मैत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मैत्री लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फक्त दोन ओळी मित्रांसाठी

आमची मैञी समझायला वेळ लागेल ......
पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल .
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!
मनातलं लिहीता यावं अस....
    एखाद पान असावं.....!!
सुर्यालाही लाजवेल अस ...
     आपलं तेज असावं.....!!
माझ्या गोड मिञांनो...
वागता येईल तेवढे सर्वांशी ....
       प्रेमाने वागाव......!!
मरायला तर सगळेच आलेत....!!
    पण जगाव अस कि ....
मेल्यानंतरही नाव निघाव......!!

मैत्रीत...

माणसाने प्रेमात असावेच असे काही नाही,
पण प्रेमाहूनही जास्त, जणू "मैत्री"त असे काही.

प्रत्येकाला एक प्रेयसी असावीच असे काही नाही,
पण प्रेयसीहून समजूतदार, एक मैत्रीण अशी काही.

रस्त्यावरून चालताना जिने हात धरावाच असे काही नाही,
पण सोबत चालताना कधी साथ न सोडावी अशी काही.

जिने मनातले सर्व काही सांगावेच असे काही नाही,
पण माझ्या मनातले नकळत जाणून घ्यावे अशी काही.

खोडसाळपणा केल्यास हळूच हसावेच असे काही नाही,
पण कानाखाली वाजवायला लाजणार नाही अशी काही.

जिला कॉफी साठी विचारताच हो म्हणावीच असे काही नाही,
पण घरी नेऊन सर्वांसमोर कॉफी पाजावी अशी काही.

तिला गिफ्ट देता तिने स्वीकारावेच असे काही नाही,
पण वाढदिवशी न दिल्यास हक्काने मागणारी अशी काही.

मला भेटण्यासाठी घरी थाप द्यावीच असे काही नाही,
पण घरी उशीर झाल्यास माझ्यासोबतच होती सांगणारी अशी काही.

जगात प्रेमाचंच नाते सारे काही असते असे काही नाही,
तर प्रेमाहूनही अधिक जपता येणारे, जसे मैत्रीचे नाते असे काही..

मित्रांचे कट्टे...

मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..

...प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat' वरच संपलेले असतात..

मग 'chat' वर भेटूच " याचं Promise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..

'लाल' 'हिरव्या ' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..

'Available' आणि 'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..

ताप आल्याच आजकाल आईच्या आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..

मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?

कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..

शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....

चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......

भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला

भरपूर मित्र – मैत्रिणी असतील तुला
पण त्यात मी खास आहे का??
हे विचारायचय तुला….
सर्वांशी खुप काही share करत असशील
पण त्यात काही खास
माझ्याशी share करतोस का??
हे विचारायचय तुला…
सर्वाना तू असाच सतावतोस
की फ़क्त मला सतावतोस???
हे विचारायचय तुला…
तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणी च्या
रांगेत मी कुठवर आली आहे???
हे विचारायचय तुला…
तुला प्रत्येक गोष्ट समजावून सांगते
पण ती समजते का ??
हे विचारायचय तुला…
हे करताना मला सवय झालिये तुझी
पण तुला माझी सवय झाली आहे का???
हे विचारायचय तुला….
तुझ्या आयुष्यातील सुख- दू:खात
मी किती भागीदार आहे..आहे की नाही??
हे विचारायचय तुला…
इतक सार विचारल्यानंतर
आणखी एक विचारावस वाटतय..
”मी तुला सोडून गेले तर..कस वाटेल????”
खर तर हेच विचारायचय तुला…..

मैत्री असावी

मैत्री असावी फ़ुलासारखी
नाजुक, सुंदर, गोजिरी;
मात्र नसावी कोमेजून जाणारी!

मैत्री असावी इंद्रधनुसारखी,
सप्तरंग उधळणारी;
पण नसावी भासमान, नष्ट होणारी!

मैत्री असावी हिऱ्यासारखी,
अनमोल अन कठीण;
मात्र नसावी श्रीमंती रुबाब दाखवणारी!

मैत्री असावी रेशमासारखी...
दोन मनांना हळुवार जोडणारी;
पण प्रयत्न करुनही न तुटणारी!

मैत्री असावी पाण्यासारखी
शुद्ध, निर्मळ,तृप्त करणारी;
मात्र नसावी वाहून जाणारी!

मैत्री असावी चंदनासारखी
अलौकिक सुगंध देणारी;
मात्र नसावी झिजून जाणारी!

मैत्री असावी आईस्क्रिमसारखी गोड,
मौज उधळणारी;
मात्र नसावी वितळून जाणारी

मैत्री म्हणजे...

मनगटावर बेंड बांधून हृदयात जागा मिळेल का ?
आतून जुळलेल्या धाग्याचे महत्व या दुनियेला कळेल का ?
आपल्यातील हा धागा असाच अतूट राहू दे.......!!!
मैत्रीदिनाच्या शुभेच्छा . . . !

मैत्री म्हणजे.......खांद्यावर हात
मैत्री म्हणजे.......सदैव साथ

मैत्री म्हणजे.......वाट पाहणे
मैत्री म्हणजे.......सोबत राहणे

मैत्री म्हणजे........एकत्र फिरायला जाणे
मैत्री म्हणजे........एकत्र आईस्क्रीम खाणे

मैत्री म्हणजे........सल्ले घेणे
मैत्री म्हणजे........मार्ग देणे

मैत्री म्हणजे........कधी राग
मैत्री म्हणजे........कधी भडकते आग

मैत्री म्हणजे........कधी खरी कधी खोटी
मैत्री म्हणजे........कधी पड़ते छोटी

मैत्री म्हणजे........आजचं सत्य
मैत्री म्हणजे........नसेलच नित्य

मैत्री म्हणजे.......लिहावं तेवढं कमी
मैत्री म्हणजे.......सुखातच साथीची हमी

अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी,
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी.
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी,
घर जवळ येताच पुढे निघून जावी.
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी,
दिसलो की गालवर छान खळी पडावी.
कधी हसता हसताच ती रडावी,
कधी रडता रडताच खुद्कन हसावी.
हक्काने आपल्यावर रागवावी,
मग कही न बोलताच निघून जावी.
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी,
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट्‌ करावी.
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी,
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी.
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी,
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी.
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी,
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी.
सुखात सगळ्यांना सामिल करावी,
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी.
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी,
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी.
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी,
"साधा एक फोनही केला नाही!" म्हणत रुसुन बसावी.
थोडा वेळ मग ती शांत रहावी,पुढच्याच क्षणाला
"माझ्यासाठी काय़ आणले?" म्हणुन विचारावी.
ती बरोबर असली की आधार वाटावी,
अशीही मैत्रिण नशिबानेच लाभावी !!!

मैत्री पाहत नाही

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा
दूरवर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात अस एक मंदीर करा

मला मैत्रिण हवीय...!

मला मैत्रिण हवीय...!
जिच्याशी बोलून, जिची थट्टा करून,
जिला मनातील विचारांची घालमेल सांगुन,
मी माझे दुःख हलके करू शकेन,
अशी मैत्रिण मला हवीय...!
जिच्या खांद्यावर डोके ठेउन
मी शांतपणे झोपी गेल्यावर
तिला विंचू चावला तरी माझी झोप मोडेल,
या भिती ने जी हलणार नाही
अशी मैत्रिण मला हवीय...!
जिला माझी सारी सोनेरी स्वप्ने सांगता येतील
आणि ती सांगता-सांगता हातून घडलेल्या
चुकांची काबुली जिच्यापशी देता येईल,
अशी मैत्रिण मला हवीय...!
या गजबजलेल्या दुनियेत कोणाच्या मनात काय आहे?
हे ऐकून घेण्यास कोणालाच वेळ नाही,
पण त्याच गजबजलेल्या दुनियेच्या गलक्यातुन
"बोल मी आहे ना...!
असे म्हणणारी मैत्रिण हवीय...!
असे म्हणणारी मैत्रिण हवीय...!
माझ्या प्रत्येक ध्येय प्राप्तिसाठी लागणार
आत्मविश्वास माझ्यामधे निर्माण करणारी
मैत्रिण मला हवीय...!

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं

तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं,
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं...!

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात,
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात...!

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती,
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती...!

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो...!

चल आपण

चल आपण आज आपली
दोस्ती साजरी करूया .

फ़ुलपाखरांच्या पंखांवरचे
रंग होऊन उडूया,
आभाळाच्या निळाईवर
ढग होऊन फ़िरूया.
फ़ुलांमधून, पानांमधून
निसर्ग होऊन झुलुया;

चल आपण आज आपली
दोस्ती साजरी करूया !

कधी हंसू, कधी रूसू;
हे तर होतच राहील ;
राग, लोभ, रूसवे, फ़ुगवे,
सार्‍यांचीच मैफ़ील सजेल,
महीन्यांमधून, वर्षांमधून
कदाचित्‌ संपर्क तुटेल ;
जीवनाच्या मार्गांमधे
जुने - नवे घडेल - बिघडेल ....

आज मात्र आपण गंभीर
चिंतन दूर ठेवूया ----

चल आपण आज आपली
दोस्ती साजरी करूया !!

मैत्री असावी

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी ..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून ,
एक प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक देणारी ...

कधी शिकवण कधी आठवण ,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण ...
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवणारी ,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी .........

माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा ,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा ..
दुःखाच्या चिंब पावसात शोधतोय ,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा ...

पाणावलेल्या डोळ्यांनी आज पुन्हा त्याकडे बघतोय ,
तुझ्या आठवणीचा एक रंग त्यात शोधतोय ..
जीवनाच्या वळणांवर वेगळेचं रंग रंगवणारी .....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी ......

मैत्री

मैत्री
शब्दही न बोलता
अबोल साथ करते,
ती मैत्री.

गवगवा न करता
एकलेपण मिटवते,
ती मैत्री.

खूप व्याप्‍त असतानाही
आवर्जून आठवण काढते,
ती मैत्री.

हज्जार शब्‍द सांगत नाहीत
ते एका शब्‍दात कळवते,
ती मैत्री.

शब्दही न बोलता
अबोल साथ करते,
ती मैत्री.

गवगवा न करता
एकलेपण मिटवते,
ती मैत्री.

खूप व्याप्‍त असतानाही
आवर्जून आठवण काढते,
ती मैत्री.

हज्जार शब्‍द सांगत नाहीत
ते एका शब्‍दात कळवते,
ती मैत्री.

मैत्री तुझी अशी असवी,

मैत्री तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

मैत्री करण्यासाठी

मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर...

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात...
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात...
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात...

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते
निस्वार्थ मैत्रीची जात...

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच
अडखळला, मित्र या शब्दाचा अर्थ
तो दूर गेल्यावर कळला...

आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
काय चिज असते नाही ही मैत्री

मैत्री म्हणजे एक

मैत्री म्हणजे एक अनोखे बंधन आहे...
मित्रांच्या ह्रदयाचे स्पंदन आहे !

मैत्रीमुळे दुर्गुण पळुन जातात...
मोठमोठे अहंकार गळून जातात !

मैत्रीमुळेच जगण्याला अर्थ आहे ....
मैत्रीशिवाय जगणे व्यर्थ आहे !

मैत्री असते एखाद्या फुलासारखी....
कधीही .. कुठेही .. सुगंध पसरविणारी..!

मैत्री असते एखाद्या लहान मुलासारखी....
गोन्डस.. निरागस.. आनंद देणारी...!

मा़झं सगळं जग मैत्रीत सामावलंय ...
आजवर मी मित्रांचं प्रेम तेव्हढं कमावलंय ..!

मैत्री असते उत्तुंग आकाशाएव्ह्ढी ..
असंख्य सूर्यांच्या प्रकाशाएव्हढी...!

मैत्री मनांतला अंधार घालवते....
असंख्य अडचणींमध्येही आशा पालवते ..!

मैत्री नसलेल्यांचे जीवन रूक्ष आहे....
मैत्री म्हणजे आमच्यासाठी 'सदेह' मोक्ष आहे ..!

आनंद-छंद दायिनि.......... मैत्री..!
स्वच्छंद-धुंद दयिनि.......... मैत्री....!

•♥• मी आहेच असा मैत्री करणारा •♥•

•♥• मी आहेच असा मैत्री करणारा •♥•
•♥• मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा •♥•
•♥• प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा •♥•
•♥• आयुष्यभर घट्ट मैत्रिची •♥•
•♥• साथ निभावनारा... •♥•

!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!

•♥• मी आहेच असा सतत बोलनारा •♥•
•♥• मित्राना नको ते प्रश्न विचारनारा •♥•
•♥• प्रश्न विचारुन त्याना सतवनारा •♥•
•♥• उत्तरे संग म्हणुन •♥•
•♥• तगादा लावणारा... •♥•

!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!

•♥• मी आहेच असा मस्त जगनारा •♥•
•♥• सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा •♥•
•♥• आपल्यातच आपलपन जपनारा •♥•
•♥• पण इतरांच्या आनंदासाठी •♥•
•♥• स्वतालाही विसरनारा... •♥•

!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!!~•♥•~!

•♥• मी आहेच असा मनासारख जगनारा •♥•
•♥• यशाचे शिखर चदताना हाथ देणारा •♥•
•♥• अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा •♥•
•♥• सुखाच्या रस्त्यावरून जाताना •♥•
•♥• आयुष्य सजवनारा... •♥•

मैत्री असते कशी

मैत्री असते कशी, लोणच्यासारखी?
हो हो लोणच्यासारखी. मुरत जाते, जुनी झाली की...
मैत्री असते कशी, दुधावरच्या सायीसारखी?
हो हो सायीसारखी. घट्ट होते वेळ जा‌ईल तशी.
मैत्री असते कशी, बासुंदीसारखी?
हो हो बासुंदीसारखी, गोडी वाढते आटवाल तशी.
मैत्री असते कशी, फोडणीसारखी?
हो हो फोडणीसारखी. लज्जत येते जीवनाला तडतडली तरी.
मैत्री असते कशी, मीठासारखी?
हो हो मीठासारखी. नसेल तर हो‌ईल जीवन अळणी........!!!!

कमळ पत्रा वरील पाण्याला


कमळ पत्रा वरील पाण्याला
कधी थांब म्हणायच नसत
नीसटणार्‍या क्षणांना
कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.

मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री
आणि जी फक्‍त आपली असते,ती मैत्री.

काही माणसे असतात खास


काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर
तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात...

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा