लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेखन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सुविचार.

आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .

टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! 


प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र

प्रेम लाभे प्रेमळांना, त्याग ही त्याची कसोटी.

आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

ज्याची मस्करी करणारं कुणी नसतं; त्याच्यावर प्रेम करणारंही कुणी नसतं.

शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा लागतो.

प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते.

कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.

प्रेम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करणं हेच प्रेम.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.

प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे. प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.


खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.

श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा.

लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टीकट्टी गरिबी बरी.

मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.

तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.

आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.


शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.

विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.

शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

स्पर्श न करता विद्यार्थ्याला शिक्षा करता येते तोच खरा शिक्षक !

जगातील प्रत्येक घर हे शाळा आहे, आणि माता पिता हे शिक्षक !

जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

समाजाचा विकास केवळ सत्तेने होत नाही तो आदर्श शिक्षाकांमुळे होतो.

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

विचार न करता शिकणे हे निरुपयोगी असते तर न शिकता विचार करणे हे धोकादायक असते.


अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

झाले गेले विसरुनि जावे... पुढे पुढे चालावे... जीवनगाणे गातच राहावे.

घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा.

दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.

कशी असेल ती...?


प्रिया मित्रानो, लग्न होणार असलेल्यांनी आणि झालेल्यांनी हा लेख वाचव आणि कुठेतरी संभाळून सेव ही ठेवा परत वाचनासाठी!

'बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी' अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबत तिने 'गृहकृत्यदक्ष' आणि 'आदर्श सून' असणंही मस्ट असतं. पण, तीही आपल्यासारखी एक माणूस आहे. तिच्या भावभावना, इच्छा-आकांक्षा, तिची परिस्थिती कशी असू शकते, याकडे मात्र या नवरेलोकांचं दुर्लक्ष होतं, नवऱ्याचा बायकोकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा...

- उद्या कदाचित तुझं नोकरी करणाऱ्या मुलीशी लग्न होईल, त्यावेळी जरा हे वास्तवही लक्षात घे.

- ती तुझ्याएवढीच शिकलेली असेल, तुझ्याएवढाच पगार कमावत असेल.

- तीदेखील तुझ्यासारखीच व्यक्ती असेल, त्यामुळे तिचीही स्वप्नं असतील, आवडी असतील,

- तिनेही आतापर्यंत कधीच किचनमध्ये पाऊल टाकलं नसेल, अगदी तुझ्यासारखंच किंवा तुझ्या बहिणीसारखं..

- तीसुद्धा अभ्यासात बिझी असेल आणि मुलगी म्हणून कसलीही सवलत न देणाऱ्या या स्पधेर्च्या युगात पुढे जाण्यासाठी धडपडत असेल, अगदी तुझ्यासारखीच!

- तिनेही तुझ्याप्रमाणेच वयाची २०-२५ वर्षं आई, बाबा, बहीण, भाऊ यांच्या प्रेमाच्या सान्निध्यात घालवली असतील,

- आणि तरीही हे सारं मागे सोडून, तिचं घर, प्रेमाची माणसं यांना दूर करून ती तुझं घरं, तुझं कुटुंब, तुमच्या रितीभाती स्वीकारायला आली असेल.

- पहिल्याच दिवशी तिने मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा अशी सगळ्यांची अपेक्षा असेल

- नेहमीच्या बेडवर तुम्ही डाराडूर झोपलेले असताना ती मात्र सर्वस्वी अनोळख्या असलेल्या वातावरणाशी, अनुभवांशी आणि किचनशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असेल.

- सकाळी उठल्याबरोबर तिने चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिच्याच हातचं असावं अशी अपेक्षा असेल

- तिलाही ऑफिसच्या कामाच्या डेडलाइन पाळताना उशीर होत असेल,

- तीसुद्धा कंटाळली असेल, कदाचित तुमच्यापेक्षा थोडी जास्तच, तरीही तिने तक्रारीचा सूर लावू नये असंच तुम्ही म्हणाल

- नोकर, स्वयंपाकी, बायको, यापैकी तिला एखादी भूमिका करायची नसली तरीही आणि त्यातही तुमच्या तिच्याकडून काय अपेक्षा आहेत हेदेखील शिकण्याचा ती प्रयत्न करत राहील...

- तीसुद्धा थकते, कंटाळते पण सतत टुमणं लावू नये आणि तुझ्यापेक्षा पुढे जाऊ नये या अपेक्षाही तिला माहिती असतात.

- तिचा स्वत:चा कंपू असतो, त्यात मित्रंही असतात आणि तिच्या ऑफिसमधले पुरुष सहकारीही तरीही ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धा आणि असुरक्षिततेच्या भावनेने तुमच्या मनात घर करू नये म्हणून ती बालमित्रांपासूनही दूर राहते.

- कदाचित तिलाही लेट नाइट पाटीर्त जायला, धमाल करायला आवडत असेल, पण तुम्हाला आवडणार नाही म्हणून तू सांगितलेलं नसतानाही ती तसं करत नाही.

मित्रानो, आपल्या या अनोळखी घरात केवळ आपण एकच तिच्या ओळखीचा, जवळचा असतो, त्यामुळे आपली मदत, संवेदना आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशी तिची अपेक्षा असेल पण अनेक जण हे समजूनच घेत नाहीत...
एक सांगू, स्वत:कडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल, तुम्ही मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं जीवनातलं सर्वाधिक यशस्वी शिखर गाठू शकेल..

मराठी लेखन सोप्या आणि सहज पद्धतीने marathi typing software free download


आपल्याला मराठी लेखनाची खूप आवड असते पण आपल्याला मराठी लेखन कसे करायचे हेच माहिती नसते. काही जणांना हे माहिती असते मराठी फोन्ट इंस्टॉल करावा लागतो पण फोन्ट इंस्टॉल केल्यानंतर मराठी  कसे लिहायचे? अक्षरांना काना ,मात्रा वेलांटी अनुस्वार कसे द्यायचे असे प्रश्‍न पडतात मला हि मराठीची आवड असल्यामुळे वरील सर्व प्रश्‍न पडले व त्यांची उत्तरे मी गुगल काकांच्या मदतीने शोधली आपल्यासमोर या लेखात मांडत आहे. त्यासाठी आपल्याला गुगलची दोन छोटी सॉफ्टवेअर इंस्टॉल करावी लागतील ती कशी करायची ते पाहू
 
दोन्ही सोफ्टवेअर फाईल्स डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

फाईल डाउन्लोड झाल्यानंतर अनझिप करा. 
नंतर अनुक्रमे १.गुगल ईनपुट टूल्स व नंतर २.गुगल इनपुट मराठी इंस्टॉलकरा.
 सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्यावर कॉम्पुटर रीस्टार्ट करा.
 ************************************************************

दोन्ही सोफ्टवेअर इंस्टॉल झाल्यावर तुमच्या टास्कबारवर EN  आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करा .

 (EN  आयकॉन दिसत नसेल तर टास्कबार्स वर राईट क्लिक करून टूलबारस मध्ये लेग्वेज बारवर चेक करा.)
नंतर वर्ड,एक्सेल किवा नेट ब्रावजर ओपन करा.
त्या नंतर टास्कबार वरील EN क्लीक करा खाली दाखवल्या प्रमाणे दोन पर्याय दिसतील MA वर क्लिक करा.
 
 
डेस्कटॉपवर खालील प्रमाणे आयकॉन दिसेल.
   

 F12  हे शॉर्टकट बटण आहे एकाच वेळेला इंग्लिश मराठी भाष्या निवडण्यासाठी
मराठी लिखाणासाठी ने वर ठेवा इंग्लीश साठी Aवर ठेवा वर्ड मध्ये लिहिताना खाली दाखवल्या प्रमाणे दिसेल


लिहीत असताना नावाच्या पर्यायी शब्द दिसतील त्यातून ही माउस ने क्लिक करून निवडू शकता पाचच्या पुढचे पर्यायी शब्द पाहण्यासाठी आकाशी रंगाच्या डाव्याबाजूच्या एरो वर क्लिक करा व पहिले शब्द पुन्हा पाहण्यासाठी उजव्या एरो वर. अजून आपल्या मदतीसाठी किबोर्ड पण आहे कोणती अक्षर त्यासाठी नेच्या बाजूला असणाऱ्या किबोर्ड आयकोन वर क्लिक करा.बंद करायचा असेल तर परत त्याच आयकोन वर क्लिक करा.


(सुचना:विंडोज ७ मध्ये वर दाखवल्या प्रमाणे वापरता येईल.) 


कल्पना,लेखन,मांडणी : किशोर रामचंद्र कदम.

मराठी टायपिंग मोबाईलवर... marathi typing software free download for android


नमस्कार मित्रहो आपल्या कॉम्पुटरवर जसे आपण मराठी टायपिंग करतो तसे आपल्या मोबाईलवर हि करता आले तर... असा मला प्रश्न पडला आणि मी या प्रश्नाचे उत्तर शोधायचे ठरवले सहज आणि सोप्या पद्धतीने मोबाईलवर टायपिंग कसे करायचे याचा शोध घेऊ लागलो मी बरीच सोफ्टवेअर माझ्या स्मार्ट फोनमध्ये वापरून पाहिली पण काही जमली नाही. असाच शोध घेत असताना माझी मदत नेहमी प्रमाणे गुगल काकांनी केली आणि मराठी मी  सहज आणि सोप्या पद्धतीने लिहू लागलो. ते मला कसे काय जमले याची माहिती मी तुम्हाला या लेखात देत आहे  मराठी टायपिंग साठी तुम्हाला गुगलचे एक एॅप मोबाईलमध्ये इनस्टोल करावे लागेल आणि काही छोट्या सेटिंग कराव्या लागतील त्या पुढील प्रमाणे

सर्वप्रथम गुगल इनपुट हे सोफ्टवेअर ऑनलाईन किवा तुम्ही मोबाईल मधल्या प्लेस्टोर मधून इनस्टोल करा. त्यानंतर फोन मध्ये सेटिंग जाऊन  लेन्ग्वेज अॅड इनपुट ---> चूज इनपुट मेथड ---> गुगल हिंदी इनपुट वर चेक मार्क करा नंतर डिफोल्ट वर क्लिक करा आणि चूज इनपुट मेथड हिंदी ट्रान्सलेशन करा नंतर बाहेर या


नंतर मोबाईलमध्ये कुठेही टायपिंग करताना खाली दर्शवल्या प्रमाणे किबोर्ड दिसेल  

मराठी टायपिंगसाठी सर्कल मध्ये दिसणाऱ्या बटनावर क्लिक करा मग आपल्याला मराठी लिहिता येईल व पुन्हा इंग्लिश लिहीण्यासाठी परत त्याच बटनावर क्लिक करा वरदर्शवल्या प्रमाणे मराठी लिहिताना जसा  "मराठी" हा शब्द  लिहायचा असेल तर marathi असे टाईप करा आणि स्पेस द्या अश्या पद्धतीने आपण मराठी टाईप करू शकता . मराठी लिहिताना कोणता शब्द येत नसेल  तर जसा "ळ" तर पृथ्वीच्या आयकॉन क्लिक करा खाली दर्शवल्या प्रमाने अक्षरे दिसतील व आपल्याला काना,मात्रा,वेलांटी टाईप करता येईल.


लेखात काही ठिकाणी गरजे नुसार ईग्रजी शब्द वापरले गेले आहते त्यासाठी क्षमस्व आपल्या प्रतीक्रिया व सूचना जरूर कळवा आपले स्वागत आहे.
--
एक मराठी प्रेमी
किशोर रामचंद्र कदम.

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा