबशी मिळवतात,
पण शेवटी सवई प्रमाणे Office मधे सुद्धा
Line मारायला सुरवात करतात.

एक हृदय तुमच्या जवळ आहे
त्याचे तुकडे किती करणार आहात,
किती ही मुली पटवल्या तरी
लग्न मात्र एकिशीच करणार आहात

दारोळ्या...

प्यायला लागल्यावर चढायचीच
केंव्हा चढते ते कळत नाही
एकदा चढलेली उतरायचीच
उतरणं काही टळत नाही

दारु पिताना एक तत्व पाळावं
सोसेल तेवढीच प्यावी
सगळी संपवायला थोडीच हवी ?
उरली , तर घरी न्यावी!

एक एक पेग कसा
चवी चवीनं प्यायचा
किती पेग झाले याचा
हिशेब असतो द्यायचा

दारू पिऊन झाल्यानंतर
एक लढाई लढायची असते
पार्टीनंतर घरामधली
साफसफाई करायची असते

पिऊन थोडी चढणार असेल
तरच पिण्याला अर्थ आहे
एवढी ढोसून चढणार नसेल
तर आख्खा खंबा व्यर्थ आहे

मी तसा श्रध्दावान
श्रावण नेहमी पाळतो
श्रावणात फक्त दारू पितो
नॉनव्हेज मात्र टाळतो

ज्याची जागा त्याला द्यावी
भलती चूक करू नये
पिताना फक्त पीत रहावं
चकण्यानं पोट भरू नये

वेळच्यावेळी आपण ओळखावी
आपली आपली आणिबाणी
लाज सगळी सोडुन देऊन
ग्लासात घ्यावं लिंबुपाणी

पिऊन तर्र झाल्यानंतर
काय खातोय ते कळत नाही
खाल्ल्यानंतर बिलामधली
टोटल कधी जुळत नाही

आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसर्‍याला घेऊ देऊ नये
दुसर्‍याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये

अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो

आपला पेग आपण भरावा
दुसर्‍यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास , आपली बाटली
दुसर्‍याच्या हातात देऊ नये

असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!

एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय , माझी काय
नशा कधी सरू नये

तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,
पण दारू अशी सांडू नकोस

स्कॉच प्यावी कोरी , कच्ची
बर्फ नको , सोडा नको
उंच आभाळी उडण्यासाठी
पंख हवे... घोडा नको!


फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही

पिणं असतं आगळा उत्सव
त्याचा उरूस होऊ नये
प्यायला नंतर आपला कधी
वकार युनूस होऊ नये

घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे , बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात

आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही

हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा , माझ्या इतकी
पचवून दाखव , नंतर बोल!

प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र

पिणाऱ्यांनी समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा , जिथे , जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये

ग्लासी लागेल ते ढोसत असतो
पानी लागेल ते चरत असतो
जेंव्हा माझं बिल कोणी
दुसराच माणूस भरत असतो

काय होतंय , कुठे होतंय
काही केल्या कळत नाही
एकदातरी वेळ अशी
पिणाऱ्यांना टळत नाही

प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास

'प्रपोज' करायचंय? मग हे नियम पाळा!

काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट
बघतांय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर
चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थाबंली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात?
'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा!
तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा
हाअतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं
प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो.
गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व
लक्षात ठेवा. म्हणूनच 'प्रपोज करण्याच्या गोल्डन रूल्स'चा 'सिलॅबस' पूर्ण
करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

" 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक
शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन
इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा."

नियम १.
आई-बाबाची अनुमती महत्त्वाची
जमाना बदलला असला तरी आपल्याला आपली संस्कृती व परंपरा यांच्याकडे
दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांचा सन्मान करावाच लागेल. आई-बाबांशी या
विषयी चर्चा करून झाल्यावर तुम्ही ज्या कुणाला प्रपोज करणार आहात तिच्या
घरच्या मंडळीशी बोला. त्यानंतरच तिच्यासमोर प्रस्ताव ठेवा.

नियम २.
हृदयातून संवाद साधा
तिला प्रपोज करताना तुमच्या आवाजात गोडवा पाहिजे. तुमचे मधुर शब्द,
वाक्ये तिच्या हृदयाला स्पर्श करणारी असावीत. तिच्याशी संवाद साधताना
आत्मस्तुतीला बळी पडू नका. तुम्हाला ज्या काय भावना व्यक्त करायच्या
आहेत, त्या कमी व अर्थपूर्ण शब्दात सांगा. तुमचे वक्तव्य हे थोडक्यात पण
महत्त्वाचे असे असले पाहिजे. कारण तुमच्या भावना तिच्यापर्यंत सहज व
'लव'कर पोहचतील.

नियम ३.
'क्रिएटिव्ह' व्हा'
'प्रेम' जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. परंतु, त्या फुलाचा सुगंध
'लव'करच संबधित व्यक्तीपर्यंत पोहचला पाहिजे. 'प्रपोज' करण्याची संधी
आयुष्यात (कदाचित) एकदाच येते. त्यासाठी 'रोमँटिक' व्हा, 'क्रिएटिव्ह'
व्हा... तो क्षण तिच्या व तुमच्या आयुष्याला अविस्मरणीय झाला पाहिजे अशी
योजना करा. त्यासाठी तुम्ही आधी कुठे भेटला होता, त्या स्थळी अथवा
एखाद्या रम्य अशा कातरवेळी 'लव्ह'पॉंईंटवर तुमच्या अबोध मनाच्या कप्प्यात
तिच्या विषयी लपलेल्या भावना तिच्यासमोर व्यक्त करा.

नियम ४.
पूर्वतयारी महत्त्वाची
पूर्वतयारी करत असताना करंगळीचे माप माहीत नाही? चिंता नाही. तेच माहीत
करून घेण्यासाठी नाजून 'फॅशनेबल रिंग' घेऊन जायला विसरू नका. तिला आवडेल
अशा पद्धतीने सजून जा. तिला आवडणारे कॉम्बीनेशन लक्षात घ्या. परिधान
केलेला ड्रेस तुमचे व्यक्तिमत्त्व व स्वभाव यांची ओळख करून देतो हे विसरू
नका.

नियम ५.
'ते' क्षण कॅमेर्‍यात टिपा'
ती आणि तुम्ही एका रम्य सायंकाळी नदीच्या काठावर अथवा आवडणार्‍या स्थळी
आहात. त्याचवेळी तुमच्या मनातील तिच्या विषयीच्या भावनांना शब्दरूप देऊन
झाल्यानंतर तिचा होकार मिळताच एकदम बावरून जाऊ नका. तुमच्या मोबाईलमधील
कॅमेर्‍यात तिची प्रत्येक अदा टिपा. व्यक्तीच्या आयुष्यात ही एकदाच
घडणारी घटना असल्याने त्या घटनेला आयुष्यभरासाठी सजवून ठेवा. जीवनाच्या
प्रवासात छायाचित्र निहाळून 'त्या' गुलाबी क्षणाला अधूनमधून उजाळा देता
येऊ शकतो.


नियम ६.
लॉंग ड्राईव्ह
तिने शहराबाहेर निवांत अशा वातावरणात जाण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर
शहरापासून साधारण १५ ते २० किमी अंतरावरच्या प्रेक्षणीय स्थळी,
निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन तिला प्रपोज करू शकता.
पहिल्या नियमात घरातील ज्येष्ठांची अनुमतीची प्रक्रिया तुम्ही
यशस्वीरित्या पार केली म्हणजे तुमचे ५० टक्के काम झाले समजा. मात्र
तिच्या होकाराशिवाय तुमची डाळ कुठेच शिजत नाही. तुम्ही तिला
आत्मविश्वासाने प्रपोज केले तरी तुमचा प्रस्ताव फेटाळण्यासाठी तिच्याकडे
अनेक कारणं असू शकतात किंवा तिच्या काही अडचणी तुमच्यात आडव्या येऊ
शकतात. त्यामुळे तुम्हाला आल्या पावली मागे जावे लागते. 'ब्रेकअप'नंतर
हताश होऊ नका किंवा तिला त्रास होईल, असे वक्तव्य करू नका. एकाकीपणाला
सामोरे जाण्यासाठी या काही टिप्स तुमच्या सोबतच राहतील....

'देवदास' न होण्यासाठी....
* सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही स्वत:ला कमी समजण्याची गल्लत करू नका. मनातील न्यूनगंड आधी झटका.
* हताश न होता चेहर्‍यावर नेहमी हास्य ठेवा. तुम्हाला ब्रेकअपचे दु:ख
नक्की झाले असेल मात्र ते अशा पद्धतीने लपवा की, त्याचा सुगावा कुणालाही
लागता कामा नये.
* दिवसभरातील काही वेळ स्वत:साठी राखून ठेवा व त्यात आपण आपल्या आयुष्यातले सुवर्णक्षण गमावले आहे. त्यावर आत्मपरिक्षण करा.
* अशा परिस्थितीत मित्र व परिवारातील सदस्यांची सोबत खूप महत्त्वाची असते.
* तुम्ही नोकरी करत असाल तर काही दिवसांची सुटी घेऊन बाहेरगावी फिरायला निघून जा.
* अशा वेळी स्वत:ला अशा छंदामध्ये गुंतवून जा की, तुम्हाला तो छंद

काही मजेशीर व्याख्या,काही कधीतरी वाचलेल्या, तर काही रचलेल्या.

बघा आवड्तायेत का?
अनुभव - सभ्य शब्दात मांडलेल्या चुका
मोह - जो आवरला असता माणूस सुखी राहतो पण आवरला नाही तर अजून सुखी होतो
शेजारी - तुमच्या स्वतःपेक्षा ज्याला तुमच्या आयुष्याची खडानखडा माहिती असते तो
सुखवस्तू - वस्तुस्थितीत सुख मानणारा
वक्तृत्व - मिनिटा दोन मिनिटात सांगून संपणारी कल्पना दोन तास घोळवणे
लेखक - चार पानात लिहून संपणाऱ्या गोष्टीसाठी ४०० पानं खर्ची घालणारा
फ्याशन - शिंप्याच्या हातून झालेल्या चुका
पासबुक/ब्यांक्बुक - जगातील सर्वोत्कृष्ठ पुस्तकाचे नाव (जर भरपूर ब्यालेंस असेल तर)
ग्यालरी- मजल्यावरून लोकांच्या डोक्यावर कचरा फेकण्याची जागा
लेखणी - एकाच वेळी असंख्य लोकांचा गळा कापण्याचे साधन
छत्री - एकाचा निवारा, दोघांचा शॉवर बाथ
कॉलेज - शाळा आणि लग्न यामधील काळ घालवण्याचे मुलींचे एक साधन
परीक्षा - ज्ञान तपासून घेण्याचे एक ‘हातयंत्र’
परीक्षा - पालक आणि शिक्षक यांच्या साडेसातीचा काळ
विश्वशांती - दोन महायुद्धांच्या मधला काळ
दाढी - ‘कुरुपपणा’ लपवण्याचे’ रुबाबदार’ साधन
थाप - आजकाल १००% लोक हि फुकटात एकमेकांना देतात
काटकसर - कंजूषपणाचे एक ‘गोंडस’ नाव
नृत्य - पद्धतशीरपणे लाथा झाडण्याची कला
घोरणे - नवर्याने /बायकोने केलेल्या दिवसभराच्या अन्यायाचा बदला रात्री घेण्याची निसर्गाने बहाल केलेली देणगी
मन - साली नेहमी चोरीस जाणारी वस्तू
ब्रह्मचर्य - कुठेच न जुळल्याने स्वीकारायचा मार्ग
विवाहित माणूस - जन्मठेपेचा कैदी
विधुर - जन्मठेपेतून सूट मिळालेला कैदी
श्रीमंत नवरा - चालतं बोलतं atm कार्ड
श्रीमंत बायको - अचानक लागलेली लॉटरी
IT वाला - सतत काहीतरी काम करण्याचे सोंग करणारा इसम
IT वाली - श्रीमंत नवरा मिळावा म्हणून स्पेशल ट्रेनिंग घेतलेली स्त्री
बुद्धिवादी - ज्याच्या बुद्धीविषयी चारचौघात वाद आहे असा
नवरात्र - कंडोमचा खप वाढणारा काळ
स्कार्फ - बॉयफ्रेंड बरोबर बाईक वरून फिरताना कोणी ओळखू नये म्हणून थोबाड लपवायचे मुलींचे एक साधन
चुंबन - रेशनकार्डाशिवाय मिळणारी साखर
लग्नाचा हॉल - दोन जिवांच वेल्डिंग करणारा कारखाना

एक सर्व्हे- आय.टी. कामगारांचा !

* १०% आय.टी. कामगार हृदयविकार,मणक्याचे आजार,सांधेदुखी इ. ने त्रस्त असतात.
* २०% आय.टी. कामगार त्यांच्या सहकार्यान्शीच लग्न करतात.(च्या मायला)
* ३०% आय.टी. कामगार हे 'लिव इन रिलेशन' मध्ये राहण्यात उत्सुक असतात .कारण त्यांना ऑफिस आणि
   घर दोन्ही ठिकाणी जबाबदारी घ्यायला आवडत नाही.
* ४०% आय.टी. कामगार हे गोंधळलेले असतात कि सेटल कुठे व्हावं.(भारतात कि भारताबाहेर ???)
* ५०% आय.टी. कामगारांची बँकेत काहीच बचत नसते.
* ६०% आय.टी. कामगार त्यांच्या चालू पगाराबद्दल नाखूष असतात.
* ७०% आय.टी. कामगार (जगभरातील) रोज ८ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात.
* ८०% आय.टी. कामगार आपल्या पालकांजवळ राहत नाहीत.(खरं आहे)
* ९०% आय.टी. कामगार हे स्वत:चे जीवन,बायको,प्रोजेक्ट डेडलाईन,पगारवाढ,भत्ते,ऑनसाईट भेटी,कंपनीच्या
    ग्राहकांची खुशमस्करी, बढती,विसा स्टेटस,कमीटमेंट याबद्दल कधीच समाधानी नसतात.
* १००% आय.टी. कामगारांना आयुष्यात एकदा तरी असतं वाटतं कि आय.टी.सोडून इतर क्षेत्रात काम केलं
   असतं तर बरं झालं असतं.

आपलं जाणं रद्द.....!!

बॉसने सेक्रेटरीला फोन केला,
''एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला,
''एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.''
नव-याने प्रेयसीला फोन केला,
''एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.''
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला,
''मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला,
''बाबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घे‌ऊन चला ना फिरायला.''
बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला,
''हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.''
सेक्रेटरीने नव-याला फोन केला,
''बाहेरगावी जाणे रद्द.''
नव-याने प्रेयसीला फोन केला,
''आपली भेट रद्द.''
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला,
''माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.''
विद्यार्थ्याने बाबांना फोन केला,
''ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.''

प्रपोज केल्यानंतर मुलीकडून साधारणता कोणती उत्तरे मिळूशकतात त्याबद्दल काही....

नाही sssssss
शी . किती घाणेरडे विचार आहेत तुझे ?
मी तर तुला 'तसल्या नजरेनेपाहिलेच नाही ... मी तुला फक्त एक चांगला [ हे अजून वर ] दोस्त   
    मानते ...
मी "ऑलरेडी एंगेजआहे.
प्लीजमाझा असल्या "फालतू गोष्टींवरविश्वास नाहीमाझ्यासाठी माझे 'शिक्षणकरियर वकु 
     टुंबियमहत्त्वाचे आहेत....
आपली तर आत्ता कुठे चांगली ओळख झाली आहेतु तर मला अजून व्यवस्थीत ओळखत पण 
  नाहीसमला वाटतं की हे कदाचित "आकर्षणअसावे ...
तु किती कमावतोस ? / तुझा बॅलेंस किती आहे?
मागच्या वर्षीच तर मी तुला "राखीबांधली होती !!!!
माझी अशा गोष्टींसाठी अजून 'मानसीक तयारीझाली नाही ....
१०मी माझ्या बाबांना / दादाला विचारून सांगते ....
११मुर्ख , एवढी छोटीसी आणि महत्त्वाची गोष्ट सांगायला येवढा उशिर करतात का ?
१२मला माहित आहेबोलुन दाखवण्याची गरज नाही ....
१३सॉरी .... १४. "आरश्यात तोंड बघ मेल्या ... म्हणे तू मला आवडतेस !!!"
१५मी तर तुला भावासमान मानते [ पण मी मानत नाही ना !!! ]
१६होयमला पण तू आवडतोस , पण तू माझा विश्वासघात करणार नाहिस ना ?
१७गाढवाआधिच नाहीस का सांगायचंआता वेळ निघून गेली [ म्हणजे दुसरे कोणतेतरीचांगले
     "गाढवसापडले ]
१८तु जर थोडे आधी सांगितले असते तर मी कदाचित विचार केला असता ....
१९नालायका , तुझी हिंम्मत कशी झाली मला असे विचारायची ?"                 
      [ त्यानंतर कदाचित एकछानशी कानफाडीत ...]
२०ती : मला विचार करायला वेळ हवा आहे ...
      तो : नक्की किती ? [ अजून आशा आहे तर ....]
      ती :  जन्म .... [ यानंतर मुलगा बेशुद्ध ...]
२१नीच माणसामी तर एक "विवाहित स्त्रीआहे तरीपण ....
२२सॉरी , माझे तुझ्या मित्रावर / छोट्या भावावर प्रेम आहे ....
२३हा हा....हा हा हा.... हा हा हा हा ही ही ... ही ही ही ... ही ही ही ही
२४लग्नाच्या आधी माझा असल्या कुठल्याही फालतू गोष्टीत गुंतण्याचा विचार नाही....
२५मातीत जा ... मला त्याची पर्वा नाही ....
२६तु माझ्यासाठी काय करू शकसिल ?
२७मी कितवी आहेहा हा हा ....
२८मी तुझ्याबद्दल "तसला विचारकधी केलाच नाही ...
२९माझ्या भावाला भेटतो तुला व्यवस्थित समजावून सांगेल....
३०का ??? "स्वातीनाही म्हणली का?
३१पण तू तर "सपना च्यामागे होतास , तिने काय थप्पड वगैरे मारली का ?
३२किती दिवसांकरता ? सॉरी किती तासांकरता ?
३३. " जे काही बोलायचे आहे ते लवकर बोलुन टाकमाझ्या मुलाची शाळेतून येण्याची वेळ झालीआहे..."
३४कित्तीssss छान ....
३५पुढच्या  महिन्यांची 'वेटिंग लिस्ट ' पन फुल्ल आहे ...
३६क्काय sssss३७आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाहितर ....
३८मला वटतयं कदाचित मी "एंगेजअसेन ...
३९मझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त चांगले "ऑप्शनआहेत...
४०मला ह्या गोष्टीबद्दल काहिएक बोलायची इच्छा नाहीत्यानंतर ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायलालागते .....
४१माझ्या "बॉयफ्रेंडलाकळले तर

महाराष्ट्रातील मुलींचे प्रकार ......



 आज आम्ही आपल्याशी "मुलीया अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. या विषयावरचा आमचा अभ्यास हा अत्यंत गाढा आहे. उपरोक्त विषय वाचून तमाम स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असणार. पण आमच्या घरचा पत्ता आम्ही कुठेही नमूद करणार नसल्यामुळे त्यांची थोडी पंचाईत होईल. आय पी ट्रेस केला तर परदेशातून आलेले ट्राफिक सापडेल... त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत. कुणी आमच्या मताशी सहमत असावे असा आमचा आग्रह नाही. आमचा लेख वाचून कुठल्या मान्यता काढून घेतलेल्या डीम्ड विद्यापीठाला आम्हाला Ph D द्यावीशी वाटली तर त्यांनी ती डिग्री विद्यापीठाच्या दारात लटकावून ठेवावी (आम्ही किंवा आमचे हितचिंतक रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतील). ;)

तर आम्ही आज इथे महाराष्ट्रातील मुलींची प्रांतानुसार विभागणी करणार आहोत. प्रत्येक प्रांतातील मुलीचा सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहोत. साहजिक आहे एखादी मुलगी तिच्या प्रांतानुसार केलेल्या वर्णनाशी असहमत असू शकते. तिने मनातल्या मनात म्हणावे "मी नाही इकडची मी तर तिकडची"....शेवटी प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.

चला विषयाकडे वळू... तर पहिला प्रकार आहे "संसारंइतिकर्तव्यं कुमारिका " .... या प्रकारच्या मुली पक्क्या गावाकडच्या. नेटाने संसार करणाऱ्या ... यांनी जीन्स घातली तर यांना पूर्ण जग आपल्याकडेच पाहते आहे असा भास होतो. तुमचं सहजच त्यांच्याकडे लक्ष जरी गेले तरी मैत्रिणीच्या कानात पुटपुटतील "बघतोय बघ कसालोचट मेला ....या मुलींना जेवढा भाव द्याल तेवढा त्या भाव खातील. म्हणून यांना कायम दुर्लक्षित भासवावे. त्यामुळे तुमचा भाव वधारतो. या प्रकारच्या मुली सातारा सांगली कोल्हापूर या प्रांतात सापडतात. या गृहकर्तव्यदक्ष असतात. अशा मुलींशी लग्न केल्याने संसार नीटनेटका होण्याचा जास्त संभव आहे. फक्त तुमच्या स्वत:च्या घरात तुम्ही TV वर जे पाहाल ते प्रत्यक्षात होताना दिसेल.... लग्नाआधी TV चा रिमोट शेवटचा हाताळून घ्या कारण नंतर ते तुमच्यासाठी मृगजळ असेल. समोर रिमोट दिसेल पण त्याच्यापर्यंत कधीही पोहोचता येणार नाही;D


दुसरा प्रकार आहे "आंग्लमातृभाषासंभ्रम कुमारिका " ... इंग्रजाळलेला मराठी बोलणाऱ्या मुली प्रामुख्याने या गटात मोडतात. ह्यांची आई ममा असते आणि बाबा dad ... आम्ही अशा मुलींसाठी एक संज्ञा सुचविलेली आहे "MBCM" म्हणजे Mumbai born confused maharashtriyan ... आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि आपण मुंबई आणि उपनगरातील मुलींविषयी बोलत आहोत. ह्यांना पटवण्यासाठी तुम्ही "cool" असणे फार निकडीचे आहे. तुम्हाला सिगारेटदारू यांची सवय लावावी लागेल नाहीतर तुमच्या पैश्याने ह्या दारूच्या आख्या बाटल्या रिचवतील. ह्यांना मुलांचे लक्ष खेचून घेण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत ... ह्यांचे कपडे हा संशोधनाचा विषय असू शकतो. यांचा स्कर्ट वर्षाच्या मुलीला फिट्ट बसतो. म्हणूनच या प्रकारच्या मुलींची लग्ने अमराठी मुलांशीच जास्त होतात. चुकून तुम्ही यांच्याशी लग्न कराल तर मंगलाष्ट्कातील सावधान अवधूत गुप्ते च्या म्युझिक सोबत आयुष्यभर मागे लागेल आणि वणवा कुठे पेटलाय ते सुद्धा समजणार नाही:)


तिसरा प्रकार "कुत्स्वादिनाप्मानम कुमारिका" ... ह्यांना विशेष धन्यवाद !!! महाराष्ट्रातील मुलींच्या बुध्यान्काची सरासरी थोडीफार जास्त आहे ती यांच्यामुळेच !!! इतर ठिकाणी प्रेयसीकडून कोड कौतुक करून घेण्याची पद्धत असते. इथे प्रत्यक्ष या रणचंडीवर स्तुतिसुमने उधळल्याशिवाय ती प्रसन्न होणे अशक्य .... तिच्या लेखी तुम्ही जगातील नंबरचे सदगृहस्थ असता ...(तिच्या पिताश्री आणि भ्राताश्री नंतर)...प्रथम बोलण्यात पुढाकार घ्याल तर तुमचा किमान शब्दात कमाल अपमान होणार यात शंका नाही. अशा वेळेस तिचा भाऊ किती महान आहे यावर कमीतकमी २० मिनिटे बोलण्याची पूर्वतयारी करून जा. ओळख होईल .... हो... नुसती ओळख ... ह्या मुलींचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या घरापासून सुरवात करावी. नियमित मुलीच्या घरी जावे. तिच्या बाबांबरोबर "अमेरिकेची आर्थिक परिस्थितीयासारख्या गंभीर विषयावर चर्चा करावी. कदाचित एखाद्या दिवशी पोहे मिळतील ... हाच तो दिवस .... दुसऱ्या दिवशी सरळ लग्नाची मागणी घालावी. अशा मुलींशी लग्न केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते ... उत्तरोत्तर प्रगती होते कारण तुमच्या चुका यांच्या इतक्या दुसऱ्या कोणालाही दिसत नाहीत ... अगदी तुमच्या बॉस ला सुद्धा ....
सांगायची गरज आहे ???ह्या पुण्याच्या मुली .... वरील उपाय आमच्या एका कोकणस्थ मित्राने घाऱ्या डोळ्याची सदाशिव पेठेकरीण पटवण्यासाठी वापरलेला आहे ... १०० % रिझल्ट !!! 8)



चौथा प्रकार "मातृपितृवाक्यप्रमानं कुमारिका " ... महाराष्ट्रातील मुलींची बौद्धिक सरासरी घसरलेली आहे ती यांच्यामुळे...!!! या मुलींना विचाराल "तुझे माझ्यावर प्रेम आहे का ??" तर उत्तर येईल "आईला विचारून सांगते... " यांच्याशी लग्न करणे सर्वात सोपे ... सरळ सरळ आपल्या पिताश्रींना तिच्या घरी न्यावे ... कमीतकमी २५ लाख हुंडा मागावा ... हुंडाही मिळेल आणि मुलगी ही .... घरात तुमचे वाक्य प्रमाण असेल ... मोलकरीण बनवा नाहीतर मालकीण ...मर्जी तुमची !!! या मुली मराठवाड्यात अधिक सापडतात???

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा